Top Post Ad

मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन

 मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये संपन्न होणार आहे 

 अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१रोजी संपन्न होणार आहे.  यापूर्वीचे पहिले संमेलन कल्याण शहरामध्ये तर दुसरे संमेलन ठाणे शहरामध्ये थाटामाटात पार पडले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद थोर विचारवंत व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव यांनी भूषविले होते हे विशेष होय. आणि आता तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद सिक्कीमचे माजी राज्यपाल थोर विचारवंत व समाजसुधारक  व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे भूषविणार आहेत हे विशेष होय.

              या संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर हे करणार असून मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड आणि मराठी भाषा मंत्री मा. विश्वजित कदम साहेब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.   तसेच विशेष अतिथी म्हणून स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती लाभणार असून माजी न्यायाधीश व विचारवंत रावसाहेब झोडगे हे ही मार्गदर्शन करणार आहेत.मुंबईचे  ऍड. गौतम सरतापे हे स्वागताध्यक्ष म्हणून तर म्हसवड शहराच्या उपनगराध्यक्षा धनश्री देवी राजेमाने व म्हसवड शहराच्या उपनगराध्यक्षा सविताताई म्हेत्रे, म्हसवडचे नगरसेवक युवराज सुर्यवंशी हे ही विशेष करून मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.  साहित्यिकांपैकी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे,ज्येष्ठ लेखिका निलिमा जोशी हे विशेष करून उपस्थित राहणार आहेत.

              राज्यभरातून अनेक नामवंत लेखक, कवी यांची मांदियाळीच भरणार आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे म्हसवड शहरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे म्हसवडवासीयांना बौद्धिक खुराक व साहित्य सांस्कृतिक मेळावा मुळे शहरामध्ये उत्सवाचे स्वरूप आले आहे तरी सर्वानी याचा जरूर लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मराठी साहित्य मंडळाचे म्हसवड शहराचे अध्यक्ष महादेव सरतापे यांनी आवाहन केले आहे.

    
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com