Top Post Ad

छत्रपती शिवाजीराजे भोसले व भारतीय समाज

भारतीय समाज व्यवस्थेत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशी चार वर्ण असल्याचे ऐतिहासिक सत्य आहे। स्मृती, श्रुती आणि पुराणांनी या चारही वर्णांना विविध कामे वाटून दिली होती। यातील पहिल्या तीन वर्णांची सेवा करण्याची आज्ञा शूद्र वर्णाला देण्यात आलेली होती। आज्ञेची अहवेलना केल्यास जबर शिक्षेची तरतूद आणि तात्काळ अंमलबजावणीची व्यवस्था धर्मग्रंथात होती। भारतीय समाज व्यवस्थेतील लोकसंख्येने सर्वात अधिक असलेल्या शुद्र वर्णासोबत एक उपवर्ण कालांतराने निर्माण झाला, तो म्हणजे अतिशूद्र ! शुद्रपेक्षाही नीच, हलकी, गलिच्छ कामे करण्याची सक्ती या अतिशूद्रांवर करण्यात आली, या बद्दलचा सविस्तर लेखाजोखा वाचकांना जाणून आहेच।

हे अतिशूद्र पूर्वीचे शूर वीर योद्धे असतांनाही धार्मिक कुरघोडीमुळे त्यांना अस्पृश्य ठरवून त्यांचे मानवीय अधिकार हिरावून घेण्यात आले। मूळची लढवैय्ये असलेली ही माणसे या सामाजिक गुलामगिरीमुळे स्वाभिमानशून्य बनून आपल्यातील क्षात्रतेज हरवून बसली होती। अशा या निस्तेज समाजाला जेंव्हा जेंव्हा हाती शस्त्रे हाती धरण्याची संधी मिळाली, तेंव्हा तेंव्हा त्यांनी आपल्या पराक्रमाच्या तेजाने इतके दिपवून टाकले की, धर्मग्रंथांनी त्यांना हाती शस्त्र न धरण्याचीच सक्ती करावी लागली। शस्त्रबंदीमुळे सत्व हरवलेला हा समाज आपल्या क्षात्रतेजाच्या इतिहासाला कधी तरी नव्याने उजाळा मिळेल, याच आशेवर भविष्यकाळाकडे आशाळभूत नजरेने पाहत होता जणू ! आणि त्यास संधी मिळालीच.....

◆ छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे या समाजाची (अस्पृश्य) शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली। शस्त्रबंदीचा मनुस्मृतीचा कायदा झुगारून अस्पृश्यांच्या हाती शिवरायांनी तलवार दिली, मर्दुमकी गाजविण्याची नवी संधी दिली। नाकारलेल्या या समाजाने या संधीचे सोने करून दाखविले। हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे राजे छत्रपती शिवाजी यांनी अस्पृशांना स्वराज्याच्या सेवेत घेतांना कोणताही संकोच बाळगला नाही/ आडकाठी आली नाही। महार हे स्वराज्याच्या कामी अतिशय उपयुक्त आहेत हे चाणाक्ष राजाला कळून चुकले होते। स्वराज्याच्या कामाला यशस्वी करण्यासाठी त्यांनी जाती-धर्माची बंधने झुगारून सेवेत घेऊन महारांना किल्यांच्या तटबंदीचे रक्षण तसेच डोंगर, जंगल आणि पायवाटा रक्षणाची जबाबदारी दिली,

पराक्रम गाजविण्याची संधी पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी दिली। महाराज्यांच्या मृत्यूनंतरही महार समाजाची अनेक लष्करी पथके स्वराज्याच्या सेवेत शेवटपर्यंत होती। शिवाजी महाराज व त्यानंतरच्या मराठेशाहीच्या काळातील महारांचा लष्करी अनुभव पुढे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात जाण्यासाठी त्यांना प्रेरक ठरला असेच म्हणावे लागेल। भारतीय संरक्षण विषयाचे तज्ञ असलेले, लष्करी इतिहासाचे अभ्यासक स्टीफन कोहेन यांनी देखील या गोष्टीला दुजोरा देऊन ते आपल्या "द इंडियन आर्मी" (The Indian Army.....) या ग्रंथात लिहितात, "The Mahars were a sizeable position of the armies of the Maratha Chieftain Shivaji, served as hereditary local police man, and we're thus a natural martial class, Newly recruited in the premutiny years. Tha Mahars constituted a fifth to quarter of the entire Bombay Army.

◆ भारतीय समाज व्यवस्थेत जातीला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे रूढी परंपरा, धार्मिक कर्मकांड आणि नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक होते। जात ही इथल्या प्रत्येकाला इतकी घट्ट चिटकून बसली होती की, ती युद्धभूमीवरही माणसाला सोडत नव्हती, याचाच फायदा अहमदशहा अब्दालीने "पानिपत" च्या लढाईवेळी घेतला होता व शेवटी *पानिपत* झाले होते, हे आपण जाणतोच आहोत; हे उदाहरण जातीयतेला व धर्मांधतेला saporting म्हणून दिले आहे।
एक महत्वाचे की, "समुद्र उल्लंघन करणे" उच्चजातीसाठी दंडनीय होते, त्यामुळे धर्म बुडत होता व दोषींवर बहिष्कार टाकल्या जात होता म्हणून उच्चवर्णीय लोक सागरी सैन्यात, आरमार मध्ये फारसे भाग घेत नसत।
छत्रपती शिवरायांनी सागरी सत्तेचे महत्त्व ओळखले होते। ज्याचे आरमार त्याची सागरी सत्ता हे सूत्र ते जाणून होते। त्यामुळे त्यांनी सुसज्ज आरमार व मजबूत सागरी किल्ल्यांची निर्मिती करून स्वराज्याचा पाया बळकट केला। महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे सिद्दि, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज हे मराठ्यांच्या वाटेला जात नव्हते। मराठा आरमाराचे प्रमुख दौलतखान, मायनाक, इब्राहिमखान या सारख्या शूर सरदारांचा धाक अनेकांना वाटत होता।

समुद्र उल्लंघन बंदीमुळे ब्राम्हण, राजपूत आणि मराठा यासारख्या उच्च जातींनी आरमारी सेनेकडे पाठ फिरवली होती। छ. शिवाजी महाराजांनी हीच बाब हेरली आणि दूरदृष्टीने कोळी, महार आणि मुस्लिमांना आरमारी सेवेची संधी दिली; आणि या सारख्या जातींनी शिवरायांचा विश्वास जागून सागरी शौर्यावर आपली अमीट छाप सोडली होती।
छ. शिवाजी महाराज आणि नंतर कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली महारांनी सागरी सेवेत आपले स्थान मजबूत केले होते। स्वराज्याच्या आरमाराचा महत्वाचा व खूप मोठा घटक हा महार सैनिक होता। त्यांनी सागरावर आपले वर्चस्व निर्माण केले। अनेक विजय मिळवून शौर्यपदके घेतली। अत्यंत उच्चविचार, उत्कृष्ट वर्तन आणि जबाबदार लष्करी बाणा त्यांनी मराठा आरमारामध्ये प्रस्थापित केला होता।

■ छ. शिवाजी महाराज उच-नीक फरक करीत नव्हते, शुद्र-अस्पृश्य हा भेद सुद्धा त्यांनी मानला नाही। ब्राम्हण व इतर या सर्वांना त्यांनी समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे त्यांच्या चरित्रावरून कळते।
विशेष म्हणजे, ज्या अस्पृश्य जातीला हिनतेचा दर्जा त्यावेळसच्या सामाजिक/ धार्मिक व्यवस्थेने दिला होता, त्या जातीला/ समाजाला त्यांच्यातील हुनर जाणून न्याय दिला असेच म्हणावे लागते।


भीमराव तायडे, नांदुरा (जिल्हा: बुलडाणा) 9420452123

  • [संदर्भ: "गोपाळबाबा वलंगकर" लेखक: डॉ प्रेम हनवते व लेखकांचे संदर्भ.....]
  • महार रेजिमेंटच्या इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक कर्नल व्हीकटर लॉंगर व त्यांचाच आणखी एक ग्रंथ - The History of the Mahar Regiment Saugor
  • स्टीफेन कोहेन : ग्रंथ - द इंडियन आर्मी
  • शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक : लेखक - प्रेम हनवते
  • A Matter of Honour - लेखक : Philip Mason
  • आणखी अनेक ग्रंथात उल्लेख आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com