कोरोनाची तिसरी लाट आल्यास न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक
यावेळी न्यायमूर्ती श्री. ओक यांनी ठाणे जिल्हा न्यायालयापासून सुरू केलेली वकिली ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या प्रवासातील आठवणी नमूद केल्या. १९८३ मध्ये वकिली सुरू करताना घरातून आजोबा, वडील यांच्याकडून मिळालेल्या वकिलीचा वारसा आणि कायद्याच्या ज्ञानाचा कित्ता गिरवल्याचे त्यांनी सांगितले. केवळ सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ठिकाणीच नाही तर तालुक्याच्या ठिकाणी देखील लीगल टॅलेंट आढळून येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.न्यायमूर्ती ओक यांनी यावेळी वडील श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती विजय टिपणीस, प्रभाकर पाटील या तिन्ही गुरूंचे स्मरण करीत अनुभव कथन केले.जिल्हा न्यायालयातील वकील ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या न्या. श्री. ओक यांच्या प्रवासाचा तरुण वकिलांनी जरूर अभ्यास करावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन न्या.श्री. पानसरे यांनी यावेळी केले.
न्यायमूर्ती ओक यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला सव्वाशे वर्षांनी हा बहुमान मिळाल्याचे श्री. चव्हाण, श्री. कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी न्यायमूर्ती ओक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन न्यायमूर्ती ओक यांचे स्वागत केले. कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, ज्येष्ठ वकील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या