दहीहंडी हा एकाला हंडीच्या ध्येयापर्यंत रचलेल्या पायऱ्यांचा खेळ आहे. की विरोधाभास खरा आहे

    दहीहंडी म्हणजे धमाल मजा चुरस स्पर्धा आणि खास म्हणजे मऱ्हाठी लोकांचा खेळ. कृष्ण हे प्रामुख्याने उत्तर भारतीय किंवा गुजराथ्यांचं आवडतं दैवत पण दहीहंडीचा खेळ मराठी लोकांचा. आणि त्याच मराठी माणसांचा ज्यांना "एकमेकांचे पाय ओढण्यासाठी" ओळखलं जातं. गंमत म्हणजे दहीहंडी हा एकाला हंडीच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकांनी मिळून रचलेल्या पायऱ्यांचा खेळ आहे. विरोधाभास आहे खरा ! जुलै महिन्यात कोकणातल्या पुराचं थैमान आपण पहात होतो.... ह्यातल्या काही खऱ्या कार्यकर्त्यांची ओळख होत होती सोशल मिडीयातून. धान्य जीवनावश्यक वस्तूंची मदत गावोगावी पोहोचवली जात होतीच पण ही मंडळी लोकांना धीर देत होती .... सांत्वन करत होती. मानवतेचा मनोरा उभा रहात होता. 

त्याचवेळी मुंबईत काही मंडळीं अस्वस्थ होती .... धान्य जीवनावश्यक वस्तू मिळतंय खरं पण पुढे काय? व्यवसाय आधीच लॅाकडाऊन कृपेने ढासळलाय आणि आता ही आस्मानी सुल्तानी.... कसं सावरू शकतो ह्यांना?  मिटींग्स, फोन कॅाल्स.... आणि योजना ठरली. हे सर्व होते सलोन ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद. ह्या सर्व गोपाळांनी हे आव्हान लीलया पेललं. सर्वांनी मिळून मनोरा रचायला सुरूवात केली.  

  • पायाचा थर : पहाणी दौरा- महाड बिरवडी खेड चिपळूण सिंधुदुर्ग संघटनेच्या कार्यकर्त्यांशी मुंबईहून संपर्क करून बाधित सलून पार्लर्सची माहिती मिळविण्यास सांगितली आणि नंतर तिथे जाऊन त्या व्यवसाय बंधू भगिनींना भेटले.... त्यांना धीर दिला थोडं मोटिव्हेट केलं.
  • दुसरा थर : Beautiful Heart Fund ह्या सपोर्ट ग्रुपमध्ये मदतीचं आवाहन केलं. त्यातून Asbah, Olivia, Beautyshape, streax hair color, RR Beauty world, Megha Distributers HNK आणि SkinÁmore अशा कंपन्यानी मदतीचं वचन दिलं. काही मंडळींनी आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं.
  • तिसरा थर- मदतीखातरच्या वस्तू येण्यास सुरुवात होऊन सर्व दिल्या तारखेप्रमाणे जमा झालं. सर्व्हेनुसार वस्तूंची वर्गवारी झाली. एक सलोन किंवा पार्लरच्या बेसिक गरजांची पूर्तता होती ती. हेअर ड्रायर, क्लिपर, स्टीमर, कात्री, कोम्ब, आयब्रो थ्रेडस्, फेशियल किट्स, वॅक्सिंगचं साहीत्य, आयर्न, टॅान्ग्स, हेअर कलर आणि डेव्हलपर्स. व्यवसायाचा पुनश्च हरिओम करण्याची तरतूद होती. 
  • चौथा थर - सर्व सामान भरून कार्यकर्त्यांच्या फळीसह टेम्पो रवाना झाले. आणि पहिला टप्पा चिपळूण नंतर खेड तिथून बिरवडी आणि शेवटी महाड. झंझावातासारखा कार्यक्रम. 

सर्वात वरच्या थरावर कोण होतं? तिथे होते  आमचे सर्व पूरग्रस्त सलोन ब्युटी पार्लर व्यावसायिक. स्वत:च्या पायावर पुन्हा उभं राहण्याच्या ध्येयापर्यंत त्यांच्याच व्यवसायबंधूंनी पोहोचवलं होतं.

-हर्षदा टक्के-    बोरिवली,मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA