Top Post Ad

भारतीय बौध्दांचा जाहीरनामा


   बोधिसत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६च्या अशोक विजयादशमीला नागपूर येथे धम्मचक्रप्रवर्तन केले. त्यानंतर अल्पावधीतच 
 त्यांचे महापरिनिर्वाण झाले. यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेमधून समाजाला बाहेर काढून त्यांच्यामध्ये धार्मिक ओढ निर्माण करण्यासाठी  डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी १९५७ मध्ये वर्ध्याहून भारतीय बौध्दांचा जाहीरनामा प्रसिध्द केला होता. या जाहीरनाम्याला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच तो अनेक दृष्टीने महत्वाचाही आहे. हा जाहीरनामा एन. जी. कांबळे, नागपूर यांनी आपल्या संग्रहातून उपलब्ध करून दिला आहे.

  

 • आम्ही मानतो की कोणतीही जात, कोणताही देश, कोणताही समाज व कोणतीही व्यक्ती असो, ज्यांनी कोणाही कडून त्रिशरण आणि पंचशील ग्रहन केले असतील तो बौध्द आहे.  
 • आम्ही मानतो की, आमच्या शरीरांत नतर कोणत्या नित्य मानला जाणारा आत्मा आहे जो की एक प्राण्याला दुसऱया प्राण्यापासून दूर करतो आणि न कुठे कोणता ईश्वर अथवा परमात्मा ही आहे जो सृष्टीचा रचयिता समजला व प्रचारित केला जातो.  
 • आम्ही मानतो की कोणत्याही काल्पनिक आत्म्याला कोणत्याही काल्पनिक परमात्मामध्ये लीन करण्याचा प्रयत्न जीवनाचा श्रेष्ठ उद्देश्य नव्हे.  
 • आम्ही मानतो की शील, समाधी आणि प्रज्ञाचे वृध्दिद्वारे आपण तथा अन्य सर्व प्राण्यांना दुःख-मुक्त करण्याचा प्रयत्न करणे जीवनाचे सर्वोच्च उद्देश्य होय.  
 • आम्ही मानतो की या जन्मात प्राणी जो काही सुख-दुःखाचा अनुभव करतो, ते त्यांचे पूर्व जन्माचेच फळ नसते.  
 • आम्ही मानतो की ह्या जन्मात प्राणी जो काही सुख-दुःखाचा अनुभव करतो, ते ईश्वरकृत नाही.  
 • आम्ही मानतो की ह्या जन्मात प्राणी जो काही सुख-दुःखाचा अनुभव करतो, ते अहेतुक बिना कोणत्याही कारणाशिवाय होत नाही.  
 • आम्ही मानतो की ह्या जन्मात प्राणी जो काही सुख-दुःखाचा अनुभव करतो. ते सर्व प्रत्ययांच्या (†हेतुंच्या) पासून उत्पत्तिचे नियम†प्रतीत्य समुत्पादानुसार होतात.  
 • आम्ही मानतो की, लुम्बिनी-जेथे तथागत बुध्दाने जन्म घेतला, बोधगया जेथे तथागत बुध्दांने बुध्दत्व प्राप्त केले, सारनाथ जेथे तथागत बुध्दाने धर्मचक्र प्रवर्तन केले, आणि कुशीनगर जेथे तथागत बुध्दाला महापरिनिर्वाण लाभले ते आमचे पवित्र तीर्थस्थान आहेत.  
 • आम्ही मानतो की वरील तीर्थस्थानाखेरीज ज्या प्रमाणे अन्य राजगृह, नालंदा, वैशाली इत्यादी बौध्दस्थान श्रध्दापूर्वक यात्राकरण्याकरिता योग्य आहेत. त्याचप्रमाणे बोधीसत्व चरित बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांचे जन्मस्थान महू, धर्मदीक्षा ग्रहण स्थान नागपूर आणि अंत्येष्ठी स्थान चैत्यभूमी (मुंबई) श्रध्दापूर्वक यात्रा करण्या योग्य आहेत.  
 • आम्ही मानतो की कोणत्याही प्रकारचा कोणताही `धार्मिक संस्कार' करण्याकरिता कोणत्याही भट अथवा पुरोहितांची काहीच आवश्यकता नाही. हुशार बौध्द सद्गृहस्थ आपले सर्व धार्मिक संस्कार स्वत करून करवून घेऊ शकतो.  
 • आम्ही मानतो की अगर असल्या सू-अवसरी कोठेही कोणतेही भिक्खू मिळाले तर त्यांना आदरपूर्वक निमंत्रित करून त्यांचेकडून धार्मिक संस्कार करवून उपदेश व आशिर्वाद ग्रहन करणे कल्याणकारी आहे.  
 • आम्ही मानतो की तथागत बुध्दाचा जन्मदिवस, बुध्दत्वलाभ-दिवस महापरिनिर्वाणदिवस, वैशाख पौर्णिमाच आमचे पवित्र सण होत. त्याखेरीज आषाढी पौर्णिमा व माघ पौर्णिमा इत्यादी पवित्र दिवस आहेत.  
