महू येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक बचाव आंदोलन

 महू (मध्य प्रदेश) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक ताब्यात घेत येथील व्यवस्थापन बिघडवण्याचे काम  आरएसएसमार्फत करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन तीच्याकडे स्मारकाचे व्यवस्थापन सोपवले आहे.  ही समिती मनमानी तऱ्हेने या स्मारकाचे नियोजन करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना देवत्व बहाल करून भविष्यात स्मारकाऐवजी येथे मंदीर उभे राहण्याची शक्यता परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. हे स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
 
१९ फेब्रुवारी रोजी ही मशालयात्रा बाबासाहेबांच्या जयघोषात महू येथे पोहोचली. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन,पुणे) येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता. औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, नेपानगर, बुऱ्हाणपूर, खांडवा, महेश्वर, मंडलेश्वर मार्गे महूला ही यात्रा १९ फेब्रुवारी रोजी पोहचली. 20 फेब्रुवारी पासून अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरूवात करण्यात आली.मागणी मान्य होईपर्यन्त सत्याग्रह सुरु राहिल, असे बागवान, डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे माजी सचिव मोहन वाकोडे यांनी सांगितले. 

ही मशालयात्रा संयुक्त संविधान बचावो कृती समिती, भीम जन्मभूमी बचावो कृती समिती, इनक्रेडिबल समाजसेवक गृपच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. अस्लम इसाक बागवान हे या मशाल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. सचिन अल्हाट ,निखिल गायकवाड ,मोहन मार्शल, सुनील सारीपुत्र ,एम डी चौबे ,एडविन भारतीय,अरुण चौहान,अजय वर्मा,सोबर सिंह, जितेंद्र सेंगर, प्रवीण निखाडे, संजय सोळंकी, विनोद यादव, मुकुल वाघ, अमित भालसे, राजेश पगारे, निर्मल कामदार, प्यारेलाल वर्मा इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या