Top Post Ad

"त्या" महिलेला गावात जगणे मुश्किल

 उत्तराखंडमधील एका सरकारी शाळेत तथाकथित उच्चवर्णीय आणि इतर यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचण्याची चिन्हे दिसत आहे. स्वत:ला उच्चवर्णिय समजणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत जेवण बनवणाऱ्या महिलेच्या हाताचे जेवायला नकार दिला कारण काय तर, ती महिला दलित आहे. यामुळे त्या दलित महिलेला शाळेने जेवण बनवण्याचे काम बंद करायला लावले.  आणि त्या ठिकाणी तथाकथित उच्चवर्णिय महिलेची नियुक्ती केली. मात्र आता या गोष्टीचा निषेध करीत आम्ही या स्वत:ला उच्चवर्णिय समजणाऱ्या महिलेच्या हातचे जेवण खाणार नाही असा पवित्र इतर विद्यार्थ्यांनी घेतला असल्याने गावात चर्चेचा विषय झाला आहे. .   चंपावतचे उपशिक्षणाधिकारी अंशुल बिश्त या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सदर घटनेबाबत प्रधान दीपक राम यांनी लेटर पॅडवर एक निवेदन जारी केले आहे की, गावात काही लोकांकडून विनाकारण जातीवाद आणि अराजकता पसरवली जात आहे. भोजनमातेच्या नियुक्तीला विरोध न केल्याने पाच प्रभाग सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिल्याचे सांगितले. सदस्यांनी गुरुवारी टनकपूर गाठून एसडीएमकडे सामूहिक राजीनामे सादर केले. राजीनामे दिलेल्या सर्वच वॉर्ड सदस्यांवर गावात अराजकता निर्माण करून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. आपल्या कार्यकाळात झालेल्या सर्व विकासकामांचा तपशील देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, उच्च जातीतील विद्यार्थ्यांनी दलित प्रवर्गातील महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तुम्ही जर दलित प्रवर्गातील महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार देत असाल तर आम्हीसुद्धा उच्चवर्णीय महिलेच्या हाताने बनवलेले अन्न खाणार नाहीत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. प्राचार्य प्रेम सिंह यांनी शिक्षणाधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील एकूण ५८ मुले शासकीय आंतर महाविद्यालय सुखीधांग येथे पोहोचली. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने सर्व मुलांना एमडीएममध्ये जेवणासाठी बोलावले असता, दलित विद्यार्थ्यांनी सवर्ण महिलेने तयार केलेले जेवण स्वीकारण्यास नकार दिला.

शिक्षकांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहून जेवणावर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार दलित प्रवर्गातील सर्व मुलांनी उच्च जातीतील महिलेने हाताने बनवलेले अन्न खाण्यास विरोध केला आहे. त्यांनी घरून डबा आणणार असल्याचे सांगितले. दलित प्रवर्गातील २३ मुलांनी शुक्रवारी शाळेत जेवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी, सीईओ आर सी पुरोहित यांनी तपासादरम्यान जेवण बनवणाऱ्या दलित महिला सुनीता देवी यांना काढून टाकले होते आणि पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती स्थगित केली होती. त्यानंतर आता दलित प्रवर्गातील मुलांनी जेवणावर बहिष्कार घातल्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. एका सरकारी माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजन देणाऱ्या दलित समाजाच्या महिलेने उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसाठी शिजवलेले जेवण खाण्यास नकार दिल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला भोजनमाता म्हणून तिची नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, विद्यार्थ्यांनी महिलेने बनवलेले जेवण तिच्या जातीमुळे खाणे बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घरातून डब्यातून जेवण आणण्यास सुरुवात केली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दलित समाजातील महिलेने बनवलेले जेवण खाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सुनीता देवी नावाच्या महिलेला १३ डिसेंबर रोजी चंपावत जिल्ह्यातील सुखीधांग शासकीय आंतर महाविद्यालयात इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी सुनीता देवी यांनी   शिजवलेले अन्न खाण्यास नकार दिला होता असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना शाळेतून तसेच या पदावरून काढून आलं. हा मुद्दा बराच पेटला..अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. धामी यांनी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) कुमाऊँ नीलेश आनंद भरण यांना सुखीधांग येथील शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते.

दलित समाजातील महिलेला भोजनमाता म्हणून नियुक्त करण्यावरही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतला होता. चंपावतचे मुख्य शिक्षण अधिकारी आर.सी. पुरोहित म्हणाले की, नियुक्ती करताना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याने महिलेची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. मात्र सुनीता देवी या पदासाठी पात्र असल्याचा दावा देखील चंपावत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दावा केला होता.  शाळेचे मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी सुनीता देवी यांना कामावर ठेवले होते. त्यासाठी त्यांनी यापूर्वी पुष्पा भट्ट या उच्चवर्णीय स्वयंपाकीणीची त्यांच्या स्तरावर नियुक्ती नाकारली होती. पुष्पा भट्ट यांना नियुक्ती पत्र दिले गेले नाही आणि संपूर्ण निवड प्रक्रिया स्वतः मुख्याध्यापकांनीच रद्द केली होती. अशी माहिती पुरोहित यांनी दिली.

सीईओ असंही म्हणाले कि, “आता सुनीता देवीची हकालपट्टी करण्यात आली आहे, परंतु सुनीता देवी महत्वाच्या पात्रता पूर्ण करणाऱ्या  इतर सर्वांपैकी एकमेव अर्जदार असल्याने त्यांची पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता आहे.” या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे नव्याने निवड प्रक्रिया सुरू होईल…आणि कदाचित सुनीता देवीची पुन्हा निवड होऊ शकते. 

उत्तराखंडमधील प्रत्येक उच्च माध्यमिक शाळेत दोन पालक संघटना आहेत- इयत्ता ६ ते ८ साठी SMC आणि उच्च वर्गांसाठी PTA. त्यानुसार, ‘भोजन माता’ची नियुक्ती शाळेच्या मुख्याध्यापकांनी एसएमसी अध्यक्षांशी सल्लामसलत करूनच केली आहे कारण मध्यान्ह भोजन योजना इयत्ता ६ ते ८ वीच्या मुलांसाठी आहे. पण त्या अगोदर, शाळेने अधिसूचना जारी केल्यानंतर पीटीएशी सल्लामसलत करून सुखीधांग शाळेच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वी पुष्पा भट्ट या उच्चवर्णीय महिलेची नियुक्ती केली होती. नोकरीसाठी अर्ज केलेल्या सहा उमेदवारांमधून भट्ट यांची निवड करण्यात आली. नियमानुसार, भोजनमातेच्या नियुक्तीसाठी मुख्याध्यापकांनी पीटीएऐवजी एसएमसीशी संपर्क साधायला हवा होता, मग प्राचार्य प्रेम सिंग यांनी नंतर भट्ट यांची नियुक्ती रद्द केली आणि शाळेच्या शेफच्या निवडीसाठी नवीन तारखांसह दुसरी अधिसूचना जारी केली.    यामध्ये, नियुक्तीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास जातीतील महिलांना प्राधान्य दिले जाईल, असेही नमूद केले होते.

त्यानंतर एकूण १०-११ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी ५  उच्चवर्णीय आणि ५ अनुसूचित जातीतील होत्या. शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्राचार्य चंद्रमोहन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली चार शिक्षकांची समिती स्थापन करून या अर्जांची छाननी करून बीपीएल श्रेणीतील दलित महिला सुनीता देवी यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर या अर्जांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये अर्जदारांव्यतिरिक्त पीटीए अध्यक्ष नरेंद्र जोशी, एसएमसी अध्यक्ष स्वरूप राम, बीडीसी सदस्य दीपा जोशी, गावप्रमुख जौल दीपक कुमार, गावप्रमुख श्याला जगदीश प्रसाद आणि मुख्याध्यापक (कोण) त्या दिवशी कामानिमित्त बाहेर होते. प्रभारी प्राचार्य चंद्रमोहन मिश्रा प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. या बैठकीत सवर्ण प्रतिनिधींनी पुष्पा भट्ट यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि दलित समाजातील लोक सुनीतादेवींच्या बाजूने होते.

