महाडचा रणसंग्राम

 

  इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे म्हणतात. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला.यंदा या सत्याग्रहाला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोना महामारीच्या निमित्ताने लॉक डाऊन लावून अनेक प्रेरणादायी इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न नियोजन बद्ध होत झाला आहे. कारण महाड रणसंग्रामांची आठवण म्हणून त्या निमित्ताने दरवर्षा लाखो अनुयायी त्याठिकाणी जात असतात.दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी लाखो लोक अनुयायांना महाडला मानवंदना देण्यासाठी प्रेरणादायी इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने जातील यात शंका नाहीच.पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो त्यामुळे राज्य सरकारने संविधानानुसार जे काही प्रतिबंध लावले त्यांच्या आदेशांचे पालन गेली दोन वर्षा आपण केले आहे.ती एक सामाजिक जबाबदारी आपली होती.म्हणून त्यांचे पालन आवश्यकतेनुसार केले आहेचं.

महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नव्हता तो मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. बाबासाहेब त्या वेळी सांगत होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्या करीताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे.” असे अंगावर शहारे आणणारे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले होते. त्याला २० मार्च २०२ ला ९ वर्षे पूर्ण होत आहेत.पण त्या सत्याग्रहची आंबेडकर अनुयायांनी कोणती प्रेरणा घेतली हा संशोधनाचा विषय आहे. आमच्यात संघटनात्मक कोणता बदल झाला?. यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करण्याची तयारी आंबेडकरी चळवळीतील नेत्यात आणि अनुयायात असावी. इतिहास वाचला तर इतिहास घडविला येतो असे म्हणतात. मग आम्ही इतिहास घडवितो की भूगोल करतो?.हेच वास्तव्य आजची चळवळ पाहतांना दिसते.त्यावर खंत सर्वच व्यक्त करतात.पण उपाय सुचवत नाही.त्यावर गांभियाने चर्चा करीत नाही.आणि दुर्द्व्य कि सत्य स्वीकारत नाही.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचा जाहीरपणे खुन करणे हा आंबेडकर अनुयायीचा जन्म सिद्ध अधिकार आहे असेच ते वागतात.१४ एप्रिल १८९१ ते ०६ डिसेंबर १९५६ या काळात जे जे ऐतिहासिक कार्य डॉ भिमराव आंबेडकर यांच्या हातून घडले.त्या त्या दिवसाला आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन जाहीर पणे क्रांतिकारी विचाराचा त्याच ठिकाणी खून करून तो उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात.कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो.कारण त्याच दिवसी गल्लीबोळातील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नेत्याचा ८ बाय १० चा बाणेर,होडींग आणि १० बाय १२ चा स्टेज बांधून जनतेला आपली शक्ती दाखविण्याची सुवर्ण संधी मानतात.ती संधी गमवायला कोणीच तयार नसते.या दिवसाचे त्या काळाचे महत्व आज आमच्यासाठी काय आहे. हे आम्हाला विचारण्याचे,सांगण्याचे धाडस कुणी करू नये.आम्हाला आंबेडकर अनुयायी,भक्ता एवढे तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही. आमच्या रक्तात आंबेडकरी चळवळ असते.जन्मताच आम्ही आंबेडकरवादी असतो.२० मार्चला लाखो लोक महाडला जातात आणि काय करतात?. २० मार्च १९२७ चे गांभीर्य कोणत्या गटाच्या नेत्याकडे असते.किंवा नगरा नगरातील मंडळ ,महिला मंडळाकडे असते काय ?. याचे प्रत्येकांचे गांभीर्याने आत्मचिंतन करावे असे मला वाटते.

   महाराष्टातील खेड्या पाड्यातील गांवकुसा बाहेर राहणारी महार फक्त महार माणस महाडला पाणी पिण्यासाठी जाणार नव्हते.तरी बाबासाहेबांनी महाराना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचे चवदार तळे अजरामर झाले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज २० मार्च २०२ ला ९ वर्ष पूर्ण होत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जातीसाठी चवदार तळे नव्हते. डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झाली आणि राज्यातून देशभर पसरली. ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्याकडे राहिले नाही.त्या ऐतिहसिक घटनेला ९ वर्ष पूर्ण होत असले तरी नेहमी सारखे कार्यकार्माचे आयोजन महाडला सणार आहेच.  

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले.बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर समाजात सर्वच माणसे सारखी.अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला? बाबासाहेबांच्या मते,राजकीय,धार्मिक,सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचनेतील नीतीच्या पायावर उभे राहण्यासारखे आहे. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाही.त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जाती श्रेष्ठता मिरवायला मिळते त्यांच्या जातीभेदावर कुर्हाड पडलेली पाहून साहजिकच त्यांचा संताप तीव्र होतो.आज हि खेड्यापाड्यातील वातावरण त्याची साक्ष देते.त्यातून आंबेडकरी चळवळीचे नेते अनुयायी काही शिकायला तयार नाही.

आज देशात जातीभेदाचा जो काही प्रकार अनुभवयास मिळत आहे. तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. जातीपातीच्या विषारी झाडाला केवळ उच्चवर्णीयांकडूनच खतपाणी घातले जाते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.जोपर्यंत एका समाजाकडून दुसऱ्या समाजात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत समताधिष्ठ समाजाची निर्मिती अशक्य आहे,असे बाबासाहेबांनी सांगितलेले असताना ही अनेक वेळा बौद्ध आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा विवाहाच्यावेळीजातीलाच अग्रक्रम असतो.महाडच्या रणसंग्राम भूमीच्या संपूर्ण कोकणात मातृसंस्था आणि पंचायत यातील गावकी भावकीच्या कथा तर डॉ बाबासाहेब आंबेडकयांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माच्या चैकाटीत न सुटणाऱ्या आहेत.एकीकडे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वेळ येताच जाती-पातीला खतपाणी घालायला लावणारी कामे करायची अशी दुटप्पी भूमिका बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाने सोडून द्यायला हवी.त्या पेक्षा खेड्यातील अज्ञानी अशिक्षित असंघटीत माणूस आंबेडकरी चळवळी करिता लाख मोलाचा ठरतो.आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या समाजाने स्वतःचे आत्मपरिक्षण करून बाबासाहेबांनी केलेल्या महाडच्या रणसंग्रामतून योग्य बोध घ्यावा. महाड चवदार तळे म्हणजे पिकनिक पॉईंट नाही. तर एक क्रांतिकारी प्रेरणादायी स्मारक आहे.या सत्याग्रहात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यासर्व ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांच्या निष्ठा, त्याग आणि जिद्दी ला कोटी कोटी प्रणाम.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,

भांडुप मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA