उरण - लाखो युवकांना बेरोजगार करणाऱ्या केंद्र सरकारला जाब विचारण्याचा दिवस म्हणून 17 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' म्हणून सर्वत्र पाळला जात आहे. या निमित्ताने उरण तालुक्यातील सर्व तरुण व महिला कामगारांनी केंद्र शासनाच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत विविध घोषणा देत राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला. यापुढे कोणाचाही रोजगार जाऊ नये आणि कोणाचाही संसार रस्त्यावर येऊ नये यासाठी निषेध नोंदवत कामगार वर्गांनी रस्त्यावर येऊन निषेध नोंदविला.हा निषेध मोर्चा कामगार नेते, इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.
हया मोर्चासाठी उपस्थित उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक- लंकेश हिरामन ठाकुर,सरचिटणीस उरण तालुका इंटक- प्रांजल दशरथ भोईर, सचिव उरण तालुक़ा युवक इंटक- रविंद्र क पाटील, उपाध्यक्ष उरण तालुका युवक- अनिल ठाकुर , सरचिटनिस रायगड जिल्हा युवक इंटक-अजित ठाकुर, उपाध्यक्ष मनसे उरण तालूका- राकेश भोईर,संदीप वर्तक , संदेश भोईर ,नितेश भोईर,समीर गावंड , सुंदर कोली, हौशिराम भोईर, राकेश भोईर, अनांत पाटील,शशि भोईर,संतोष भोईर,रोहन ठाकुर, समीर ठाकुर, निलेश मोड़खलकर,सागर ठाकुर, जरेंद्र ठाकुर,मोहिनी ठाकुर,सुलोचना ठाकुर,दमयंती ठाकुर, दमयंती भोईर,देवकाबाई भोईर,रेवती परब,रेखा ठाकुर,पुष्पाबाई पाटील,अरुणा ठाकुर, आनंदी पाटील,सूनंदा पाटील व इतर कामगार उपस्थित होते.आज तरुणांना नोकऱ्या नाहीत, रोजगार उपलब्ध नाहीत.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे.पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी रोजगार बाबत दिलेला शब्द पाळला नाही. रोजगार देणे दूरच उलट मा.नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून तरुणांच्या अनेक नोकऱ्या गेल्या आहेत. आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.त्यांनी घेतलेल्या कामगार विरोधी, रोजगार विरोधी धोरणाचा निषेध करत सदर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळण्यात आल्याचे इटंकचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या