Top Post Ad

खरे-खोट्याची चिकित्सा करणे आवश्यक

या भारत भूमीवर अनेक महान थोर पुरूष झालेत. अनेक थोर विचारवंत झालेत. अनेक महान शास्त्रज्ञ झालेत. या थोर पुरूषांनी समाजाची व देशाची प्रामाणिकपणे, एक निष्ठपणे समाज सेवा केली.  डॉ. बाबासाहेब हे एक विद्वान,महापुरूष या भारत भूमीवर जन्माला आलेत. त्यांनी अमेरिका, इग्लंड येथे उच्च शिक्षण घेतले. त्यांची 18-18 तास अभ्यास करण्याची जिज्ञासा फारच प्रबळ होती. त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून योग्य असे निष्कर्ष काढलेत, शुद्र पूर्वी कोण? अस्पृश्य मुळचे कोण? हे प्रबंध त्यांनी लिहिलेत.  त्यांनी रिड्न्स इन हिंदुझम  हा सुध्दा ग्रंथ लिहिला व वैदीकधर्माचे अंतरंग कसे आहे हे जगाला दाखविले. व त्या धर्मावर हल्ल केला. हिंदूधर्म हा पूर्वी वैदीकधर्म होता. नंतर तो हिंदूधर्म झाला. हा धर्म चातुर्वण्यावर आधारलेला आहे. विषमतेवर आधारलेला  आहे. वैदीक - आर्य लोकांची भाषा संस्कृत होती. या धर्मात माणसाला व माणसाच्या माणूसकिला काहींच किंमत नाही या धर्मात ईश्वराला सर्व श्रष्ठ स्थान आहे. भट ब्राह्मण असे म्हणायचे की संस्कृत भाषा ही देव भाषा आहे. 

भट ब्राह्मण यांना असे वाटायचे की संस्कृत भाषा ही आपलींच मालमत्ता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संस्कृत भाषा शिकण्याची ईच्छा होती. परंतु या भट-ब्राह्मणांनी त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची सक्त मनाई केली. ती इतरांनी शिकू नये. व ऐकु नये. ती ऐकली तर कानांत तेल ओतायचे व जिभेनी संस्कृत भाषा इच्चारली तर जिभ कापायचे. त्यांना असे वाटायचे की संस्कृत भाषा बहुजन समाजातील लोक शिकलेत तर आपले प्रभुत्व कमी होईल. व ब्राह्मणांचे बींग बाहेर पडेल म्हणून त्यांनी भारतातील सर्वच बहुजनवर्गाला विद्या संपादनाची बंदी घातली. याना शिक्षण दिले तर त्यांच्या बुध्दीचा विकास होइल. विचार करण्याची शक्ती निर्माण होइल. त्यांची बुध्दी प्रगल्भ होईल आणि त्यांना वैदीक धर्मांच अंतरंग लक्षात येईल. ही भीती त्यांच्या मनात होती.

भट ब्राह्मणांनी निरनिराळ्या काळात भिन्न - भिन्न देवता निर्माण  केल्यात. वैदीक काळात इन्द्र, वरूण, रून्द्र इत्यादी देव होते. पुढे भट ब्राह्मणांनी हे देव नष्ट केलेत आणि ब्रह्म, विष्णू, महेश हे देव निर्माण केलेत. नंतर ब्रह्माच्या नावे तर स्वत:च्या कन्येवर व्यभीचार करण्याची सूट दिली. त्यानंतर विष्णु व शीव यांचे पंथ निर्माण केलेत. भट ब्राह्मणांनी या दोन देवामध्ये युध्द घडविलेत. कधी विष्णू विजयी झाला तर कधी शीव विजयी झाला. कांही काळा नंतर भट ब्राह्मणाना मांसाहार हवा हवासा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी काली व दुर्गा या देवतांची निर्मिती केली. सोबतच राम आणि कृष्णाची भक्ती देखील प्रचलित केली.   ईश्वराच्या ईच्छा शिवाय या जगात कांहीच घडत नाही. देवानेच विख्याची निर्मिती केली आहे. त्याच प्रमाणे त्याने माणसाची सुध्दा निर्मिती केली. माणूस दुर्बल, हीन, दीन, 3gद्र आहे. ईश्वर सर्व शक्तीमान आहे. मनुष्य कांहीच करू शकत नाही. भट ब्राह्मणांनी शक्ती संप्रदाय स्थापन केला. त्यांनी तंत्र-मंत्र निर्माण केलेत. तंत्र उच्चाराने व मंत्र उच्चाराने  बहुजन समाजावर बरीच प्रभावशाली छाप पडली. जादूटोणा याचा सुळसुळाट माजला होता. स्वत:चे वर्चस्व समाजावर ठेवण्यासाठी त्यांनीमंत्र - तंत्राचा उद्दव्याप सुरू केला. त्यांच्यात विषय वासना निर्माण झाली. सत्तेची हाव निर्माण झाली. बेइमानाने सम्पत्ती मिळविण्याची हाव त्यांच्यात निर्माण झाली. अशा प्रकारे भट ब्राह्मण आाधारी, स्वार्थी आणि पाजी बनलेत. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी अज्ञान गोर-गरिब लोकांना पिळुन खाल्ले (पिळून खाल्ली) बहुजन समाज त्यांच्या लुच्चेगुरीला बळी पडला. 

ब्राह्मण म्हणजे धर्मज्ञाते त्यांनी धर्माचे ज्ञान बाजूला ठेवले आणि लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यांना अशिक्षितेत अडाणीत ठेवले व त्यांच्या  बुध्दीमत्तेची वाढ खुंटवली आणि त्यांच्या  डोक्यावर देव-धर्म ठेवलेत, अंधश्रध्दा त्यांच्यात वाढवली. भोळसट, तत्त्वाचा प्रसार केला व या बहुजन समाजाला धार्मिक, मानसिक गुलामगिरीत डांबुन ठेवले.  भट ब्राह्मणानी धर्माच्या नांवाखाली बहुजन समाजाच्या बौध्दीक व मानसिक क्षमतेचे खच्चीकरण केले आहे. धर्माच्या नांवाखाली जे सांगितले ते निमुटपणे ऐकायचे अशी बहुजन समाजाची वृत्ती बनली आहे. बहुजन समाज मनाने व बुध्दीने त्यांच्या गुलाम बनला आहे. त्यांच्या धार्मिक व मानसिक गुलामगिरितून मुक्त व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की, 

।। तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी ।। 

देवा समोर कांही ठेवण्याची गरज नाही. अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे देव - देवळाची दुकानदारी संकटात सांपडली म्हणून भट ब्राह्मणांनी तुकाराम महाराजाचा खून केला. त्यांचे अभंग त्यांनी नष्ट केलेत. 

पिंडदान -: ही प्रथा खोटी व निराधार आहे. पिंड टूवाण्यास आपले वडिल येतात याला पुरावा तो काय? हे वेडे विचार भट ब्राह्मणानी बहुजन समाजात रूजविले व बहुजन समाजातील लोक बुध्दींनी विचार न करता पिंडदान करित असतात. मृत्यू वडिलांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून ते पंडिताना दक्षिणा देतात. हा भटजीचा धंदा आहे. हा त्याचा व्यवसाय आहे, हा एक कष्ट न करता पोट भरण्याचा मार्ग आहे. भट ब्राह्मण हे बहुजन समाजाचे वैरी आहेत. ही गोष्ट सुर्य प्रकाशा इतकी स्पष्ट आहे. धर्म भोळेपणा बहुजन समाजात पध्दतशीरपणे पसरविण्यात आला आहे. धर्म ग्रंथात जे सांगितले आहे ते मुकाट्याने पालन करणे त्यांची चिकित्सा करायची नाही. 

धर्मग्रंथात आहे :- ते खरे आहे की खोटे याचा विचार करायचा नाही. जे धर्मग्रंथात लिहिले आहे ते भक्ती भावे मुकाट्याने खरे मानायचे/ भट ब्राह्मणांनी बहुजन समाजाला धार्मिक व मानसिक गुलामगिरीत जखडून टाकले आहे. महात्मा फुले म्हणतात, मूर्तिपुजा गैर आहे. दगडावर फुले वाहने निरूपयोगी आहे. वैदीक धर्म ग्रंथात स्वत:ला अनुकूल अशी काल्पनिक व खोटी माहिती भट ब्राह्मणानी घुसविलेली आहे.  

भट ब्राह्मणाचे समाजात श्रेष्ठस्थान कायम रहावे व समाजावर आपले वर्चस्व कायम रहावे यासाठी मनुस्मृती सारखे धर्मग्रंथ बनविण्यात आले आहे. मनुस्मृतीत नियम बनविले आहे. परंतु भट ब्राह्मणांनी त्याला धार्मिक स्वरूप दिले आहे व धार्मिक कर्मकाण्डाद्वारे भट ब्राह्मण बहुजन समाजाचे शोषण करू लागला.  ।। ब्राह्मण झाला भ्रष्ट   तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ ।।   भट ब्राह्मण कितीही चारित्रहिन शीलहिन व किती ही भ्रष्ट असला तरी त्याला सर्व लोक श्रेष्ठ समजतात. हे योग्य नाही, त्यांची धार्मिक व मानसिक गुलामगिरी नष्ट करायला पाहिजे. त्यांच्या वैदीक धर्म हा खोटा धर्म आहे. भट ब्राह्मणाच्या धर्मात खंडोगणती देव आहेत. त्यामध्ये तेहतिस कोटी देव आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी विष्णूची पुजा केली. विष्णू पावला नाही, शिवाची पुजा केली परंतु शीव ही पावला नाही, मरीबाई म्हसोबा खंडोबा हे सुध्दा मला पावले नाहीत. भट ब्राह्मणांच्या धर्माची उभारणी अमंगल अशा भेदा - भेदावर केलेली आहे.   भट ब्राह्मणांनी बहुजन समाजाला देवाच्या नादी लावले आहे. या भारत देशात किती तरी लोक गरिब आहेत. ते दारिद्र्याच जीवन जगत आहेत. त्यांना पोटभर खायला मिळत नाही. रहायला घर नाहीत. त्यांच्या अंगावर कपडा नाही, कुपोषणानी मुलं मरण पावत आहेत, सुशिक्षित तरूण मिलं-मुली बेकार आहेत. त्यांना नौकऱया नाहीत तर ते वाईट मार्गाला जातील. शेतकरी आत्महत्या करित आहेत. गरिब माणूसं कर्जबाजारी झाला आहे. दिवसा ढवळ्या बँकेवर दरोडा पडत आहे, दहशतवाद, आतंकवाद, फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेव्हा जे कोट्यावधी रूपये गणेश उत्सव करिता खर्च करण्यात येतात. ते कोट्यावधी रूपये खर्च न करता. त्या कोट्यावधी रूपयातून बेकारीचा प्रश्न सोडवायला पाहिजे. नविन नौकऱया, नविन कारखाने, नविन उद्योगधंदे, निर्माण करून नव-तरूणांना नौकऱया द्यायला पाहिजे. अलिकडे बहुजन समाजातील लोकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. 

भट ब्राह्मणांची मनोवृत्ती देशाचे वाटोळे करणारी रोगट मनोवृत्ती आहे, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.....बंधुनो....भट ब्राह्मणाच्या या भुलथापेला बळी पडू नका. अंधश्रध्दा बाळगू नका. त्यांच्या धार्मिक व मानसिक गुलामगिरीचा त्याग करा. व बुध्दीवादी बना. 

भट ब्राह्मणांनी विद्येची देवता म्हणून सरस्वती निर्माण केली. वास्तविक पाहता ही सरस्वती विद्येची देवता कशी असा प्रश्न कुणीही भट-ब्राह्मणांना विचारीत नाहीत. तिचा जन्म कोणत्या गांवी झाला, तिचा जन्म कुणाच्या कुटूंबात झाला. कोणत्या तारखेला तिचा जन्म झाला, तिच्या चडिलांचे व आईचे नांव काय आहे, ती कोणत्या शाळेत व कॉलेजात शिकली. किती शिकली, तिने समाजातील व्यक्तींना कधी शिकविले, तिने कुणाला विद्या दिली, अशा प्रकारचे प्रश्न कुणीही भट-ब्राह्मणांना विचारीत नाही. भट-ब्राह्मणांना विचारले तर ते असे म्हणतात की, पोथी, पुराण व धर्मग्रंथात नमुद केले आहे. ते सत्य आहे. वास्तविक पाहता बहुजन समाजाला धार्मिक व मानसिक गुलामगिरीत जखडून ठेवण्यासाठी सरस्वतीला विद्येची देवता म्हटले आहे. हे सांर खोट आहे. ब्राह्मणांनी खोट्याला खर म्हटलं तर सारा बहुजन समाज खर म्हणतो. 

भोळे-भाबळे बहुजन समाज अशा अंधश्रध्देवर विश्वास ठेवतात. खरे-खोट्याची चिकित्सा करित नाहीत. मूर्ति पुजा, अंधश्रध्दा, यामुळे देशाची अधोगती झाली आहे. अज्ञानी व अडाणी लोकांची मने देवाकडे लावून भट-ब्राह्मणांनी त्यांना भक्ती मार्गाला लावले व अंधश्रध्दा त्यांच्यावर लादली. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी!  आर्याचा धर्म खोट्या पायावर रचला आहे. हा फार दिवसाचा धर्म, भ्रम घोटाळा व धर्म भोळेपणा साडा, निर्जिव मूर्तिची पुजा करू नका. उच्च शिक्षण प्राप्त करा. सुशिक्षित व्हा. बुध्दीवान प्रज्ञावान व्हा, शीलवान व्हा, तुमच्या मैत्रीचा सुगंध सगळीकडे दळवळला पाहिजे, प्रेमानी समाजात वागा, शिक्षण हे जागृतीचे, व  परिवर्तनाचे साधन आहे. 

बहुजन भारतीय लोकांची धर्मावर अपार श्रध्दा आहे. ती श्रध्दा कांहीशी आंधळीहि आहे. भारतातील बहुजन समाज धर्माला प्राण्यापेक्षा प्रिय मानतात. धर्म आपल्या हिताचा पोषक आहे की घातक आहे. याचा फारसा विचार ते परित नाहीत. धर्म ग्रंथातील नियमानी बहुजन समाजाला जखडून टाकले आहे. व हा बहुजन समाज फारच बंदीस्त झाला आहे. तो धर्माच्या चौकटीत कोंडला गेला आहे. 

धर्माचे नांवानी कोणी त्यांना विष दिले तरी ते अत्यंत आनंदाने त्या विषेच प्राशन करतात. भट ब्राह्मणानी धर्माच्या  नांवाखाली बहुजन समाजाला गुलाम बनविले आहे. धर्मावर ब्राह्मणांची ठेकेदारी व मक्तेदारी आहे. वेद प्रामाण्य म्हणजेचं चातुर्वण्य व्यवस्था हे वैदीक धर्माचे एक अत्यांत महत्वाचे अधिष्ठान आहे. वेदाची चिकित्सा करणे हे धर्मात पाप आहे. तसेच लोकांना समाज मानणे हे ही पाप आहे. भटृब्राह्मणांनी पुराणकथा लिहिल्यात व त्यांच्या कथानी सामान्य बहुजन समाजाचे मन झपाटून टाकले, अशा प्रकारची जादू या भट-ब्राह्मणांनी केली. श्रवेद पुरूष सुत्तात असे सांगितले आहे की, ब्राह्मण-ईश्वराच्या मुखातून क्षत्रिय त्यांच्या बाहुनय वैश्य त्याच्या मांडीतून, व शुद्र त्यांच्या पायातून निर्माण झाला. ब्राह्मण हा ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार. ब्राह्मणाची वाणी पवित्र असते हे बहुजन समाजाच्या मनावर ठसविण्यासाठी भट ब्राह्मणांनी नियम केलेत. एखादी गोष्ट अपवित्र अशुध्द आहे. परंतु ब्राह्मणांनी पवित्र व शुध्द म्हटले की ती पवित्र, शुध्द बनते. अपवित्र गोष्टीला पवित्र बनविण्याचे अलौकिक सामर्थ्य ब्राह्मण - वाणीत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, जर नारायण सत्य आहे तर लावण्याची काय आवश्यकता. भाविक लोक - नारायण ला मेवा मिठाई, काजू, बदाम, अर्पण करतात. हे सर्व प्रत्यक्ष नारायण खातो काय? ``नाही'' तर हे सर्व भटजीच्या पिशवीत जाते. व ते भटजी खातात. देवाच्या नांवांखाली पोट भरण्याचा भटजीचा धंदा व्यवसाय आहे.  

हे सर्व भट ब्राह्मणाच्या सुपीक भेंदुतीन निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता हे सर्व लोक आचार विधी आहेत. परंतु दुदैवाची बाब अशी की अजुनही हिंदु-समाज या धार्मिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाला नाही. सुशिक्षित माणसं देखील जीवनात सुख-शांन्ती वांदवी व जीवम समृध्दमय व्हावे यासाठी आनंदाने पैसे खर्च करून सत्यनारायणाची पुजा घरात करतात. स्पष्टपणे सांगायचे असले तर ``गणेश'' हा पार्वतीच्या मलातून निर्माण झाला आहे. गणेशाची पुजा करणे योग्य आहे काय? 

किल्लारी हे गांव महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे गणेश उत्सव थाटामाटाने साजरा करण्यात आला. शेषणाई करण्यात आली. वेग - वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. कोट्यावधी रूपये या गणेश उत्सवाला खर्च करण्यात आले. 10 दिवसानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ज्या रात्री किल्लारी येथे गणेश विसर्जन करण्यात आले, त्याच रात्री किल्लारी गांवात फार मोठा भुकंप झाला. हजारो घर नेस्तनाबुत झालेत. लाखो लोक मरण पावले. कुटूंबचं कुटूंब उध्वस्त झाली, इमारती खाली माणसं - बायका - मुले गाडल्या गेलीत. गणेश हा सुखकर्ता आहे ना! 10 दिवस किल्लारीमधील लोकांनी भक्ती-भावे मनोभावे पुजा केली, असे असतांना किल्लारी गांवात भुकंप कां झाला, लाखो-लोक गड्यात कां गाडले गेलीत. अनेक स्त्राrया विधवा झाल्यात, कुटूंब उध्वस्त झालीत, 

अरुणा नारायण- अहमदनगर,   

----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com