Top Post Ad

महात्म्याची अखेर......

  
 पाकिस्तान महात्मा गांधींमुळे निर्माण झाले नाही तर लीग व हिंदू महासभा या दोघांनी एकमेकाला पूरक होईल असेच राजकारण केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. हे सत्य दडवून हिंदुत्ववादी फाळणीचे खापर गांधींवर फोडतात. हिंदू महासभेच्या राजकारणावर फाटक यांनी भाष्य केले आहे ते पाहण्यासारखे आहे. “हिंदू महासभेचे राजकारण अगदी साधे व सोपे होते. काँग्रेस, मुसलमानांना हिंदूंच्या डोक्यावर मिरे वाटावयास संधी देत आहे, हिंदू समाजाचा क्षय करीत आहे ही विचारसरणी घोळून घोळून हिंदू जनतेच्या कानी घालावयाची व तिच्या पुष्ट्यर्थ महात्मा गांधींना शिव्या द्यावयाच्या! काँग्रेसची व गांधींची मनमुराद बदनामी, मुसलमानांची त्या मानाने सौम्य नालस्ती, अंतिम ध्येयासंबंधी (म्हणजे स्वातंत्र्य) उदासिनता अशी हिंदू महासभेची सामान्य नीती होती.” असे फाटक यांनी 'भारतीय राष्ट्रवादाचा विकास' या पुस्तकात म्हटले आहे.   हिंदू महासभेच्या राजकारणासंबंधात न. र. फाटक यांनी तिचे वाभाडेच काढलेले आहेत. “मुस्लिम लीगची औलाद वाटण्यासारखी जी हिंदू महासभा तिने पाकिस्तानच्या कल्पनेला बळ चढू देण्याला मदत केली आहे,' असे फाटक म्हणतात.

गांधींची बदनामी अधिक करावयाची आणि त्या तुलनेत मुसलमानांची नालस्ती सौम्य करायची इतकी गांधीद्वेषाची कावीळ हिंदुत्ववाद्यांना झाली होती व त्यात आजही फरक पडलेला नाही. हिंदुत्ववाद्यांची भूमिकाही फाळणीला कारणीभूत झाली असे डॉ. लोहिया यांनी म्हटलेले आहे. मुस्लिमद्वेषाचे जेवढे राजकारण करण्यात येई तेवढे मुस्लिम, पाकिस्तानवादी बनत. मुस्लिम पाकिस्तानवादी होत तसे हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला जीवदान मिळत होते. आर्थिक किंवा सामाजिक सुधारणा त्याचप्रमाणे विधायक कार्यक्रमाशी हिंदुत्ववाद्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाकरिता द्वेषाचेच वातावरण उपयुक्त ठरत होते. तोच त्यांच्या राजकारणाचा आधार होता. त्यामुळे द्वेष वाढीस लावण्याकरिता  मुस्लिम लीगची हिंदुत्ववाद्यांना गरज होती आणि लीगच्या लोकांना हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाची आवश्यकता भासत होती.  एकमेकांच्या द्वेषाच्या पायावर हिंदू व 'मुस्लिम धर्मवाद्यांच्या राजकारणांचा इमला उभा होता. पाकिस्तानची निर्मिती झाली नसती तर ५५ कोटी रुपयांचाही प्रश्न उपस्थित झाला नसता. मग हिंदुत्ववाद्यांनी कशाच्या आधारे राजकारण केले असते? फार तर पाकिस्तान झाले नाही म्हणून लीगच्या राजकारणात आक्रमकता आली असती आणि त्या आक्रमकतेविरुद्ध हिंदुत्ववाद्यांना त्यांचे राजकारण करता आले असते. पण शेवटी त्याचा अर्थ हाच होतो की मुस्लिम द्वेष त्याचबरोबर ज्या विचारसणीमुळे हिंदुत्ववाद्यांचे राजकारण रोखले जात होते ती काँग्रेस आणि तिचे नेते गांधी यांचा द्वेष करण्याशिवाय हिंदुत्ववाद्यांचे दुसरे राजकारणच शिल्लक राहत नव्हते. 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हे ओळखले होते. द्वेष हा राजकारणाचा चिरस्थायी पाया राहू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जाती-धर्म-भेदाच्या राजकारणाचा त्याग करावा किंवा सर्व जाती-पंथ-धर्माच्या लोकांना पक्षाची दारे खुली केली तरच हिंदू महासभा राष्ट्रीय पातळीवरील संघटना बनू शकेल. अथवा एखाद्या नव्या पक्षात विलीन व्हावे, हिंदू महासभेने व्यापक राजकारण करावे हा डॉ. मुखर्जी यांचा प्रयत्न होता. पण हिंदू महासभेची त्याला तयारी नसल्यामुळे अखेरीस डॉ. मुखर्जी यांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाच राजीनामा दिला. १९५१ साली एन. सी. चतर्जी हे. डॉ. मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर महासभेचे अध्यक्ष बनले. त्यांनीही व्यापक राजकारण करावे असा पर्याय पुढे ठेवला पण मुखर्जी यांच्याप्रमाणेच चतर्जी यांनाही अपयश आले.  पुढे डॉ. मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली आणि जनसंघालाही व्यापक राजकारणाची बैठक द्यावी अशी भूमिका घेतली. मुखर्जी यांनी रा. स्व. संघाच्या मदतीने जनसंघ स्थापन केला. काश्मीरच्या तुरुंगात डॉ. मुखर्जी यांचा मृत्यू झाला. पण जनसंघाच्या पहिल्या तीन अध्यक्षांचा मृत्यू हा संशयास्पद मृत्यू ठरलेला आहे. डॉ. रघुवीर हे अपघातात गेले. दीनदयाळ उपाध्याय यांचा खून झाला आणि या तीनही अध्यक्षांनी पक्षाला व्यापक बैठक देण्याचे प्रयत्न केले होते. हा विचित्र योगायोग आहे!

 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा सल्लाही हिंदुत्ववाद्यांना मानवला नाही, तेथे महात्मा गांधींची विचारसरणी त्यांच्या पचनी कशी पडावी? डॉ. मुखजी यांनी धर्मवादी राजकारणाचा पूर्णपणे त्याग केला होता अशातलाही भाग नाही. त्यांनी संघाच्या मदतीने जनसंघाची स्थापना केली. पण धर्मवादी राजकारणाला थोडी मुरड घालण्याचा सल्ला हिंदुत्ववाद्यांना पटला नव्हता. महात्मा गांधींचा द्वेष हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणात होता; यामागे या आधी म्हटल्याप्रमाणे पेशवाई गेल्यानंतरची कारणे आहेत.

  • हिंसेचे राजकारण  
  • ३९. भारतीय राष्ट्रवादाचा विकास, इतिहास संशोधक न. र. फाटक  
  • १२८  महात्म्याची अखेर......ह्या जगन फडणीस ह्यांच्या पुस्तकातून

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3311538472215204&id=100000772521887

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com