वादावादी झाल्यानंतर दलित समाजातील सदस्य सभा सोडून निघून गेले. उच्चवर्णीयांनी पुष्पा भट्ट यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो बहुमताने मंजूर केला. पण मुख्याध्यापकांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर आणखी एक बैठक झाली. पण त्या बैठकीत उच्चवर्णीय प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने सुनीतादेवी यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मग मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी सुनीता देवी यांना १३ डिसेंबरपासून कामाला सुरुवात करावी, मात्र जोपर्यंत नियमानुसार ब्लॉक शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत काम करत राहा असं सांगितलं. थोडक्यात हि नोकरी तोपर्यंत अनधिकृत सरकारी नोकरी होती. 

सुनीता देवी किंवा पुष्पा भट्ट या दोघांनाही नियुक्ती पत्र मिळाले नव्हते. कोणत्याही औपचारिक नियुक्ती पत्राशिवाय त्यांची निवड केली गेली आणि त्यांना नियुक्त करण्यात आले. असं समोर आल्यानंतर प्राचार्यानी सांगितले कि, भट्ट यांनाही औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते. एकदा SMC द्वारे नाव निश्चित केले की, DEO द्वारे त्याची पुष्टी करणे आवश्यक होते. मात्र दोन्ही प्रकरणांमध्ये तसे झाले नाही.

 पुरोहित यांनी असंही सांगितले कि, “मुख्याध्यापकांच्या कार्यशैलीमुळेच उच्च जातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त केले, ज्यांनी त्यांच्या मुलांना सुनीता देवींनी शिजवलेल्या अन्नावर बहिष्कार टाकण्यास सांगितले. आता त्यांनी विरोध करताना अन्नावर बहिष्कार न टाकता, त्यांनी निवड प्रक्रियेला विरोध करत होते.  भट्ट यांची नियुक्ती आधीच झाली असताना प्राचार्यांनी नव्याने अर्ज का मागवले हा PTA सदस्यांचा प्रश्न होता, त्यामुळे हा मुद्दा पेटलाय.  पीटीएचे अध्यक्ष नरेंद्र जोशी हे मात्र दावा करतायेत की, या प्रकरणात जातीचा मुद्दाच येत नाहीये तर त्यांची निवड करण्याच्या वादाशी संबंधित हे प्रकरण आहे. असो आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे लवकरच यातून मार्ग निघेल हे मात्र नक्की.

सुनीता देवी यांनी माध्यमांना सांगितले की,  आठवडाभर शाळेत काम केले होते आणि २१ डिसेंबरला तीन दिवस सुट्टी घेतली होती, पण त्यानंतर पुन्हा शाळेत येऊ दिले नाही. “१४ डिसेंबर रोजी, सुमारे २५-२६ पालक शाळेत आले आणि शिक्षक आणि स्वयंपाकघरातील कामगारांवर आरडाओरडा करू लागले. पालकांचं म्हणणं होतं कि, त्यांच्या मुलांना खालच्या जातीतील महिलांनी बनवलेले अन्न खाण्यास भाग पाडले जाते. शाळेतील शिक्षकांनीही या सगळ्याला विरोध केला, तेही उच्चवर्णीय असले तरी. पण पीटीए (पॅरेंटल टीचर्स असोसिएशन) च्या सदस्यांनी मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. मला भीती वाटते कारण गावकऱ्यांनी माझ्याशी बोलणेही बंद केले आहे. जेव्हा आम्ही तिथून जातो तेव्हा ते माझ्या जातीवर आणि कुटुंबाविरुद्ध टीका करतात. माझी दोन्ही मुलं एकाच शाळेत शिकतात आणि नवरा मजूर आहे. आमच्याकडे इतर ,कोणतेही कमाईचे दुसरे साधन नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com