Top Post Ad

शासकीय वसतिगृहामधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू



 ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील  शहरी भागात इयत्ता आठवी  ते  बारावी  व ग्रामीण भागात इयत्ता पाचवी  ते सातवी पर्यंत शैक्षणिक वर्षे सन 2021 -22 ऑफलाईन प्रवेश  प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे असे ठाण्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण बलभीम शिंदे यांनी कळविले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासप्रवर्ग, अपंग, अनाथ, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी ऑफलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.  यासाठी सर्व वसतिगृहात प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज उपलब्ध आहेत.

 हे प्रवेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सुखसागर अपार्टमेंट 2 रा माळा, कल्याण नाका, भिवंडी , मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सुखसागर अपार्टमेंट 5 वा माळा, कल्याण नाका, भिवंडी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पूष्पकधाम अपार्टमेंट 1 ला माळा, बैतूरकरपाडा, खडकपाडा, कल्याण, मागासवर्गीय मुलांचे (गुणवंत ) शासकीय वसतिगृह, गौरी अपार्टमेंट 5 आणि 6 वा माळा, बैतूरकरपाडा, खडकपाडा,  कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दिशा अपार्टमेंट तळमजला, भातसा कॉलनी, गोठेघर, शहापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तहसिलदार कार्यालय जवळ, गांधी रोड, उल्हासनगर, मागासवर्गीय मुलींचे (गुणवंत ) शासकीय वसतिगृह, बी.एस.एन.एल. ऑफिस जवळ, गांधी रोड, उल्हासनगर,मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, टिकुजिनीवाडी रिसॉर्ट (Resort), मानपाडा, घोडबंदर रोड, जि. ठाणे येथे संपर्क करा.

अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले व पॉलिटेकनीक व इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षास प्रवेश घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन अर्ज भरु शकतील. अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्रवेश रद्द करण्याचे अधिकार वसतिगृहाचे गृहप्रमुख, गृहपाल यांना राहतील.  याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असे ठाणे सहायक आयुक्त समाज कल्याण बलभीम शिंदे  यांनी कळविले आहे.

ठाणे येथील मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु-  ठाणे :मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, ठाणे  येथील वसतिगृहामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी या वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील  विद्यार्थींनीना 2021-22 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  इच्छुकांनी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कोठारी कंपाऊंड, टिकुजिनिवाडी  समोर, चितळसर, मानपाडा, घोडबंदररोड, ठाणे येथे संपर्क साधण्यात यावा.असे आवाहन मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापकांनी   केले आहे.

भिवंडी येथील मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भिवंडी येथील इयत्ता ८ वी ते १२ वी या वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विदयार्थ्यांना सन २०२१-२२ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुक विदयार्थ्यांनी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सुखसागर अपार्टमेंट, घुंघटनगर, कल्याण नाका, भिवंडी येथे संपर्क करावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापकांनी  केले आहे.

 कल्याण येथील मागासवर्गीय (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु- मागासवर्गीय (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतिगृह, कल्याण येथील इयत्ता ११ वी व १२ वी  वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विदयार्थ्यांना सन २०२१-२२ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुक विदयार्थ्यांनी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत गौरी अपार्टमेंट,बी विंग, ५ वा माळा, बेतुरकरपाडा, कल्याण (प) येथे संपर्क साधावा असे आवाहन मागासवर्गीय (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापकांनी  केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com