आज शहिदांच्या पुण्यायीनेच देशाची 135 कोटी जनता खुला स्वास घेत आहे.अनेक क्रांतिकारक, थोर पुरुष यांच्या अथक परिश्रमाने,प्रयत्नाने व बलीदानाने 1947 ला भारत स्वतंत्र झाला.क्रांतिकारकांनी कोणत्याही गोष्टीची व आपल्या परिवाराची पर्वा न करता इंग्रजांना सडेतोड उत्तर देऊन स्वतंत्र भारताची मशाल 1947 ला प्रज्वलीत केली.1928 ला भारतातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ भारतात आले.त्यावेळी सायमन कमिशन नावाचे वादळ रोखण्यासाठी लाला लजपतराय यांनी पुढाकार घेऊन "सायमन परत जा"च्या घोषणांनी संपूर्ण भारत एकवटला.हि बाब सायमन कमिशनचे अधिकारी सॅंडर्स यांना पचली नाही. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने प्रदर्शनकारी जमा झाले.यामुळे सायमन कमिशनची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी सॅंडर्स यांनी लाठीचार्जचा आदेश दिला. यात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच 17 डिसेंबर 1928 ला त्यांचा अंत झाला.
त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण भारत शोकाकुल झाला .हे दु:ख भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना पहावले नाही. त्यामुळे क्रांतीकारकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारकांनी कंबर कसली व लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा अधिकारी सॅंडर्स याला ठार मारण्याचे ठरविले. लाला लजपतराय यांच्या पहिल्या मासिक श्राध्दाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष बदलुन सॅंडर्स यांच्या निवासस्थानी गेले. सॅंडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिले. संकेत मिळताच भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाचवेळी गोळ्या झाडून सॅंडर्सला ठार केले व तेथुन पलायन केले. यामुळे इंग्रज आगबबुला झाले व इंग्रजांनी तिघांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.बरेच दिवस इंग्रजांना हुलकावणी देत तिन्ही क्रांतिकारक भूमिगत राहिले. परंतु फितुरीमुळे ते पकडले गेले.
शेवटी 23 मार्च 1931 ला भारतमातेच्या तिन्ही सुपुत्रांना इंग्रजांनी फाशी दिली.यामुळे संपूर्ण भारत स्तब्ध होऊन सर्वत्र शोककळा पसरली.भारत स्वतंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तिन्ही सुपुत्रांना कोन्हीही विसरणार नाही."जो पर्यंत सुर्य-चंद्र, आकार-पाताळ आहे तोपर्यंत या शहिदांना कोन्हिही विसरणार नाही". भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे बलीदान पाहून 135 कोटी जनतेच्या तळपायाची आग आजही मस्तकात जाते.परंतु 95 टक्के राजकीय पुढारी शहिदांना विसरल्याचे दिसून येते.कारण 95 टक्के राजकीय पुढारी आज देशाच्या विकासापेक्षा स्वत:च्या विकासाकडे जास्त लक्ष देताना दिसतात. राजकीय पुढाऱ्यांनो याद राखा जोपर्यंत तुम्ही देशविकासाची, जनतेच्या हितासाठी संपूर्ण ताकद लावणार नाही तोपर्यंत शहिदांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.
क्रांतिकारक,शहिद हसत-हसत फासावर का चढले यामागचा त्यांचा एकच उद्देश होता. तो म्हणजे मातृभुमिची रक्षाकरून सर्वसामान्यांना न्याय मिळावा व भारत स्वतंत्र होवून सुख शांती निर्माण व्हावी.परंतु आजचा राजकीय पुढारी असा झाला आहे की "लोका सांगे ग्यान व स्वत: कोरडे पाषाण" यामुळेच या कृषी प्रधान देशात मुठभर राजकीय पुढारी करोडपती झाल्याचे दिसून येतात.भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की श्रीमंत हा दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे व गरीब हा गरीबीच्या खाईत जात आहे.या संपूर्ण बाबींची जान राजकीय पुढाऱ्यांनी ठेवली पाहिजे व देशसेवा आणि जनसेवा याकडे सर्वांनीच लक्ष केंद्रित केले पाहिजे तेव्हाच राजकीय पुढाऱ्यांची शहीदांना खरी श्रद्धांजली मानल्या जाईल.
राजकीय पुढाऱ्यांना कोणत्याही लढाईवर जाण्याची गरज नाही.फक्त शहिदांचे अनुकरण करून लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी या पदाला कलंकित न करता यांचा योग्य उपयोग करून जनसेवा केली पाहिजे.तेंव्हाच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल व शहिदांच्या आत्म्याला शांती मिळेल.संपुर्ण देश शहिदांना आपली आदरांजली अर्पण करीत आहे.परंतु शहिदांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही याची जाण मुख्यत्वेकरुन राजकीय पुढाऱ्यांनी ठेवण्याची गरज आहे.कारण राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष देशसेवेपेक्षा फक्त स्वतःचे हीत साधण्याचा प्रयत्न जास्त असतो.त्यामुळे सावधान राजकीय पुढाऱ्यांनो कोणतेही कार्य करतांना शहिदांचे अनुकरण अवश्य करावे व त्यांच्या बलीदानाला कोठेही ठेच किंवा तडा पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी.हे भारत मातेच्या शहिद भुमि पुत्रांनो माझा कोटी कोटी प्रणाम "जब तक सुरज चांद रहेंगा तबतक शहिदोंका नाम रहेंगा"
जय हिंद!
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.
0 टिप्पण्या