 • आम्ही मानतो की कलिंग विजयानंतर अशोकद्वारा धर्म विजय आरंभ करण्याचा दिवस विजयादशमी ही आमचा पवित्र दिवस आहे.  
 • आम्ही मानतो की 14 एप्रिल बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांचे जन्म दिवस, 6 डिसेंबर बाबासाहेबांचे निर्वाण दिवस आम्हांस अविस्मरणिय दिवस आहेत.  
 • आम्ही मानतो की त्रिपिटक आणि त्याची अट्ठकथा, पालीग्रंथ, बुध्दाचरित आणि बोधीचर्यावतार इत्यादी संस्कृत ग्रंथ, तिबेटी आणि चिनी भाषेत अनुवादीत बौध्दग्रंथाचे अतिरिक्त संसारांतील आधुनिक भाषांमध्ये जितके बौध्द साहित्य प्राप्त आहेत ते सर्व आमचे साहित्य आहे.  
 • आम्ही मानतो की केवळ बौध्द साहित्याचेच नव्हे तर अन्यधर्म ग्रंथांचे तुलनात्मक दृष्टी व नीर-क्षीर-विवेक बुध्दिने अध्ययन करणे आमचे कर्तव्य आहे.  
 • आम्ही मानतो की मांस-मासळी ग्रहण करण्याऐवजी शाकाहार ग्रहण करणे उत्तम आहे. परंतु समाजाची वर्तमान आर्थिक व सामाजिक स्थितीला अनुसरूण आम्ही मांस-मासळीचे आहार किंवा शाकाहार ऐच्छिक विषय मानतो.  
 • आम्ही मानतो की सिंहल, श्याम, बर्मा इत्यादी स्थविरवादी बौध्द देशांत आणि तिबेट, चीन व जपान इत्यादी महायानी बौध्द देशांत सिध्दांतात काही भेद नाही. आम्ही भारतीय बौध्दांना सुध्दा संसारांतील इतर सर्व बौध्दांप्रमाणे त्रिलक्षण, चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग, आणि प्रतित्य-समुत्पाद मान्य आहेत.  
 • आम्ही मानतो की प्रत्येक गावात, पेठेत नगरांत बौध्दांचे आपले विहार असले पाहिजे. जेथे जाऊन तथागत बुध्दांची मूर्ती अथवा चित्राचे दर्शन करता येईल. जिथे भिक्खू राहू शकतील, जिथे जाऊन सर्व मुले-मुली शिक्षा ग्रहण करू शकतील आणि बौध्द उपासक व उपासिका धमोपदेश श्रवण करू शकतील.  
 • आम्ही मानतो की आमचे हे विहार आणि बौध्द विहाराचे द्वार सर्व दर्शनाकरिता खुले राहिले पाहिजे.  
 • आम्ही मानतो की अस्पृष्यता न केवळ कायद्याविरुध्द आहे, परंतु मानवतेच्या दृष्टीप्रमाणे संपूर्ण रूपाने नितीविरुध्द आहे. त्यांकरिता कोणाबरोबर कोणीही अस्पृश्यतेचा व्यवहार करील तर त्यास कानूनी आणि अन्य सर्व संभव उपायद्वारे असे कारणांस मार्गभ्रष्ट होण्यापासून वाचविणे आम्ही आपले अधिकार व कर्तव्य समजतो.  
 1. त्रिलक्षण- अनित्य दुख अनात्म 
 2. चार आर्य सत्य (दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निवारणाकडे नेणारा मार्ग) 
 3. आष्टांगिक मार्ग- (सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति, सम्यक समाधी) 
 4. प्रतीत्य-समुत्पाद (असे झाल्यास असे होते, असे न झाल्यास असे होत नाही चे नियम) 
 • आम्ही मानतो की योग्यता, वेळ आणि परिस्थिती प्रमाणे जीवन-साधनाचे रूपाने कोणता ना कोणता तरी व्यवसाय करणे प्रत्येक मनुष्याचे अधिकार व कर्तव्य आहे. आम्ही सर्व उद्योगास समान दृष्टीने पाहतो. परंतु जर कुठे कुणास कोणता उद्योग, बेगारी रूप करावे लागले तर असे करणे नितांत अनुसूचित समजतो. आणि त्याचा विरोध करणे आम्ही आपला अधिकार आणि कर्तव्य समजतो.  
 • आम्ही मानतो की भारतात प्रचलित वर्ण-व्यवस्था मानवी जीवनाचे अन्यायपूर्ण वर्गीकरण आहे. आणि त्यावर आश्रीत जात-पात-प्रथा भारताची मरण व्यवस्थाच सिध्द झाली आहे.  
 • आम्ही मानतो की समाजाने चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मिथ्या  विश्वासातून मुक्त होण्यातच भारताचे कल्याण आहे.  
 • आम्ही मानतो की आपण अन्य सर्व भारतियांबरोबर मिळून भारताची आणि त्याचे माध्यम द्वारा सर्व मनुष्य समाजाची सुख-शांति आणि विश्व कल्याणकारी प्रयास केला पाहिजे.  

सब्बे सत्ता सुखी होन्तु
(सर्व प्राणी सुखी होवो) टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com