त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं- अमित शहा

त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती उघड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला. पुणे येथील आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीचा तपशील जाहीर केला. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं.  मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आणि म्हणतात आम्ही असे म्हणालोच नाही, अशी टीकाही शहा यांनी यावेळी केली. 


  मातोश्रीवरील बैठकीत अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला फक्त अमित शाह आणि आपल्यामध्येच चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली होती. तसेच त्या बैठकीवेळी देवेंद्र फडणवीस हे खोलीच्या बाहेर उभे होते असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. या गोष्टीला जवळपास दोन वर्षे लोटल्यानंतर याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा भाष्य केले. विशेष ग्हणजे यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी अनेक वेळा विचारणी केली होती. परंतु त्यावेळी त्यांनी आमच्यात फक्त ठरलंय ऐवढेच सांगत होते.

मात्र आज शहा यांनी ही गोष्ट उघड केली, ते पुढे म्हणाले,  स्वत: ठरलेल्या गोष्टींवर घुमजाव केलं आणि म्हणतात मी खोटं बोलत आहे. मी खोटं बोलतोय असं थोडावेळ मानूही. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते, त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमच्या फोटोची एक चतुर्थांश साईज होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होते. तुमच्या उपस्थितीत मी आणि मोदींनी सांगितले होतं की, फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होते. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसलात असा आरोपही त्यांनी केला.

आपल्या भाषणात त्यांनी महाआघाडी सरकारवरही टिकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डायरेक्ट ट्रान्सफर मनी या योजनेचा महाविकास आघाडीने वेगळाच अर्थ काढल्याचे सांगत राजीनामा द्या आणि मैदानात या, आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार असल्याचे आव्हानही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला त्यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्फरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसने त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सकरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार  हवं? असा सवाल त्यांनी केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले.  मी प्रार्थना करतो ळी त्यांची तब्येत ठिक व्हादी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली. देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला  कर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला. पण यांना काही वेगळंच ऐकायला आले, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. अरे भाई, दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं, अशी खोचक टीका त्यांनी यादेळी केली.

तसेच आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल १५ रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे असेही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाळं पक्ंचर असून हे सरकार  हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडून प्रदुषण करतय या शब्दात त्यांनी राज्यातील महादिळास आघाडी सरकारची खिल्ली उठविली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या