Top Post Ad

मानवतेच्या मुलभूत अधिकाराच्या क्रांतीचा रणसंग्राम

     २० मार्च १९२७ रोजी, भारतीय भूमीवर जागतिक दर्जाची मानवी हक्क क्रांती घडवून आली, जगात अनेक क्रांत्या घडत होत्या, वैचारीक मंथन घडत होते. जगाच्या इतिहासात भारतीय जनता अज्ञानात खिचपत पडली होती, इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, व्यवस्था, मानवतेला काळिंबा लावणार्या गोष्टी शतकानुशतके घडवत होत्या, जिथे जनावरे पाणी पित होते, अशा ठिकाणी पाणी पिण्यासाठी माणसा सारख्या माणसाची अडवणूक केली जात होती.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राजकारणात, समाजकारणात, नव क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. २०मार्च १९२७ रोजी, मानवतेच्या मुलभूत अधिकारासाठी, क्रांतीचा रणसंग्राम सुरू केला, देशभरातून क्रांतीची मशाल घेऊन क्रांतिकारक योध्दे जमले. 

महाड नगरपालिकेचे प्रमुख म्हणून, सुरेंद्रनाथ टिपनीस यांनी, सर्व सार्वजनिक, संपत्ती अस्पृश्य म्हणून गणलेल्यासाठी खुली केली होती. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाहीर सभा घेण्यासाठी मंजूरी   दिली होती.सभेसाठी निमंत्रण दिले होते, या क्रांतिकारक कार्यक्रमासाठी, पाच हजार लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीचे सहयोगी होते... या क्रांती पर्वात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. पाच हजार क्रांतिकारक हातात, काठ्या लाठ्या घेऊन तत्पर होते. परंतु त्याकाळी काठी ही समाजाची ओळख होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही निवडक सहकार् यासोबत चवदार तळ्यातील पाणी प्राशन केले. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर या सभेला संबोधिताना म्हणाले,
 ' आमचा हा संगर पाणी पिण्यापूर्ता, मर्यादित नाही, या आधी आम्ही पाणी पिलो नाही म्हणून काही मेलो नाही, परंतु आम्हीही माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी, आम्ही ही गोष्ट करत आहोत. '

जेव्हा सगळीकडंच प्रकाश असतो, तेव्हा एखाद्या वाईट गोष्टीला कुठं लपायचं झालं, तर तिला लपायला जागाच मिळत नाही. सृष्टीचा सगळा पसारा प्रकाशामुळं सर्वांसाठी प्रकट झालेला असतो. जेव्हा आयुष्यात असा दिवस उजाडतो, तेव्हा तो सत्याचा दिवस असतो. जे जे चांगलं आहे, सत्य आहे, उत्तम आहे, त्याचा इतका विस्तार झालेला असतो, की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे ठरतात. अशा अवस्थेत आपल्या जीवाला जे सर्वोत्तम आहे त्याची प्राप्ती होते. जे सर्वश्रेष्ठ आहे, ते आपल्या कवेत घेता येतं, त्याच्याशी एकरूप होता येतं.”

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी,चवदार तळ्याचे  पाणी प्राशन केले आणि नंतर काही काळ ते, सरकारी विश्राम ग्रहात गेले, गावात अफवा पसरवून देण्यात आली की, आंदोलनात सहभागी झालेले आंदोलन कर्ते, विरेश्वराच्या मंदिरात जाऊन, मंदिर बाटवणार आहे... आपला धर्म बाटवणार म्हणून काही माथेफिरू टोळक्यांनी जेवत असणाऱ्या आंदोलंकाना मारझोड केली होती. गावभर फिरून, आंदोलकांना, धमकावत होते, परंतु, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, आपण कोणत्याही प्रकारची हिंसा करु नका, क्रिया वर प्रतिक्रिया न दिल्याने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनकांचे कौतुक केले होते. आपापल्या गावी परतल्यावर हिंसा केली जाईल, अशा प्रकारे, दम भरला होता. महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह क्रांतिकारक मार्गाने झाला असला तरीही, सनातन हिंदू धर्मातील लोकांनी प्रचंड प्रमाणात विरोधात केला होता... चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ही त्यावेळी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य पाणी पिऊ शकले नव्हते. 

. २६,डिसेंबर १९२७ रोजी चवदार तळ्याचे हक्काचे पाणी मिळावे म्हणून, आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली, या कृतीला जबाबदार असणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे प्रतिकात्मक दहन करण्याचे ठरले, परंतु, त्यावेळी तळ्यावर जाण्यासाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली होती, म्हणून या आंदोलनाला सनातनी लोकांनी विरोध केला होता... अनेक वर्षे संघर्ष करुन या आंदोलनाला यश मिळाले ते, १७ मार्च १९३७ रोजी, न्यायालयाने कायदेशीर हक्क मिळवून दिला. 

१९ मार्च १९४० रोजी.... १४ वा. महाड चवदार सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला होता, महाड शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी, महाड परिषदेचे प्रेसिडेंट,डॉ.विष्णू  नरहरी खोडके यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यासोबतच मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते. डॉ. विष्णू नरहरी खोडके, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीला १९३१ सालापासूनच पाठिंबा दिला होता. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीत महाड येथील संगर अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावर नोंद घ्यावी लागली आहे. डॉ बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनातील महत्त्वाचे तत्त्वज्ञान सांगतात. 

गौतम बुद्ध, संत कबीर, आणि महात्मा फुले, हे माझे तीन गुरू आहेत. "... आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही. मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी मला अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. अशाप्रकारे माझे तीन गुरु आणि तीन उपास्य दैवत आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो हे त्यांच्याच शक्तीमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांचं अनुकरण करा."

महाड चवदार तळ्याच्या, सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. 

अरुण वाघ     9223203545

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com