लिपिकावर तात्काळ कारवाई...मग अनधिकृत बांधकामाना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही

 ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्पक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले.    त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा करत असताना  ठाणे महापलिकेचे लिपीक विवेक महाडीक यांचा फोटो व्हायरल झाल्याने ठाण्यामध्ये चर्चेला उधाण आले होते. याची दखल घेत ठाणे महापालिका प्रशासनाने महाडीक यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र या कारवाईवर ठाण्यातील काँग्रेसचे नेते संजय घाडीगावकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी एका सामान्य लिपिकावर केवळ वाढदिवस साजरा केला म्हणून एवढी मोठी कारवाई मग २०१९-२० या काळात कर्तव्यावर असलेले उपआयुक्त अशोक बुरपुल्ले,  सहा.आयुक्त सचिन  बोरसे, महेश आहेर, सागर साळुंखे, अनुराधा बाबर यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी का कारवाई करण्यात येऊ नये असा प्रश्न घाडीगावकर यांनी उपस्थित केला आहे.  

   विवेक महाडीक  हे नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर केवळ वाढदिवस सोबत साजरा केला म्हणून सरळ निलंबनाची कारवाई. मग ठाण्यातील या प्रचंड अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही. याबाबत वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार करूनही संबंधित अधिकारी या पत्रांना केराची टोपली दाखवत आहेत. अद्यापही नौपाडा परिसरातील परप्रांतिय गुप्ताने भर बाजारपेठेत गाळे बांधले आहेत. याबाबत नौपाडा प्रभाग समितीला दोन वेळा अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? असा प्रश्न आता ठाणेकर करीत आहेत. 

शहराच्या विविध भागात रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु फेरीवाल्यांच्या विरोधात ही कारवाई सुरु असताना नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाचा फेरीवाल्यांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा फोटो सोडल मिडियावर वायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली मात्र या फेरीवाल्यांवर कुणाचा वरदहस्त आहे. कोण यांच्या पाठिशी आहे. कोणते अधिकारी चिरीमिरी घेऊन यांना सूट देत आहेत. याचा तपास व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA