Top Post Ad

चर्चा उपटसुंभ लोकांच्या...आणि वास्तव


 भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर दोन वर्षे चर्चा झाली, अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 17 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा अंतिम मसुदा घटना समिती समोर सादर केला,ही राज्यघटना संमत करण्यासाठी त्यावर ठराव मांडण्यात आला,आणि या ठरावावर बोलण्यासाठी सत्तर पेक्षा जास्त नावं अध्यक्षांकडे आली, यातील बऱ्याच जणांनी भाषणे केली,घटनेबद्दल आपले विचार मांडले,त्यातील काही सदस्यांचे विचार येथे देत आहे,म्हणजे बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार होते की नाही? अशी चर्चा करणाऱ्या बऱ्याच उपटसुंभ लोकांना कळेल.

  1. फ्रॅंक अँथनी:- हा एवढा प्रचंड न किचकट दस्तावेज तयार करण्यासाठी किती प्रचंड श्रम व मनाची एकाग्रता लागली असेल याची आपणापैकी कुणालाही कल्पना येऊ शकेल असे मला मुळीच वाटत नाही, त्यांची विषयावरील प्रचंड पकड, निव्वळ मूलभूत तत्त्वांवरील नव्हे तर बारकाव्याबदलदेखील. आणि या सर्वाचे स्पष्टीकरण सुटसुटीतपणे करून स्वतःची बाजू मांडणारे त्यांचे भाषण ऐकताना मला नेहमीच अत्यानंद वाटत असे. (CAD, Vol. XI, 25-11-49, P. 938-39)
  2. डॉ. पट्टाभिसीतारामय्या: आपले मित्र डॉ.आंबेडकर बाहेर गेलेले आहेत. तथापि मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हे जे अप्रतिम व प्रचंड असे काम त्यांनी केले, त्याकरिता रस्ता गुळगुळीत करण्यासाठी लागणाऱ्या वाफेच्या इंजिनाची शक्ती असलेली बुद्धिमत्ता त्यांनी वापरावी. कुणालाही न जुमानणारी, दडपणाला बळी न पडणारी, अजिंक्य अशी त्यांची बुद्धिमत्ता "पाम" वृक्षाप्रमाणे उंच दिग्गज असोत की खुरटी झुडुपे असोत, त्या सर्वांचे ती दमन करीत असते . त्यांना जे योग्य वाटेल त्याकरिता ते परिणामांची पर्वा न करता उभे राहतात” ( फुले - आंबेडकर संशोधनातील प्रदूषणे,वसंत मून, पृ . ४४ )
  3. ओ.व्ही.आलगेसन ( मद्रासचे सदस्य ) : ' The Drafing Committee and all those who have connected with its labours have been rightly congratulated and we are sure to miss the stentorian voice of Dr. Ambedkar explaining in a crystal clear manner the provisions of the constitution. ( CAD , Vol. XI , 24-11-1949 , P. 901)
  4. महावीर त्यागी:- A concrete picture is before us. Dr. Ambedkar who was the main artist has laid aside his brush and unveiled the picture for the public to see and comment upon.'( फुले-आंबेडकर संशोधनातील प्रदूषणे,वसंत मुन,पृष्ठ ४४)
  5. जसपतराय कपूर:- (उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी) : पूर्वी माझ्या मनात आंबेडकरांबद्दल बराच पूर्वग्रह होता. म.गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर उपोषण केले होते,त्यावेळी बोलावणे पाठवूनही आंबेडकरांनी म्हटले की, मला महत्त्वाचे काम आहे,व ते तीन दिवसपर्यंत त्यांना भेटले नाहीत.त्या घटनेमुळे माझ्या मनात आंबेडकरांबद्दल अढी निर्माण झाली होती,परंतु गेल्या तीन वर्षांपासून आंबेडकरांनी रात्रंदिवस जे महान कार्य केले, जे राष्ट्रीय दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे, त्यावरून माझ्या मनातील संदेह तर नष्ट झालाच परंतु आदरही निर्माण झाला. माझ्या मनातील सर्व शंका नष्ट झाल्या आणि माझ्या मते आज भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रभक्तांत त्यांची गणना करायला हवी. अनेकदा काही महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसे,अशा वेळी आंबेडकर हे उपयुक्त व व्यवहारी सूचना करीत. त्यामुळे प्रश्न तात्काळ सुटत असे.(CAD,vol-XI,23-11-1949 P. 788)
  6. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर (जगप्रसिद्ध घटनापंडित) :- माझे मित्र माननीय डॉ.आंबेडकर यांनी या घटनेचा आराखडा आणि मसुदा समितीचा शिलेदार म्हणून काम केलेल्या अथक कार्याबद्दल मी त्यांचे कौतुक केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात अपयशी ठरेल असं मला वाटते (CAD,vol-XI,23-11-1949 P. 826)
  7. रणधीर बसू मटारी( आसामचे प्रतिनिधी):- my tribute to Dr. Ambedkar and the drafting committee for their great achievement in producing his Constitution.(CAD,vol-XI,24-11-1949 P. 867)
  8. श्यामनंदन सहाय (बिहारचे प्रतिनिधी):-हा प्रसंग भारताच्या इतिहासात एकमेव आहे.कारण यापूर्वी कधीही लोकप्रतिनिधींनी स्वत: करिता कायदा तयार केला नव्हता. या घटनेत बऱ्याच सुधारणा होतील. परंतु या घटनेतील गाभा पुन्हा कधीही निर्माण करता येणार नाही, महात्माजींनी स्वातंत्र्य दिले, तर त्यांचे कठोर टीकाकार डॉ . आंबेडकर यांनी भारताची घटना तयार करण्याचे काम केले. निव्वळ घटना समितीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र त्यांचे ऋणी राहील. ज्या समर्थपणे त्यांनी मसुदा तयार केला तितक्याच समर्थपणे आंबेडकरांनी घटना समितीमार्फत तो मान्य करून घेतला,हे त्यांचे कौशल्य वर्तमानकाळच नव्हे तर भावी काळदेखील कृतज्ञपणे लक्षात ठेवील.(CAD,vol-XI,22-11-1949 P.788)
  9. एस. नागप्पा (मद्रास):- सर्वप्रथम डॉ.आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन केलेल्या अत्यंत उपयोगी आणि देशभक्तीपर कार्याबद्दल मी त्यांचे कौतुक कारतो.मी त्यांना या देशातील सर्वोत्कृष्ट देशभक्त समजतो. मी त्यांना नेहमी कोणत्याही विषयावर विधायक दृष्टिकोन आणताना पाहिलं आहे, बर्‍याच प्रसंगी त्यांनी आलेल्या अडथळ्यांचे निराकरण केले आहे.(CAD,vol-XI,21-11-1949 P. 758)
  10. मेहबूब अली बेग (मद्रास):- डॉ. आंबेडकर यांचे स्पष्टीकरण आणि विचार स्पष्ट व एकमेवाद्वितीय असे होते, त्यांचे घटनात्मक प्रश्नांसोबतच अर्थशास्त्रावरील प्रभुत्व अप्रतिम,परिपूर्ण व एकमेव असे होते, परंतु आंबेडकरही पूर्णत: स्वतंत्र नव्हते,म्हणून जर घटनेमध्ये काही दोष राहिले असतील तर त्याबद्दल त्यांना व्यक्तिशः दोष देता येणार नाही.(CAD,vol-XI,21-11-1949 P. 742)
  11. आर.व्ही.तुळेकर :- भीमराव आंबेडकर यांनी एक महान पांडव भीम यांच्या नावाला लायक असे महान कार्य केले आहे. त्यांनी त्यांच्या भीमराव या नावाला नक्कीच न्याय दिला आहे,आणि त्यांनी दृष्टी स्पष्टता,विचारांची स्पष्टता आणि भाषेच्या स्पष्टतेसह हे कार्य केले आहे.(CAD,vol-XI,22-11-1949 P. 826)
  12. शंकरराव देव:- डॉ. आंबेडकर आणि त्यांचे संबंधित किंवा मसुदा समितीचे सहकारी कृतज्ञतेस पात्र आहेत आणि मला असे वाटते की, ते जगातील कोणत्याही देशातील कोणतीही घटना बनविण्यात  आणि मसुद्या बनविण्याच्या तुलनेत उभे राहू शकतात. (CAD,vol-XI,21-11-1949 P. 730)
  13. व्ही.आय.मुनिस्वामी पिल्ले:- I must say a word of praise to the caliber and capacity of the chairman of the Drafting Committee.  B. R. Ambedkar (loud cheers).  I feel proud that his capacity has now been recognized, not only by the Harijans but by all communities that inhabit India.  I know Sir, that he has served the community of the Harijans and also of India by his great service and sacrifice in preparing a constitution which will be the order of the day from 26th Jan.1950.(CAD, P. 608)
  14. टी. टी. कृष्णाम्मचारी (मसुदा समिती सदस्य)  ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला, त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चवथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत.शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले, ते निःसंशय आदरास पात्र आहेत." ( संदर्भ:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, पृष्ठ १०)

Note:- CAD (Constituent Assembly Debates)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी घटना लिहिलीच नाही. त्यापुढे जाऊन सांगतात त्यांच्या योगदानासोबत इतरांचेही अधिक योगदान आहे. अशी चर्चा आजही होतांना दिसते. नव्हे ती समाजमाध्यमांवर जाणिवपूर्वक पेरण्यात येते. यामागे खूप मोठे षडयंत्राचा भाग आहे. मात्र अशा अफवांना आपण ठामपणे उत्तरं दिली पाहिजेत की अनेक देशांच्या राज्यघटना, भारताची परिस्थिती, नव्या सुधारणा या सर्वांचा बाबासाहेबांनी अहोरात्र तुलनात्मक अभ्यास केला. उगाचच त्यांना "कायदेपंडित" म्हंटले जात नाही. संविधान सभेवर बाबासाहेब गेले असता. त्यांचे परिश्रम किती महत्वाचे आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. 

संविधान सभेचे कामकाज संविधान लिहीण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते संसदेच्या अधिवेशनांत चर्चा घडवून पास करून घेण्याचे देखील होते. हे काम फक्त 7 जणांच्या कमिटीने केलंय. ती कमिटी म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. हि कमिटी संविधानातल्या प्रत्येक कलमावर चर्चा करण्यासाठी होत. त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या सुचवायचे. त्यासाठी प्रत्येक कलमावर चर्चा करण्यासाठी अधिवेशने भरायची. मग त्या अधिवेशनात जो काही ठराव व्हायचा, त्यानुसार ड्राफ्टिंग कमिटी दुरुस्त्या करायची. हे काम स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी, के एम मुन्शी, मोहम्मह सादुल्ला, बी एल मित्तल आणि डी. पी. खेतान यांचे होते. आणि मग पुढे जाऊन प्रत्येक कलमावर चर्चा करण्यासाठी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकटेच असायचे. ते स्वत: या संवैधानिक प्रक्रियेच्या डिबेट्समध्ये सहभाग घ्यायचे. 

दलितांपासून ते आदिवासींच्या प्रश्नांवर, ओबीसी, भटक्या समाजापासून ते सर्व जाती धर्मातील स्त्रियांच्या प्रश्नावर, कामगारांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाबासाहेबांनी दुरुस्त्या सुचवल्या व तसे ठराव मंजूर करून घेतले. जेव्हा बाबासाहेब संविधान सभेत भाषण करण्यास सुरू होत तेव्हा सर्वजण तृप्त होऊन बाबासाहेबांचे स्पष्टीकरण ऐकायचे. सहजासहजी त्यांचे मुद्दे कोणालाही खोडून काढता येत नसत. भांडवलशाही, नोकरशाही व खोट्या परंपरावादी असणाऱ्या कोणत्या नेत्यांनी वरील सर्वांच्या प्रश्नांवर आवाज उठवला? व ते प्रश्न तडीस नेले हे टीकाकारांनी सांगावे. इथे झडगले ते फक्त 'बाबासाहेब.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोडले, तर उर्वरित सहा जणांनी किती सहभाग घेतला, किती चर्चा केल्या, किती दुरुस्त्या केल्या, याची टीकाकारांनी एकदा माहिती काढावी. टी.टी. कृष्णमाचारींचे संविधान सभेतले भाषण वाचल्यावर लक्षात येते की भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.

जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वांत मोठे लिखित असे संविधान तयार करून, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्त्वपूर्ण संविधानरूपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.  निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्य रत्न आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. तेव्हापासून आज पर्यंत ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी टीकाकार हे घटनाकारांचे महत्व कमी लेखण्यासाठी निरनिराळे आक्षेप घेतात. त्यातला एक आहे "भारतीय राज्यघटना ओरिजिनल नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे."  

आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) टिकला आहे, प्रगती करतोय. ते केवळ राज्यघटनेच्या बळावर? सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झाले. 

प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी modify केली गेली, त्यानुसारच accept केली गेली. त्यामुळे कुठलाही अभ्यास केल्याशिवाय असे आरोप करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून बनवली गेली आहे. जगभरातील राज्यघटनांचे सरासरी वय आहे - १७ वर्ष ! आपली राज्यघटना ७० वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. इतर देशांच्या राज्य घटना सुरूवातीपासून-आजपर्यंत पूर्णतः बदलण्याची गरज पडली. व्यवस्था विस्कळीत झाली. मात्र आपल्या देशात कधीही अशी वेळ आली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com