सोमय्यांच्या स्थानबद्ध पोलिसांच्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर शिवसेनेसोबतचा भाजपाचा संघर्ष आणखी पेटणार असल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री उथ्दव ठाकरे यांच्या भावी सहकारी सूचक शब्दानंतरही ही कारवाई झालेली असल्याने भाजपा आणि शिवसेना तुर्तास एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेते आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय गणेशोत्सव सुरु आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. त्यांच्यावर ताण आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
ट्रिटरवरून सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत रहात असलेल्या इमारतीच्या खाली पोलिस फौजफाटा दाखवित ठाकरे सरकारची दडपशाही माझ्या घराच्या खाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीं ट्रिटरवरून किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती देत जरी सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याचा आम्ही निषेध करतो.
0 टिप्पण्या