टपाल विभागासाठीच्या आरक्षित भूखंडाचा विकास करणार?

  ठाणे शहरात एकूण १४ टपाल कार्यालये आहेत. यापैकी स्वत:च्या मालकीची ३ विभागीय इमारती आणि ११ टपाल कार्यालये भाड्याच्या जागेत सुरू होती, त्यापैकी सध्या फक्त १३ टपाल कार्यालये कार्यरत आहेत. ७ लाखांहून अधिक खातेदार या टपाल कार्यालयांशी निगडीत आहेत, एका टपाल कार्यालयाची इमारत अत्यंत धोकादायक झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ती रिकामी केली आहे, दुसरीकडे महापालिकेने १२ भूखंड टपाल कार्यालयासाठी आरक्षित केले आहेत. त्यापैकी पोस्टाच्या हलगर्जीपणामुळे हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या गुरुद्वारा शेजारी मोक्याच्या ठिकाणी असणारा भूखंड सुप्रीम कोर्टात अपील न केल्याने पोस्ट प्रशासनाकडून निसटून गेला आहे.

महापालिका क्षेत्रातील टपाल विभागाच्या आरक्षित भूखंडांच्या विकासाकरिता दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत महापालिका क्षेत्रातील टपाल कार्यालयांसाठी आरक्षित केलेले भूखंड विकसित न केल्याने त्यावर अतिक्रमण होऊन हातातुन निसटुन चालले आहेत. हि बाब खासदार राजन विचारे यांनी  निदर्शनास आणून दिली. यावेळी विचारे यांनी उदाहरण देताना ठाणे महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंड पैकी कोलशेत येथील खाजगी भूखंडावर जमीन मालक २००४ पासून एनओसी मिळविण्यासाठी टपाल कार्यालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहे. आज १६ वर्ष होऊन सुद्धा त्याला एन ओ सी मिळालेली नाही. हा विकासक जागेच्या क्षेत्रानुसार टपाल विभागास स्वतःची हक्काची इमारत उभी करून देण्यास तयार आहे. यासाठी एकही रुपया टपाल विभागास खर्च करावा लागणार नाही असे असून सुद्धा ना हरकत पोस्टाकडून मिळवून देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांना विचारणा केली असता त्यांनी १५ दिवसात मंजुरी देऊ आणि याची सुरुवात ठाणे येथून करू असे आश्वासन राजन विचारे यांना दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA