जेम्स लेनला पुरंदरेच्या चिल्या पिल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ बाबत चुकीची माहिती देऊन चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला. यांची जेव्हा माहिती स्वाभिमानी मराठा तरुणांना विशेष संभाजी ब्रिगेडच्या छाव्यानां मिळाली म्हणूनच त्यांनी भटाचा भांडारकर छिनालखाण्याची तोडफोड केली.तेव्हा त्यांच्या स्वरक्षणार्थ आणि समर्थनास शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणत्याही कसूर केली नाही.त्यातच पुरंदरेचा महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला त्यात भाजप शिवसेना नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मातोश्री पेक्षा स्वजाती बांधवांचे रक्षण करण्यासाठी सत्तेचा पूर्ण वापर करून घेतला.आणि आम्ही कोणाच्या रक्षणसाठी,परिवर्तनसाठी आणि विकासासाठी सत्तेत आलो हे सिद्ध करून दाखविले. त्यामुळेच त्यांना तेव्हा आणि आता बिनडोक मराठी माणस, मराठे आणि ओबीसी यांची कोणतीही भिती राहिली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे दैव्ययी करण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतिकारी विचारांचा खून करून संपूर्ण शिवसैनिक रामाच्या मंदिरात अयोध्या मध्ये उतरविले. कारण राम मंदिर बांधल्यामुळे कोणत्या समाजाचा सर्वगीन विकास कायमस्वरूपी होणार आहे. यांची माहिती मराठा मागासवर्गीय समाजाला होत नसेल तर त्यांच्या सारखे मूर्ख जगात कोणी नसावे.म्हणूनच ठाकरे कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना कोणत्या विचारधारेची आहे हे दाखवून दिले.आता शिवसेना सत्ताधारी आहे.शासनाच्या नियमानुसार शिव जयंती साजरी करते कि विचारधारे नुसार हीच खरी सत्वपरीक्षा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणाऱ्या शिवसेनाला राज्यातील अनेक शहरांचे नांवे पसंद नाहीत म्हणून ते बदली करण्याचा निर्णय घेतात.त्या नांवाचा इतिहास त्यांना नको आहे.मग शिवसेना ही मराठी माणसांची मराठा समाजाच्या रयतेच्या राजाची नसेल तर त्यांनी आता आपली ओरिजिनल ओळख दाखविण्यास कोणाची हरकत नसावी. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजा पेक्षा परशुराम यांची पाहुण्यांना मूर्ती प्रतिमा भेट देऊन आणि मनोहर भिडे गुरुजीचे आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन त्यांना योग्य सहकार्य करून दाखविले.आणि यापेक्षाही भयंकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमीचे दैवतीकरण करण करून त्यांना त्यांच्या पराक्रमासह देव्हाऱ्यात बंधीस्थ करण्यात कोणतीही कसूर सोडली नाही.
त्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या छाव्यानं शिवाय कोणत्याही स्वतःच्या धडावर डोके नसलेल्या मराठा पत्रकार,संपादक,साहित्यिक,विचारवंत आणि शूरवीरांचे सैनिक आम्ही म्हणणारे उभ्या आडव्या महाराष्ट्र राज्यात कुठेच खळ्याळ खटाक आवाज करतांना दिसले नाही.बाकीच्या वेळी शुल्लक घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात आगी लावल्या जातात.म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठी माणसांनी प्रथम विचार करावा. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मराठी माणसांची,मराठ्यांची आहे की परशुराम श्रीरामाची?.आता ती सत्ताधारी कशामुळे आहे.याची वैचारिक चिकित्सा होणे आवश्यक आहे.
शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाली.असे म्हणले जाते की मुंबईत मराठी माणूस शिवसेनेमुळे होता आणि आहे. खरच मराठी माणूस कर्जत कसारा ते कुलाबा,मलबार हिल पर्यंत स्टेशन जवळपासच्या रस्त्यावर पोटभरण्यासाठी भाजीपाला,किराणा,कटलेरी,रेडिमेड कपडे विकणारा आणि रिक्षा,टॅक्सी गॅरेज,गारमेंट,वाचमन असे कामधंदे करणारा किती टक्के दिसतो?. सरकारी आकडेवारी सांगते की १९६६ पूर्वी मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी ही ७९ टक्के होती. तर गुजर मारवाडी परप्रांतीय उतरभारतीय भैय्या व इतर यांची संख्या ही २१ टक्के होती. २०११ चा जनगणना नुसार मुंबईतील मराठी टक्केवारी ६१ टक्के इतकी खाली आली आहे. म्हणजे मागील ५० वर्षात मराठी टक्का हा तब्बल १८ टक्क्यांनी कमी झाला. मुंबईतील महानगरपालिका संचालित मराठी शाळा जवळ जवळ बंदच करण्यात आल्या.मग मुंबईत मराठी माणूस कमी कसा झाला?.मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारी शिवसेना असतांना मराठी माणूस मुंबईत पोरखा कसा झाला?. छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना कुठे होती?.
गिरण्या कारखाण्यातील कामगार जागेसह उध्वस्त झाला. त्यांच्या जागेवर टोलेजंग टॉवर, इमारती कसा उभ्या राहिल्या. मराठी माणूस व महाराष्ट्र राज्य यानिमित्ताने बरेच प्रश्न उपस्थित होतात.मुंबई ठाणे शहरात असलेली शिवसेना "जयभवानी!. जयशिवाजी!!.". आणि "घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ" म्हणत मागासवर्गीय जाती जमातीवर हल्ले करून मोठी झाली असे जर लिहले तर चूक ठरणार नाही. समाजातील असंतुष्टांना जवळ करून त्यांनी प्रत्येक मतदार संघात प्रवेश केला.ते काही लोकांना पचविणे अवघड असले तरी तो शंभर टक्के सत्य इतिहास आहे.परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.कधी वाईटातून चांगले घडते.तर कधी चांगल्यातुन वाईट.राजकारण हे असेच संख्याबळावर आणि उपदव्यमुल्यांकना वरून ठरते. कालचा सत्ताधारी मित्र आजचा विरोधीपक्ष आहे.पन्नास साठ वर्ष सत्ताधारी असणारा पक्ष आता अदखल पात्र ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना सुरवातीला महाराजाचा फोटो व वाघाचा चेहरा ठेवत होती. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाल्या नंतर प्रचार पत्रकात महाराजांचा फोटो गायब झाला. शिवाजी पार्क दादरला दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवाजी महाराजांचा फोटो फ्लेक्सवर का नसतो?. असा प्रश्न तमाम स्वाभिमानी शिवसैनिकांना का पडत नाही. शासकीय शिवजयंतीला दैनिक सामना पेपर मध्ये महाराजांना अभिवादन का केले जात नाही. वडापाव सारख्या क्षुल्लक पदार्थास शिवाजी महाराजांचे नाव (शिव वडा) का दिले जाते. त्यापेक्षा बाळ वडा,उद्धव वडा स्वताच्या नांवाने का काढला जात नाही?. यामागचा खरा उद्देश कोणता?. छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना अशी भूमिका का घेते?.त्यामागची खरी विचारधारा समोर येते.
बाळासाहेब यांची जयंती महाराजा सारखी तिथीनुसार का होत नाही?. शिवजयंतीला ठाकरे कुटुंब शिवसैनिकांना घेऊन कधी शिवनेरी,रायगडावर का गेले नाही?. शिवसेनेच्या इतिहासात विधान परिषदेवर किती मराठी आमदार घेतलेत.जेम्स लेन प्रकरणात बहूलकराची माफी का मागितली?. वादग्रस्त लेखन असताना पुरंदरच्या पुरस्काराचे समर्थन का केले?. शिवसेनेने आता पर्यंत किती गडकोटांवर स्वच्छता मोहीम अथवा जीर्णोद्धार केला आहे?. मंदिर बांधण्यासाठी आग्रही असणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांनी शिवाजी महाराजांच्या नावाने किती शाळा,महाविद्यालये,क्रीडा संकुले ग्रंथालये काढली?. सत्यशोधक चळवळीची तडपती तलवार म्हणजे प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी लिहलेली पुस्तके पुन्हा प्रकाशित करून शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसांना का उपलब्ध करून दिली जात नाही?.
शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव मंडळे दरवर्षी शेकडो पानांचे आवाहल,स्मरणिका छापून प्रसिद्ध करता त्या ऐवजी दरवर्षी प्रबोधनकार ठाकरे यांचे क्रांतिकारी विचारांचे पुस्तक का प्रकाशित केल्या जात नाही. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना कोणत्या विचारधारेची आहे.त्यांनी आता आपल्या वैचारिक भूमिकेत परिवर्तन करणे आवश्यक आहे.आणि ती काळाची गरज आहे.ज्याप्रमाणे वैचारिक मित्र बदलले त्याच पद्धतीने राजकारणातील मित्रांना जोडणे आवश्यक आहे.
शिवसेना सत्ताधारी असतांना शेतकरी,कामगार,स्थानिक मराठी माणसाच्या लोकाधिकारासाठी का कायदेशीर कारवाई करीत नाही.सर्वच समस्या बाजूला ठेवून राम मंदिर हाच मुख्य मुद्दा का बनविण्यात आला होता. मागासवर्गीय,अल्पसंख्याक,आदिवासी, बहुजन समाज यांच्या विषयी शिवसेनेची वैचारिक भूमिका काय हे माहिती असूनही जी माणसं काम करतात ती स्वाभिमानी कसे असतील?.त्यांना लाचारच म्हणावे लागेलं.राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व महत्वाचे सार्वजनिक उधोगधंद्याचे खाजगीकरण होत असतांना आरक्षण आंदोलने तीव्र का होत नाहीत. मागासवर्गीय,अल्पसंख्याक,आदिवासी,ओबीसी बहुजन समाजच्या सार्वजनिक उधोगधंद्यातील निवृत्तीनंतर खाली झालेल्या जागा न भरता त्यांचे कामे कॉन्टॅक्ट पद्धतीने केली जात आहेत. त्याविरोधात शिवसेनेची व त्यांच्या ट्रेंड युनियनची भूमिका काय आहे?.या प्रश्नांची उत्तरे तथाकथित शिवसैनिकांनी द्यावीत आणि थोडा विचार करावा.शेवटी आपण ही देशातील समाजाचे एक मुख्य प्रवाहातील घटक आहोत हे विसरू नये.
छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी होती.वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारी होती. ती आज कुठे आहे?. कामगार,शेतकरी,विद्यार्थी आणि स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सत्ताधारी झालेली शिवसेना.हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व म्हणणारी आज मनुस्मृती आणि परशुराम श्रीरामाच्या महान इतिहास सांगण्यासाठी काम करतांना दिसते. म्हणूनच त्यांनी ऐतिहासिक शहरांचे नांव बदलण्याची भूमिका योग्य असेेेल तर शिवसेनेचे नामांतर श्रीराम सेना झालेच पाहिजे. असे का वाटत नाही.कोण कोणाला आणि का घाबरता? छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना शेवटी कोणत्या विचारधारेची आहे ही वैचारिक ओळख महत्वाची आहे की नाही.शिव जयंती कशी साजरी करणार साधा प्रश्न नाही. तर सत्ताधारी शिवसेना भारतीय संविधाना नुसार राज्य करणार आहे कि वर्णव्यवस्था मानणाऱ्या मनुस्मृती नुसार.त्यामुळेच प्रश्न विचारल्या जाणार छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेणारी शिवसेना कोणत्या विचारधारेची आहे.
सागर रामभाऊ तायडे ,9920403859,भांडुप मुंबई
0 टिप्पण्या