Top Post Ad

मुंबई महापालिका करते एका पेंग्विनकरिता वर्षाला ७१ लाख रुपये खर्च

 सात पेंग्विनला १५ कोटी आणि २८ हजार कायमस्वरूपी  व ४५०० कॉन्ट्रॅक्ट वर काम करणाऱ्या सफाई कर्मचार्‍यांना काय ? 

महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनो पक्षी प्रेमाला आवर घाला व मनुष्य प्राण्यावर ही लक्ष द्या. महानगरपालिकेची निवडणूक येत आहे, लक्षात ठेवा सामान्य जनतेला वेठीस धरणार की श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवणार!
ये पब्लिक है सब जानती है !
आहे रे वर्गाचे लाड करणाऱ्यांनो, नाही रे वर्गाकडे सुद्धा लक्ष द्या. अशी म्हणायची वेळ आलेली आहे.
स्वच्छ आणि सुंदर मुंबई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न अधांतरी आहे पीटी केसच्या बाबतीत उदासीनता,  सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न नाहीत मात्र पर्यटनाच्या नावाखाली पेंग्विन पक्षाला पायघड्या. 

खाली नमूद केलेली आकडेवारी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हा पेग्विन वरचा खर्च खरच मोठा आहे 

पेंग्विनवरील खर्च

  • - एका दिवसासाठी २० हजार रुपये
  • - सात पेंग्विनसाठी दररोज १.५ लाख
  • - एका महिन्याचा खर्च सहा लाख रुपये
  • - एका महिन्याचा खर्च ४२ लाख रुपये
  • - एका वर्षाचा एका पेंग्विनचा खर्च ७१ लाख रुपये
  • - एका वर्षाचा सात पेंग्विनचा खर्च पाच कोटी रुपये
  • - एकूण तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये 

  सफाई कर्मचार्‍यांच्या बाबतीत उदासीनता
२००६ साली सुरक्षा यंत्रणेने बद्दल सफाई कर्मचारी विकास संघ यांनी माहितीचा अधिकार टाकला होता त्याच्यामध्ये त्यांना आढळून असं आलं की,  सर्वसाधारणपणे ४०ते ५२ वर्षापर्यंत सफाई कर्मचाऱ्यांचे आयुष्य असतं आणि पंचवीस लोक प्रत्येक महिन्याला मरण पावत आहेत. त्यांच्या घराचा विषय सुद्धा मोठा आहे परंतु त्यांच्या हाऊसिंग सोसायटी मधली परिस्थिती भयंकर आहे, सफाई कर्मचाऱ्यांना घरासंदर्भातला विषय डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेच्या माध्यमातून अजून पुढे सरकत नाही, त्या शासन निर्णयावर काही कार्यवाही होत नाही. २०११-२०१२ व २०१३- २०१४ या वर्षीच्या अर्थसंकल्पात फक्त चर्चा झाली मात्र त्याच्या नंतर कधीही सफाई कर्मचाऱ्यांच्या घराविषयी चर्चा झाली नाही. २८ हजार कायमस्वरूपी सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांना तीस ते चाळीस हजार पगार मिळतो ४५०० हे कॉन्ट्रॅक्टर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना सर्व साधारण दहा ते पंधरा हजार पगार मिळतो अशी एकूण परिस्थिती आहे. 

  स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यासाठी झटणारा हा वर्ग बेसिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे मात्र आजची पेंग्विनची जी बातमी चालू झाली आणि कुतुहलाचा आणी कौतुकाचा विषय म्हणून राणीच्या बागे मधली पेंग्विन पक्षी यांच्या बद्दल त्यांना दिले जाणारे १५ कोटीचे बजेट व दिली जाणारी सुविधा, वातानुकूलित कक्ष आणि पर्यटनाच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर केलेली पैशाची उधळपट्टी हे सर्व लक्षात येते. हे सामान्य जनतेलाही कळत आहे मात्र जेव्हा आपण तुलना करतो पक्षांच्या वर प्रेम आणि पर्यटनाचा विषय आपण समजु शकतो परंतु माणसासारखी माणसं असणारी आपल्या मुंबईसाठी आपला आयुष्य, आपलं श्रम देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी महानगरपालिका काही करताना दिसत नाही. अनुशेषाचा प्रश्न असेल अनुकंपातत्वाखाली काम देण्याचा विषय असेल, पी टी केसचा विषय असेल या बाबतीत उदासीनता दिसून येते. सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न सातत्याने कामगार संघटनांच्या माध्यमातून व बहुजन मुन्सिपल संघाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न  प्रकाश जाधव कामगार नेते सातत्याने माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांच्या माध्यमातून या प्रश्नावर चर्चा घडवण्याचा प्रयत्न करतात. सह्याद्री अतिथीगृहावरिल शासकीय बैठक असेल महानगरपालिकेच्या बैठक असतील संधी मिळेल तेथे हा प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

आजच्या सारखी एखादी घडामोडी समोर घडते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून पैशाची उधळपट्टी कशी होते हे दिसून येते, तेव्हा सर्वसामान्य असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या व दुर्बल घटकाच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका काय करते हे लक्षात येते. आहे रे वर्गाच्या बाबतीत त्यांना पायघड्या घातल्या जातात मात्र या मुंबईसाठी झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा आयुष्यात फक्तच त्यांच्या हातामध्ये कष्ट आणि आश्वासन याच्या व्यतिरिक्त काहीच मिळत नाही. या परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांना सामान्य जनतेने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवावा, सर्वसामान्य माणसासाठी काम करणार की आहे रे वर्गाचे लाड पुरवणारा हा प्रश्न सामान्य जनतेने विचारला पाहिजे. सामान्य जनतेने या संदर्भामध्ये त्यांच्या मूलभूत प्रश्नाच्या बाबतीत दुजाभाव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत आगामी निवडणुकीच्या माध्यमातून ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही, अशी आशा बाळगू. 

-प्रविण मोरे,
सामाजिक कार्यकर्ता 
खारघर, नवी मुंबई 
मो. ९८१९४१६१८४


भायखळा येथील प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींचे टेंडर मागवण्यावरून आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करू शकतात, मग पेंग्विनच्या १५ कोटींचा ठेका कुणासाठी, असा प्रश्न त्यांनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे. वाघ हा आपल्या वातावरणात राहू शकतो, मात्र, पेंग्विन आपल्या वातावरणात राहू शकत नाही, त्यासाठी देखभालीची गरज असते, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या होत्या. त्यावर, बालहट्टासाठी मुंबईकरांची फसवणूक का करता, हा माझा मूळ प्रश्न आहे. पेंग्विन राणीच्या बागेत आणल्यानंतर पर्यटन वाढलय का, तर त्याचं उत्तर नाही, असं महापालिकेचे आकडे सांगतात. राणीची बाग पाहण्यासाठीचे तिकीट पाचवरून ते ५० रुपयांवर नेले. त्यामुळे मुंबईकरांनी राणीच्या बागेकडे पाठ फिरवली आहे. पेंग्विनसाठी १५ कोटींचे टेंडर का काढलंय, याचं उत्तर द्या, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com