मुंबई- पीएम केअर फंडाच्या वेबसाइट आणि पोस्टरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि नाव काढून टाकण्याबरोबरच राष्ट्रीय चिन्ह असलेलें चारस्तंभ, राष्ट्रध्वजही काढून टाकावे जशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दाखल केली आहें. पीएम केअर फंडावर या दोन्ही गोष्टी वापरल्याने राष्ट्रीय कायद्याचा भंग होत असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय चिन्ह असलेले चारस्तंभ, राष्ट्रध्वज वापरण्यास मनाई करादी अशी मागणीही चव्हाण यांनी या याचिकेद्वारे न्यायालयाकडे केंली.या याचिकेवर सुणावनी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे उत्तर मागितले असून २३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला दिले. तसेच पुढील सुणावनी ३ जानेवारी २०२२ ठेवण्यात आली आहे या याचिकेवरील सुणावनी युंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुणावनी झाली. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारने उत्तर देण्याचें आदेश देत सुणावनी पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांचे वकील सागर जोशी यांनी याप्रकरणी केंद्र सरकारने अद्याप उत्तर दिले नसल्याची बाब निदर्शनास आणुन दिंली. त्यावर न्यायालयाने अटर्नी जनरल अनिल सिंग यांना सुणावनीस हजर राहण्याचे आदेश दिले. त्यावर अनिल सिंग यांनी केंद्र सरकारनें त्याबाबत अद्याप कोणतेही प्रतिज्ञा पत्र सादर केले नसल्याचे सांगत सदरची सुणावणी ख्रिसमस सुट्टीकालानंतर ठेवावी अशी मागणी केली.
0 टिप्पण्या