ठाण्यात करिअर डेव्हलपमेंट सेंटर...

  बौध्द प्रगती मंडळ, ठाणे व पिपल्स डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होत असलेल्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे उदघाटन 12 एप्रिल रोजी सायं  7 वाजता.  बुध्द विहार, जेतवन परिसर, पवार नगर. ठाणे (प) या ठिकाणी होणार आहे या सेन्टरचे उद्घाटन प्रकाश रविराव हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विरेंद्र जाधव असणार आहेत. तसेच आयु.सुमित खोब्रागडे, जालिंदर यादव, अविनाश दारोळे, संदेश सोनावणे, मनोज बागुल, विनय गांगुर्डे, विजय ब्राह्मणे, विजय भालेराव, प्रवीण बागुल, अनिल मोरे, शरद कलावंत, विनोद शहारे, सुहास बागडे, प्रसन्न सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व युवक-युवतीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनिष गांगुर्डे,  सुनिल गायकवाड यांनी केले आहे. 

2014 पासून युवा क्रांती संघ संचालित तळा तालुक्यात करिअर डेव्हलपमेंट सेंटर कार्यरत आहे. तिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या career planning बद्दल मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून करणे. भारतात व भारता बाहेर उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात येत आहे. अशाच प्रकारचे कायमस्वरूपी सेंटर मुंबईतही असावं असं अनेकांचा आग्रह होता. त्या नुसार ठाणे येथे करिअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात येत आहे. या  सेंटर मध्ये  1. दहावी, बारावी, पदवी नंतर उपलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल, तज्ञांकडून या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. 2. परदेशात उलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल. तसेच परदेशातल्या निरनिराळया विद्यापीठात प्रवेश घेण्यासंबंधी माहिती दिली जाईल. प्रवेश परीक्षा इत्यादीची माहिती दिली जाईल. 3. Motivational कार्यक्रम आयोजित केले जातील.  4. प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रमाणपत्रे कशी व कुठून उपलब्ध होतील व ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. एक दिवसाच्या चर्चा सत्रात सेमिनार मध्ये विध्यार्थ्यांना फारसा फायदा होतांना दिसत नाही. हे सेंटर कायमस्वरूपी असेल. अशी माहिती सेंटर समन्वयक आयुष्यमानिनी वीणा कांबळे, वसुधा भस्मे, ज्योती रंगारी, ऍड.मधुकर लांडगे यांनी दिली आहे तर सेंटरची संकल्पना मांडणी व मार्गदर्शन सुनील कदम करणार असून अधिक माहितीकरिता बुद्ध विहार, जेतवन परिसर, पवारनगर, लास्ट बस स्टॉप पवारनगर, ठाणे (वेस्ट) ४०० ६१०. या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA