पॅथर ; दलित अस्मितेचा एक व्यक्त होणारा विद्रोह


 दलित पँथर या संघटनेला सन 2022 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने दलित पँथर या संघटनेने उभे केलेले आंदोलन असेल किंवा दलित  या शब्दाचा व्यापक अर्थ देवून उभा केलेला लढा हा भारतभर त्यावेळी गाजला. एवढेच नव्हेतर पन्नास वर्षानंतरही त्या चळवळीचा परिणाम दिसून येतो. पॅथरचा हा दबदबा दलित अस्मितेचा एक व्यक्त होणारा विद्रोह होता हे दिसते. पँथर ही चळवळ कशी आली, कशी झाली याचा एक इतिहास आहे. हा इतिहास नविन पिढीला माहित नाही. पँथर ही जातीधर्म विरहीत  संघटना होती जे संघटन रॅडीकल चेंज करण्यासाठी उभे राहिलेले संघटन होते. व्यवस्था बदल हा तीचा स्थायी भाव तथा कार्यक्रम होता. सहा हजार जाती मध्ये विभागलेला हा समाज एकसंघ करुन त्या विषयी जागृती करुन, जातीचे नावाने झालेला अन्याय, अत्याचार, विषमता नष्ट करण्यासाठी पँथर जन्मा आली होती. 

व्यवसाय परिवर्तन हे हिंदू समाज व्यवस्थेने नाकारलेले होते. एक जात दुस्रया जातीचा व्यवसाय करु शकत नव्हती. त्यामुळे गाव कुसाखालील व गावकुसा बाहेरील दलित जातीच्या विकासाचे चाकच कायमचे जमिनीत रुतलेले होते. हे चाक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढण्याची प्रेरणा दिली तिच प्रेरणा घेवून पँथर निर्माण झाली. सन 1950 नंतरची दलित तरुणांची पिढी शिक्षण घेवून बाहेर पडली. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारांची प्रेरणामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला. तो बंडाची भाषा करु लागला त्यातच आण्णा भाऊ साठे, बाबुराव बागूल यांचे कथेतील नाटक जन्माला आले. त्यांनी जातीय व्यवस्थेतील पिचलेल्या, भुकेल्या, शोषित, जागावलेल्या, बळी पडलेल्या माणसांची व्यथा नायक बोलत होते. पुढे हेच नायक नवनिर्मितीचे वाहक म्हणून साहित्यात उभे राहिले. 

त्यामुळे प्रस्थापित ब्राम्हणी, साम्राज्यवादी, वसाहतवादी, भोगवादी साहित्य प्रवाह हादरला त्यांचा परिणाम दलित तरुणांच्या मानसिकतेवर इतका प्रचंड झाला की, त्यांची मनाची धकधक वाढत गेली तो प्रश्नांनी बैचेन झाला. हजारो प्रश्न तो या व्यवस्थेला विचारू लागला त्यांच्या डोक्यातील हे प्रश्न त्याला सतावू लागले. या प्रश्नांची उत्तरे तो डॉ.आंबेडकर या तत्ववेत्यांचे दिलेल्या विचारात शोधू लागला. त्यावेळेस त्याला उत्तर मिळाले लढणे, लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल हे उत्तर त्यांचे मनात घर करु लागले.  हे डोक्यातील आंदोलन त्याला सतावू लागले आणि तो एकजञित पणे व्यक्त झाला तो दिवस होता दलित पॅथरचा स्थापना दिवस त्या दिवसापासून दलित पँथर हा विद्रोह पुढे आला. विद्रोह या शब्दाचा अर्थ अत्यंत समावेशक, व्यापक अर्थ घेऊन पुढे आला. 

जगात त्याच वेळेस ब्लॅक पँथर या काळया लोकांच्या हक्कासाठी लढण्राया संघटनेकडे जगाचे लक्ष होते. त्यांचा परिणाम भारतावर होणे सहाजिकच होते. त्यामुळेच ही ब्लॅक पँथर ऐवजी महाराष्ट्रात मुंबईमध्ये दलित पँथर उदयाला आली. दलित पँथर हे असे रसायन होते की, हजारो वर्षांचा अन्याय अत्याचारांचा हिशोब होण्यासाठी जिवघेणे हे सैनिक होते. विद्रोह करुन म्हणजे जुने नाकारुन- मनूचे कायदे नाकारुन नविन डॉ. बाबासाहेबांनी दिलेली लोकशाहीसाठी निर्माण केलेल्या भारतीय राज्य घटनेने दिलेल्या कायद्याची व अधिकारांची अंमलबजावणीची मागणी हा त्यांचा विद्रोह होता. 

आजही ब्राम्हणी कब्जात असलेले प्रस्तापित दलित लेखक हे विद्रोही म्हणजे नष्ट करणारे म्हणतात, त्यांना हे कळत नाही विद्रोही हे विषमता नष्ट करण्यासाठी व लोकशाही, समता निर्माण करण्यासाठी आग्रह धरणारे हे विद्रोहीच असताना हिच भूमिका पँथरच्या अभ्यासावरून दिसून येते. विद्रोहाचा व्यापक अर्थ येथे घेतला गेला, परंतू ब्रामणवादी भटकलेल्या साहित्यिक, विचारवंतांनी विद्रोह म्हणजे नासधुस एवढा सोयीचा अर्ज काढून पँथरच्या विद्रोहाला अनुउल्लेखाने मांडण्याचा प्रयत्न केला. तर आज ही काही ते करतच आहेत  

पन्नास वर्षाचा काळ निघून गेला आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक या बाबतीत प्रचंड पाणी पुलाखालून वाहून गेलेले आहे. नविन प्रश्न, नविन गाऱहाणे, भांडवलशाही, सरंमजामदारी पध्दतीने चाललेले राजकारण लोकशाहीच्या नावाने पैसे वाटून निवडणूका जिंकणारे पुढारी निवडणुकीसाठी प्रचंड पैसा खर्च करून पैसा कमवणारे सत्ताधारी भांडवलदारांना पाठीशी घालून सरकारी कारखाने, संस्था विकणारे सत्ताधारी यामुळे गरीब हा गरीब होत असून आर्थिंक, सामाजिक प्रश्नांनी भरडला जात आहे. 50 वर्षांनंतर ही आज काही बदल दिसत नाहीत. दलित जातींवरील अन्याय वाढलेले आहेत, तर महिला, अल्पसंख्यांक, आदिवासी, दलित इत्यादींवर अत्याचारांच्या घटना या धर्म, जात-वर्ग यांचे नावाने घडत आहेत. अन्याय करणारे लोकांना माञ शासन होत नाही. खैरलांजी पासून अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. तर भारतभर आदिवासी दलितांना विस्थापित करत त्यांना भूमिहीन केले जात आहे. त्यांचे संवैधानिक हक्क नाकारले जात आहेत तर, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे हक्क नाकारुन भांडवदारांच्या मर्जीप्रमाणे धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे.  

दलित पँथर मनुवाद्यांच्या ह्रदयात धडकी भरवणारे हे वादळ अरबी समुद्राकाठी घोंगावत होते हा इतिहास सर्वज्ञात आहे. वर्णवर्ग व्यवस्थावादी पंडीतांची बोलती बंद झाली होती तर पारंपारिक डाव्यांच्या डोळयातही अंजन घालण्याचे काम पँथरने केले आहे. डाव्या समाजवादी विचारवंतही जातीच्या प्रश्नावर भूमिका घ्यावी लागली हे पँथर चळवळीचे यश आहे, सन 1972 पुर्वी जातीचा प्रश्न गौण आहे म्हणणारे डाव्यांना जातीचा प्रश्नांन विषयी गंभीर व्हावे लागेल त्या मुळेच नामांतरांच्या आंदोलनात डावे पक्ष, संघटना उतरल्या हा इतिहास आहे. जाती निर्मूलनाचा मुद्या चर्चेत आला. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला जाती संघर्षाचा इतिहास भारतीय तत्वव्यक्तांना समजून घ्यावा लागला. दलित पँथर ने हे समिकरण जास्त प्रभावी पणे मांडले आहे. त्यांचा परिणाम आज जयभीम काँम्रेड असा दिसतो आहे. कामगाराला जातीत विभागले गेले तो कामगार म्हणून कामगारांच्या प्रश्नांवर लढला परंतू जातीच्या अहंकाराने त्याला परिवर्तनशिल बनवले नाही म्हणून कामगाराने दलित पँथरकडे जातीय भावनेतूनच बघितले. पँथरला कामगार चळवळीने आश्रय दिला नाही त्यांचे कारण त्यांचे नेत्यांच्या डोक्यात असलेली जातजाणीवा मार्क्स त्या कामगारांना कळल्याच नाही किंवा प्रस्तावित नेतफत्वाने त्याला कधी मार्क्स कळूच दिला नाही. पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांनी डॉ.आंबेडकरही अभ्यासले नाहीत त्यामुळे मार्क्स-आंबेडकर हे तात्विक समिकरणाची घुसळण होऊ दिली नाही, न होवू देण्यामागे तथाकथित आंबेडकरवादी असे जबाबदार आहेत, 

तसेच तथाकथित डावे समाजवादी ही जबाबदार आहेत. दलित या शब्दाला वर्गीय अर्थ आहे, सामाजिक अर्थ आहे व शब्द जातीवाचक नसून अवस्थादर्शक आहे, असे असतानाही काही लोकांनी जाणून बुजून या शब्दाला जातीवाचक संबोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयोग केला. त्यामुळे पँथरला अपेक्षित असलेला क्रांतीकारी बदल हानून पाडण्यात ते यशस्वी झालेले आहेत. जात जमातवाद, धर्म आणि राष्ट्र यांची सांगड घालणाऱयांना पँथर ने डरकाळी फोडून आव्हान दिले होते. त्या वेळी आम्ही सांगू ते राष्ट्रवाद म्हणणारे गप्प झाले होते. पुढे माञ त्यांची दलितांनाच हाताशी धरून गांधी विरुध्द आंबेडकर असा वाद निर्माण करून आमच्यात झुंझी लावलेल्या आहेत आणि ते नाम निराळे राहिलेले आहेत. भावनिक असलेला आंबेडकर वादी तरूण त्यांच्या या खेळीला बळी पडला ते आज स्पष्टपणे दिसत आहे. गांधीचा खुन करणारे आज देशप्रेमी ठरत आहेत. तर जातीय, धर्मीय समतेवर आवाज उठवणाऱयांना दाबले जात आहे. 

सरकार किंवा त्यांच्या धोरणावर टिका करणाऱयांना जेलची भिती दाखवली जात आहे. मानव अधिकार विषयी बोलणाऱयांना, लढणाऱयांना तुरुंगात डांबले जात आहे. पँथर हे मानवतेसाठी, मानवी हक्कासाठी लढणारी संघटना होती. त्यामुळे या विषयावर समिती भर देवून मानवी अधिकारांची होणाऱया पायमल्ली विषयी वैचारिक जागफती करेल. पँथर चळवळीच्या इतिहासाशी बांधिलकी सांगेल. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर समिती असेच कार्यक्रम आयोजित करुन, भारतभर कार्यक्रम घेवून जाण्याचा प्रयत्न करेल. डॉ. आंबेडकर हे आता भारतभर गेलेले रसायन आहे हे रसायन माणसांना पेटवते हे भारतभर झालेल्या वेगवेगळया घटनांविषयी झालेल्या आंदोलनाने दाखवून दिलेले आहे. रोहित वेमुला विषयीचे आंदोलन असेल किंवा रिडल्स वरील आंदोलन असेल किंवा हिंदी पट्टयात झालेल्या जातीय अत्याचारांविषयीची आंदोलने असतील ही सर्व आंदोलने आंबेडकरवादी तरुणांनी नेत्यांची वाट न पाहता यशस्वी केलेली आहेत. ही प़ँथरची यशस्वी लढाई आहे.  

- अॅड. नाना आहिरे - ठाणे
98208 55101


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या