Top Post Ad

सामाजिक अभिसरणाचे प्रणेते... महात्मा जोतीराव


बहुजन समाजाच्या शिक्षित उच्चशिक्षित तरूण तरुणी यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे विचार त्यांच्या काळातिल स्थीति - परिस्थितिच्या संदर्भातच समजुन घेतले पाहिजे..उदाहरण द्यायचे झाल्यास अगदी सुपरिचित महात्मा जोतीराव फुले यांची रचना.........

"विद्येविना मती गेली।मतीविना नीती गेली ।
 नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले । एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले."
शुद्र / अतिशुद्र अर्थात (sc st obc) बहुजनांच्या अधोगतिचे सत्यानाशाचे मुळकारण जर काय असेल ते म्हणजे "अज्ञान" आहे. शिक्षण देऊनच अज्ञानाचे कारण जर नष्ट केले तरच---- मती, नीति, गति, वित्त इत्यादि सर्व अवगुण आपोआप नष्ट होऊन शुद्र व अतिशुद्रांचे sc st obc मानसिक खच्चिकरण वैदिकब्राह्मण पंडितांनी केलेले आहे ते नष्ट होईल


 मानवी जीवनात विद्या किती महत्वाची आहे ते महात्मा फुले यांनी आपल्या ह्या अखंडातून मांडलं आहे. वैदीकब्राह्मणी मनुस्मृतीप्रणित व्यवस्थेने हजारो वर्षे शूद्रातीशूद्रांना sc st obc ज्ञानापासून वंचित ठेवलं. त्याचे परिणाम शूद्रातीशूद्रांना ऐतिहासिक काळातही भोगावे लागले आणि आजही भोगावे लागत आहेत. ब्राह्मणांनी ज्ञानाची मक्तेदारी आपल्याकडे ठेवल्याने सत्ता कोणाचीही असो पण त्या व्यवस्थेत ब्राह्मणांना ज्ञानाच्या बळावर शिरकाव मिळत होता. ब्राह्मणांच्या एका हातात धर्मसत्ता आणि दुसऱ्या हातात राजसत्ता राहिल्याने त्यांचा दुरुपयोग करुन इतर सर्वांचं शोषण करणं आणि त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणणं त्यांना सहज शक्य झालं.

 मोगलाई असो, आदिलशाही असो, निजामशाही असो वा कुतुबशाही असो सर्व राजसत्तेत ब्राह्मण होतेच. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्वांच्या दरबारात ब्राह्मण होते. स्वराज्यातही होते. राखीव जागांचे जनक असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कारभारी मंडळीत, दोन व्यक्ती सोडता उर्वरित सर्व ब्राह्मण होते असं य.दि. फडके यांनी आपल्या "ऐसी कळवळ्याची जाती" या ग्रंथात लिहिलं आहे. इतकंच काय पण इंग्रजांच्या राज्याचा प्रमुख आधार ब्राह्मण वर्गच होता. महात्मा जोतीराव फुले यांनी इंग्लंडच्या राणीला लिहिलेल्या,
सत्ता तुझी राणीबाई हिंदुस्तानी जागृत नाही जिकडे तिकडे भटशाही ,डोळे उघडून पाही.
या पत्रावरुन इंग्रजी राज्यात ब्राह्मणांचा किती सुळसुळाट होता ते लक्षात येतं. विद्या, ज्ञान, शिक्षण ही सुखी, समृद्ध, सुरक्षित जीवनाची मुख्य गुरुकिल्ली आहे. ज्यांनी ज्यांनी शूद्रातीशूद्रांच्या अवनतीविषयी विचार केला त्या प्रत्येकाला हे लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कार्याची सुरुवातच शिक्षणापासून केली.

महात्मा जोतीराव फुले यांच्या काळात जसा ब्राह्मण कांगावा करत असत की मुली शाळेत गेल्या की धर्म बुडतो. बालविधवांचं केशमुंडन करुन त्यांना विद्रूप केलं नाही तर धर्म बुडतो. अस्पृश्यांच्या स्पर्शाने धर्म बुडतो. शूद्र शिकायला लागले की धर्म बुडतो. चहा पिला की धर्म बुडतो. समुद्रोलंघन केलं की धर्म बुडतो. दुसऱ्या जातीच्या लोकांबरोबर सहभोजन केलं तरी धर्म बुडतो. आज कोणीही सामान्य हिंदू ब्राह्मणांच्या तशा कांगाव्याला बळी पडत नाही. पण एकेकाळी मात्र बळी पडत होते म्हणून तर महात्मा जोतीराव आणि महात्मा सावित्रीमाई फुले यांना नेसल्या वस्त्रानिशी घर सोडून बाहेर पडावं लागलं होतं ‌आणी त्यांच्याच त्याग, बलिदान आणि समरपणातू आज करोडो मुले-मुली शिकत आहेत कुठे हिंदूधर्म बुडाला?

 सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता हद्दपार झाली आहे. लोक एकत्र येतात, नुसती सावलीच पडत नाही तर शेजारी शेजारी खेटून बसतात. एकत्र भोजन करतात. प्रसंगी आंतरजातीय विवाहही होतात. पण त्यामुळे हिंदुधर्म कुठे धर्म बुडाला? त्याकाळी समुद्र उल्लंघन वैदीकब्राम्हणाने धर्म विरोधी घोषित केल्याने  महाविद्वान म्हणवल्या जाणाऱ्या टिळकांनीही पंचगव्य(गोमुत्र-शेण) प्राशन केलं होतं. दिनकरराव जवळकरांनी त्यावर अत्यंच जळजळीत शब्दात, "परदेशगमन पापाचे, क्षालनार्थ शापाचे, शेणाचा गिळला गोळा.." अशा कडक शब्दात टीका केली होती. आज शिक्षणासाठी, रोजगारासाठी, पर्यटनासाठीही लोक कित्येक समुद्र ओलांडून जात आहेत. जातात तर जातात तिथे जे नाही ते खातात, पितात. परतल्यावर पापक्षालन करण्यासाठी शेणही खात नाहीत. पण म्हणून काय हिंदूधर्म बुडाला?

आज शिक्षणामुळे मुली नोकरी करून‌ आपल्या पायावर उभ्या आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात, त्यांचे लग्नाचं वय बरच वाढलं आहे. म्हणून काय हिंदूधर्म बुडाला? अशा गोष्टींमुळे धर्म बुडतो या ब्राह्मणांच्या निव्वळ थापा होत्या हे आता सिद्ध झालं आहे. आता त्या थापांना बहुजनलोक फसत नाहीत, लोक शिक्षणाने शहाणे झाले आहेत. ब्राह्मणाने वैदीकधर्माचा फालतू गोष्टींचा बाऊ करायचा, लोकांना फसवायचं, घाबरवायचं आणि मग भयगंडाने पछाडलेल्या या निर्बुद्ध समुहाचा वापर आपल्या कुटील, स्वार्थी हेतूसाठी करुन घ्यायचा. आज हिंदू धर्मात बाईचा पदर खांद्यावरच आला नाही, तर स्त्रीया सोईनुसार कुठे कुर्ता-पायजमा वा शर्टपँन्ट वापरायला लागल्या आहेत. शेतात काम करणाऱ्या स्त्रियाही कामावर आल्या की शर्टपँट घालतात आणि दिवसभर काम करतात. साड्यांपेक्षा हा पोशाख अधिक सोईचा आणि सुटसुटीत असतो. नऊवारी नेसणाऱ्या, हातभर पदर काढणाऱ्या, कपाळभर कुंकू लावणाऱ्या स्त्रियांचा सगळा साजच बदलून गेला आहे. पण हिंदूधर्म त्यामुळे बुडाला नाही
वैदीक ब्राम्हणांच्या सांगण्यावरुन साप, साप म्हणून sc st obc बहुजन‌भुई धोपटतत होतं हे आता निर्विवादपणे सिद्ध झालं ते वैदीक ब्राह्मणांचे थोतांड आहे. तेंव्हा साप, साप म्हणून ज्याची भीती दाखवली जात होती ती एक निरुपद्रवी, निरुपयोगी दोरी असल्याचं आज शिक्षणा मुळेच सिद्ध झालं आहे.

मानवी जीवनात शिक्षणाचं महत्व फार आहे. शिकणं ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. प्राणी जगतात जगण्याची कला काही उपजत तर काही शिक्षणातून, अनुभवातून साध्य होते. साधं कुत्र्याच्या पिल्लाचं उदाहरण घेतलं तरी असं दिसतं की जन्मतःच त्याचे डोळे उघडलेले नसतात. तरीही ते त्याच्या आईचे स्तन बरोबर शोधून काढतो आणि लुचतो. हे पिल्लू मोठं होत जातं, तसतसं त्याचं प्रशिक्षण सुरु असतं. कुत्र्याची पिल्लं त्याच्या आईबरोबर खेळताना ज्यांनी पाहिली असतील त्यांच्या लक्षात येईल की कुत्री त्या खेळातून पिल्लाला जीवनाचे धडे देत असते. धावायचं कसं ? पाठलाग कसा करायचा ? हल्ला कसा करायचा ? हल्ला चुकवायचा कसा ? कुरघोडी कशी करायची आणि वेळ आल्यास जीव बचावून पळून कसं जायचं हे श्वान जीवनात जगण्यासाठी आवश्यक शिक्षण या खेळातून मिळत असतं. या शिक्षणाला पुढे अनुभवाची जोड मिळत जाते. त्यातून गिरवलेले धडे पक्के होत जातात. 

शिकारी प्राण्यांचं शिक्षण प्रामुख्याने हल्ला कसा करायचा हेच असतं. तर हरणासारखे शिकार होणारे प्राणी संकट येताच तिथून चटकन् पळून जाऊन जीव कसा वाचवायचा याचंच शिक्षण आपल्या पिल्लांना देतात. हरीण काही वाघाशी टक्कर देऊ शकत नाही. म्हणून शक्य तितक्या वेगाने वाघापासून दूर पळून जाण्याची कला शिकणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं.  वाघ गवत खाऊन राहू शकत नाही. त्यामुळे तो जर शिकार करु शकला नाही तर जगू शकणार नाही. म्हणून त्याला शिकार करण्याचं शिक्षण योग्य वयात मिळणं हे त्याच्या हिताचं असतं ह्या सत्याचा उलगडा करताना‌संत तुकाराम महाराज म्हणतात......
  "शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ।।"
 त्याचा हाच अर्थ आहे. ज्याने हित साधलं जाईल असं शिक्षण देणं ही नीती असली पाहिजे. योग्य शिक्षण मिळालं नाही तर काय होतं त्याचं प्रत्यंतर मानवाच्या इतिहासात वारंवार आलं आहे. प्राणी जगतातलं जगणं एका अर्थाने सोपं नसलं तरी साधं, सरळ आहे. पण मानवी जगणं फार, फार गुंतागुंतीचं आहे. 

मानवी जगण्याचा परिघ प्रचंड व्यापक आहे. आताच्या कोरोना महामारीचे संकटाचं पहा. चीनच्या वुहान प्रांतातल्या एका डोळ्यांनाही न दिसणाऱ्या सूक्ष्म विषाणूचा सह्याद्रीच्या कुशीत, जंगलात जगणाऱ्या आदीवासी माणसाशी प्रत्यक्षात काही संबंध येईल याचा विचार कोणाच्या स्वप्नात आला तरी आला होता का ? पण तो संबंध आला आणि त्याला तोंड कसं द्यायचं ते शिकवावं लागलं. मुक्त जगणाऱ्या समाजावर कोरोनामुळे अनेक बंधनं लादली गेली. कोरोनाला तोंड कसं द्यायचं ते शिकणं प्रत्येकाच्या हिताचं आहे नाही तर मरण अटळ आहे.
म्हणूनच आम्ही असे म्हणतो की....
खरे हेच ज्ञान आत्मपरिक्षण।  बुद्धिचे लक्षण जोती म्हणे ।।
*********
संग्रहित mn sonawane pune

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com