रात्रभर धिंगाणा घालणाऱ्या ठाण्यातील हुक्का पार्लर- बार यांना कोणाचा आशिर्वाद

ठाणे महानगर पालिकेने मोठ्या संख्येने मानपाडा वर्तकनगर विभागातील अनधिकृत तसेच फायर परवाना नसलेल्या हुक्का पार्लर आणि लॉजिंग बोर्डींग, बारवर धडक कारवाई केली. मात्र कारवाईनंतर केवळ महिन्याभरातच हे सर्व बार आणि हुक्का पार्लर नियमित सुरु झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये निळकंठ ग्रीन्स रोड परिसरातील  द डान्सींग बॉटल्, The Dancing Bottle तसेच बरफपाडा परिसरातील अभ्यंकर हॉस्पीटलच्या बाजूला असलेले हॅंगआऊट , कोठारी कंपाऊंड, टिकुजीनी वाडी रोड येथील MH04 हॉटेल,  Smt Gladys Alvares Rd, वरील LOUNGE-18, C1/B1 kothari compound मधील  27ACRES, या मानपाडा गावातील बार हुक्का पार्लर  तसेच बार आणि हॉटेल खुले आम कोविडचे नियम पायदळी तुडवत आहेत.  हे बार आणि पार्लर रात्र १२ वाजेपर्यंत सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या आशिर्वादाने हे बार आणि पार्लर सर्व नियम पायदळी तुडवून सुरु असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. अद्यापही कोणताही फायरपरवाना नसताना रात्रभर सुरु असणाऱ्या या हुक्कापार्लरकडे ठाणे महापालिकेचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याची चर्चा परिसरात होत आहे.  हे बार आणि हुक्का पार्लर कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत असा प्रश्नही स्थानिक रहिवाशी विचारत आहेत. 

    
महापालिका हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन व्यवसाय करणे बंधनकारक आहे. शहरात सुमारे दोन हजार शाकाहारी, मांसाहारी आणि बिअरबार रेस्टॉरंट आहेत. त्यापैकी अवघ्या 40 ते 50 हॉटेल व्यावसायिकांकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे.   हुक्का पार्लर, पब आणि रेस्टॉरंट यांच्याकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही. अशा हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लरला महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची आग्रही भूमिका सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी मांडली होती. त्यावेळी महापालिकेने शहरातील ज्या-ज्या हॉटेल व्यावसायिकांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले होते. जो न्याय कोठारी कंपाऊंड सर्व व्यावसायिकांना तोच न्याय अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेणार्या प्रत्येकांना लावण्यात आला आहे. मग या बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA