मुंबई- महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खुप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थण्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोंधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून आता असे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अमरावतींसह काही भागात घडलेल्या हिसक घटनांचा तीव्र निषेध त्यांनी केला.
दरम्यान मुस्लिम समाजाने असे आरोप केले आहे की, आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याची घटना देखील जोराने पसरत आहे. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या बंद दरम्यान नांदेड शहरासह मालेगावात तणाव निर्माण झाला होता. देगलूर नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, तर शिवाजीनगर भागात दुपारी अडीचच्या सुमारास 30 ते 40 जणांच्या जमावाने दुकानावर दगडफेक करत नासधूस केली. बाफना नाका रस्त्यावर देशी दारूच्या दुकानासमोरील रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. काही काळ शहरात तणाव निर्माण झाला. प्रत्येक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
या घटनेवर प्रतिक्रिया देतांना पटोले पुढे म्हणाले, महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले. आता उत्तर प्रदेशसह. पाच राज्यात विधानसेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून मह्राराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचें भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनत्ता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपात मोंदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेंशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा ता कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असे आवात्तनही त्यांनी ळेले.
त्रिंपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे हे दुर्देदी आहे. विपुरा सरळार आणि तेथील पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी मशिद जाळली गेली, असा आरोप केला आहे, तशी मशिद जाळण्याची कोणतीत्ती घटना झालेलीच नाहीं. त्या मशिदीचे फोटो सुद्धा जारी करण्यात आलें. त्यामुळे केवळ खोटा प्रचार केला गेला. ज्यांनी खोटा प्रचार केला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात जाली. पण, निष्वळ आफवेवर मोर्चे काढण्यात जाले. जाळपोळ करण्यात आलीं आणि हिदूंची दुळानें जाळ्ली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षडयंत्राचा भाग बाटतो. अशात राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंधींर आहें. अशात वातावरण चिघळल्यास दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर असेल. - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 20 एफआयआर नोंदवले आहेत, तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आम्ही स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणी चिथावणी दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान, भाजपने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जी दुकाने सुरू आहे त्याला बंद करा. अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलक 'जय श्री राम' च्या घोषणा देत असून, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
शुक्रवारी मुस्लिम समाजाने बंद पुकारले होते, शुक्रवारी दुपारी नमाज अदा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन काढण्यात आले होते. त्याच दरम्यान चित्रा चौकातील काही दुकाने सुरू दिसली. आंदोलकांनी दुकानदारांना बंद करण्याची विनंती केल्यानंतरही दुकान बंद न केल्याने आक्रमक आंदोलनकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केली. या दगडफेकीत शहरातील सुमारे 20 ते 22 दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती.
त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने संपुर्ण राज्यात आज आंदोलक केले. त्यात नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना शांततेत राहण्याचे आवाहन करतो. - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
0 टिप्पण्या