साहित्यसेवेची कास धरणारे-

" मराठी साहित्य मंडळ " नवोदित लेखकांना वाव मिळवून देणारे
तसेच अल्पावधीत नावलौकिक मिळविणारे -"मराठी साहित्य मंडळ" 

         अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून दरवर्षी"मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात आयोजित केले जाते. या संमेलनासाठी संमेलनाचे  अध्यक्ष लोकशाही मार्गाने रीतसर निवडणूक पध्दतीने निवडले जात होते. डोंबिवली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना अपयश आले होते. पण अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने ते उभे राहिले. साहित्यिक  क्षेत्रामधील संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या राजकारणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आपल्या परखड लेखणीने एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते"मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा" या पुस्तकामुळे त्याकाळी साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. त्यामुळे की काय निवडणूक पद्धती रद्द करण्यात येऊन पूर्वीचीच नियुक्ती पद्धती सुरू करण्यात आली. म्हणून तर कित्येक नामवंत साहित्यिक निवडणूकीमध्ये भाग घेत नसतं.

             या एकूणच प्रकाराचा उबग आणणारे राजकारण लक्षात घेता कित्येक साहित्यिक आपले संमेलनाचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न अर्ध्यावरतीच सोडून देतात. तथाकथित प्रस्थापित लेखक शोषितांना आणि वंचितांना बाजूस सारीत असतात. त्यांना वाव मिळवून देत नाहीत. अशा मानसिक अवस्थेमधून जात असताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी २०२० साली"मराठी साहित्य मंडळाची"स्थापना केली. ज्येष्ठ  कवयित्री ललिता गवांदे(नाशिक),ज्येष्ठ लेखिका नीलिमा जोशी(नाशिक),ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित(कोल्हापूर),ज्येष्ठ गजलकार नीला वाघमारे(ठाणे),ज्येष्ठ कवी सुरेश लोहार(कराड),हेमंत म्हात्रे आदि लेखकांनी संस्थापक, अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची कल्पना उचलून धरली आणि"मराठी साहित्य मंडळाची"वाटचाल यशस्वीपणे सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेच्या ३४ जिल्हा शाखा असून २७६ तालुका शाखा कार्यरत आहेत. 

महाराष्ट्रामधील मुंबई पासून ते गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यापर्यंत ११८९शहर शाखा साहित्य मंडळाचे कार्य करीत आहेत. आजच्या तारखेपर्यंत या संस्थेचे २०२६६आजीव सभासद झाले आहेत. नवोदित लेखकांमधील असलेले साहित्य प्रेम, नवीन साहित्य निर्माण करण्याची अंगी असलेली उर्मी, विविध संमेलन आयोजित करण्याची असलेली हौस या अशा अनेक गोष्टी गृहीत धरता येतील. दीड वर्षाच्या काळात या संस्थेने अल्पावधीतच गरुडझेप घेतल्याचे दिसून येत आहे. नवोदित लेखकांची आपल्याकडून होत असणाऱ्या साहित्य निर्मितीची उपेक्षा त्यांना जाणवत होती. नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखकांची साहित्य सेवा करण्याविषयी असलेल्या तळमळीमुळेच ह्या  संस्थेचा पसारा झपाट्याने वाढत गेला. या संस्थेची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशभरामधील विविध राज्यांमध्ये संस्थेचीव्याप्ती वाढत आहे. 

गोवा राज्याची जबाबदारी ज्येष्ठ कवयित्री मेधा जाधव या सांभाळत असून दिल्ली प्रदेशाची जबाबदारी लेखक आदेश कोकिळ सांभाळत आहेत.ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. गुजरात राज्याची जबाबदारी लेखिका अपर्णा कुलकर्णी कुशलतेने संस्थेची जबाबदारी हाताळत आहेत. राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश पासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत या संस्थेच्या शाखा अल्पावधीतच नेटाने कार्य करीत आहे.त्यामुळे साहित्यप्रेमी एकत्र येऊ लागले. मराठी भाषेची ओळख, लेखन, वाचन, पुस्तकांची देवाणघेवाण तसेच आपल्या मराठी भाषेच्या संस्कृतीची ओळख नवोदित लेखकांना होऊ लागली. बहुजन समाजातील शोषितांना आणि वंचितांना आपल्या समाजावरील होणाऱ्या वर्षानुवर्षे अन्यायाचे साहित्यामधून प्रतिबिंब उमटू लागले. त्यांच्या साहित्यांना वाव मिळू लागला. त्यांच्यामध्ये असलेल्या उणिवा-जाणीवा-नेणिवा आपल्या लेखनातून व्यक्त होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

          संस्थेची स्थापना करताना नवोदित लेखकांना हक्काचं विचारमंच उपलब्ध व्हावा याची दक्षता संस्थापक, अध्यक्ष व त्यांचे विश्वस्त यांनी अभ्यासाअंती संस्थेचे साहित्य चळवळीचे मूळ रूप हरवणार नाही याची दक्षता, संस्थेची घटना, नोंदणी इतर नियम करताना घेतलेली दिसून येत आहे. साहित्य चळवळीचे कार्य केवळ शहरपूरता मर्यादित न ठेवता गावोगावी, खेडोपाडी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत रुजली गेली पाहिजे, विस्तारली गेली पाहिजे हे उद्दिष्ट ठेऊन विजया पाटील(कराड),पुष्पा पाटील, कृष्णा बागडे, सुनंदा बागडे(कोल्हापूर),अर्चना सुतार(सांगली),डॉ. हेमंत दीक्षित(नाशिक),आनंद चिंचोले(लातूर),वसंतराव ताकधट(चंद्रपूर),शालू कृपाले(गोंदिया),संगिता रामटेके(गडचिरोली),हर्षदा झगडे , अर्चना सातव, मंगल बोरावके(बारामती),डॉ. सुनिता धर्मराव,डॉ. निता बोडके(पुणे),सुनंदा निकम, ममता सोनावणे(धुळे),लीना आढे - कोळपकर , उमेश देवकर, अनिल अष्टेकर (नगर),शुभदा कोकीळ , साहेबराव पवळे,लक्षुमिकांत रांजणे,मंगल कुदळे (पुणे),दिपांजली गावित ,  सुरेखा वळवी (नंदूरबार),डॉ. रजनी दळवी(सोलापूर) विनोद मूळे , परशुराम नेहे , विजया माणगांवकर( ठाणे) मीना पगारे, सुजाता पाटील, चेतना गावकर,रवींद्र पाटणकर ( मुंबई ), उर्मिला घरत, नीता राऊत (पालघर),नितीन म्हात्रे (  नवी मुंबई) जयपाल पाटील, सानिका कदम ( अलिबाग ) हेमा जाधव, संगीता माने, महादेव सरतापे ( सातारा ), मधुकर भोये, महेश भोये( जव्हार), विलास ठोसर, प्रकाश मोरे, मोहन काळे ( अकोला ) राजू रणवीर ( हिंगोली )रत्ना मनवरे , वंदना धाकडे ( अमरावती ), कल्पना अंबुलकर, शामराव साळुंखे, ( औरंगाबाद ) लता हेडाऊ ( वर्धा )बाळासाहेब तिंबोळे ( उस्मानाबाद ) भैरवनाथ कानडे ( तुळजापूर ) किरण हिंगोनेकर ( कल्याण )आदि नामवंत लेखक मराठी साहित्य मंडळाच्या कार्यक्रमासाठी, उपक्रमासाठी सातत्याने कार्यरत असतात. 

या संस्थेतर्फे ग्रामपातळीवर, तालुकापातळीवर तसेचजिल्हापातळीवर विविध संमेलन आयोजित केली जात असतात. साहित्य क्षेत्रात गेली ४०वर्षांचा व्यासंग व  अनुभव असणारे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर सातत्याने साहित्य नवनिर्मितीची कास धरीत असतात. त्याबरोबरीनेच नवोदित लेखकांना लेखनासाठी प्रवृत्त करीत असतात. मराठी साहित्य मंडळातर्फे प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन व सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आयोजित केली जातात. ही संमेलन यशस्वी होतानाही दिसत आहेत. या संमेलनाची अध्यक्षपदे ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव आदि मान्यवरांनी भूषवली आहेत. साहित्याचा समृध्द वारसा जपत अल्पावधीतच मराठी साहित्य मंडळाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये गरुडझेप घेतलेली दिसते. साहित्यिक ऐवज जतन करून ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा भवन निर्माण करण्याचा संकल्प मराठी साहित्य मंडळाने केला आहे. हे विशेष होय.

ज्येष्ठ  लेखिका  नीलिमा जोशी
राष्ट्रीय सरचिटणीस
मराठी साहित्य मंडळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या