पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहात का ? आनंद परांजपे यांचा सवालठाणे -   लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांना सवाल आहे की कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरिंग शिवसेनेने सुरु केले आहे का? महाराष्ट्र सरकारच्या मार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महााविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात शिबिरे होतात, त्यावेळी ठामपाचे बॅनर लागतात; ज्यामध्ये महापौर आणि पालिका पदाधिकार्‍यांचे छायाचित्रे असतात. पण, कळव्यात सेनेच्या नेत्यांचे फोटो लावण्याचे कारण काय,  पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहात का, असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

 कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचं आवाहन करणारे पोस्टर फाडले आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो होतो. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे पोस्टर पहाटे तीन वाजेच्या सुमारास फाडण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संतप्त झालेल्या आनंद परांजपे यांनी थेट आयुक्तांना सेनेत प्रवेश करणार का असा सवाल केला आहे

आज कळवा पूर्वेकडील आनंद विहार येथे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसने लावले होते. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाचे  ते बॅनर होते. काल रात्री तीन वाजता काही समाजकंटकांनी हे बॅनर फाडले.  हे बॅनर फाडणार्‍यांवर  येत्या 24 तासात  कारवाई करावी अन्यथा, आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू असेही परांजपे म्हणाले, 

तर आमची जबाबदारी नाही- डॉ. आव्हाडांचे ट्वीट
पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. 


दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज कळवा परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा "महालसमहोत्सव’’ आयोजित  करण्यात आला होता. सध्यस्थितीत कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून ठाणे महापालिकेच्यावतीने या लसमहोत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या लसीकरण महोत्सवामध्ये ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील २१ डॉक्टर्स, १३४ नर्सेस तसेच ९० डेटा एन्ट्री ऑपरेटर व पेशंट निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

     खासदार डॉ. श्रीकांत शिंद व  महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्यासह कल्याण जिल्‍हाप्रमुख गोपाळ लांडगे,  सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, उप महापौर सौ.पल्लवी कदम, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका विजया लासे, अनिता गौरी, मंगल कळंबे, पूजा करसुळे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक बालाजी काकडे, उपआयुक्त मनीष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA