Top Post Ad

बाबुराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त....

 बाबूराव बागूल यांचा जन्म,, 17 मार्च 1930 रोजी विहित गाव येथे झाला, भारतातील, सामाजिक, सांस्कृतिक, उच्च निच्चतेचा परिणाम, बाबूराव बागूल यांच्या मनावर झाला होता, त्यांच्या एकूण जीवनात, शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे चटके बसले होते. फुले आंबेडकर चळवळीने बंडखोरीचे जे तत्त्वज्ञान दिले, त्याचा एकूण परिणाम त्यांच्या बंडखोर लेखणीतून अभिव्यक्त होणे क्रमप्राप्तच होते. 

अशी परिस्थिती जगाच्या पाठीवर कुठेही नव्हती.  ज्या कल्चर मध्ये बाबूराव बागूल यांनी जन्म घेतला होता, आपसूकच, त्याच व्यवस्थेच्या विरोधात ते आपली बंडखोर लेखणी झिजवणार होते.  बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा परिणाम, होऊन  त्यांनी माणूस म्हणून, माणसाच्या अभिव्यक्तीला अधिक प्राधान्य दिल्याचे आपल्याला पहायला मिळते. माणूस, सूर्याला सूर्य म्हणाला आणि, सूर्य, सूर्य झाला. माणूस आणि माणसाचे मोठे पण, आपल्या अभिव्यक्ती तून प्रकर्षाने मांडले आहे. बाबूराव बागूल यांच्या साहित्य कृती कोणत्याही इझम मध्ये बसणार्या नाही.  मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्य विषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक. शिक्षण विहित गाव आणि मुंबई येथे अकरावी पर्यंत झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नोकर्या होत्या. लेखनासाठी पूर्ण वेळ देण्यासाठी 1968 सालापासून रेल्वेच्या नौकरीचा राजीनामा दिला. कार्ल मार्क्स, लेनिन, म. जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, तसेच गॉर्की, चेकौव्ह, तसेच शरदचंद्र चटर्जी यांच्या साहित्य कृतीचा प्रभाव, बाबूराव बागूल यांच्या साहित्य कृती ला प्रेरक ठरल्याचे पहायला मिळते. जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे, सुड नावाचा कथासंग्रह, सामाजिक विषमतेचा बळी ठरलेला, नायक, बाबूराव बागूल यांनी प्रभावी पणे पुढे आणला होता. 

प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनाविरोधात पहिला विद्रोह करून ज्योतिराव फुले यांनी मराठी साहित्य हे कसे बहुजन विरोधी आहे हे दाखवून दिले. त्याचा वारसा नंतरच्या अनेक लेखकांनी घेतला खरा, पण अगदी मोजक्याच लोकांना तो पुढे नेता आला. त्यात बाबुराव बागुल हे अग्रणी आहेत. आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे लेखक, कवी तसेच विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. 17 जुलै 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मलेल्या बाबुराव बागुल यांच्या अंगी प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन असे लेखनाचे विशेष गुण होते. जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणार्‍या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. 

आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. 1955 मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली. 1957 मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणार्‍या त्यांच्या कथा 1963 साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर 1969 सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 

‘अघोरी’, ‘कोंडी’, ‘पावशा’, ‘सरदार’, ‘भूमिहीन’, ‘मूकनायक’, ‘अपूर्वा’ अशा कथा-कादंबर्‍यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबर्‍या या गावकुसाबाहेर राहणार्‍या समाजाच्या सामाजिक जाणिवांचे व वेदनांचे वर्णन करणार्‍या आहेत. स्त्रीप्रधान कथालेखन हादेखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. सूड कथेमध्ये बाबुराव बागूल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे चित्रण केले आहे. या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचे चित्रण करणारे आहे.२६ मार्च 2008 रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.




डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने बाबुराव बागूल स्मृतिदिनी
डॉ.गेल.ऑमवेट आणि ल. बा. रायमाने यांचा मरणोत्तर सन्मान

मुंबई-  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असो. महाराष्ट्र या संस्थेमार्फत  थोर क्रांतिकारी लेखक 'बाबुराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (पूर्व) मुंबई येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी डॉ. म. ना. वानखेडे पुरस्कार कालकथित संशोधक डॉ.गेल.ऑमवेट, प्राचार्य म.भि. चिटणीस पुरस्कार कालकथित 'ल. बा. रायमाने यांना तर बाबूराव बागूल पुरस्कार कवि वाहरु सोनवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे प्रदान होणार असून यावेळी सुप्रसिध्द विचारवंत प्रा. प्रकाश शिरसाठ (औरंगाबाद) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोशिएशनचे अध्यक्ष शिवा इंगोले असणार आहेत. तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अॅड. नाना अहिरे यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com