
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नांदेड येथे आरक्षण परिषद घेतल्याबद्दल संघटनेचे कौतुक करून पदोन्नती आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मंत्रालयात बैठक आयोजित करून तातडीने निर्णय घेण्यात येईल व सदर बैठकीला संघटनेच्या पदाधिकारी व शिष्टमंडळ यांना निमंत्रित करण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांना ठोस आश्वासन दिले.
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, संघटनेच्या वतीने सहा महसुली विभागात प्रत्येक एक याप्रमाणे आरक्षण परिषदा आयोजित करण्यात येणार असून त्या परिषदेला मी स्वतः, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मंत्री म्हणून आम्ही उपस्थित राहणार आहोत तसेच शेवटची आरक्षण परिषद मुंबईत आयोजित करण्यात येईल व त्या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करू.आरक्षण परिषदेची सुरुवात सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमाने करण्यात आली. यात जोली मोरे, सीमा पाटील व गौतम पगारे यांनी प्रबोधनात्मक गाणी गाऊन सभागृहात चैतन्य निर्माण केले.
आरक्षण परिषदेला दिनेश डिंगळे, सुरेशदादा गायकवाड, काकासाहेब खंबाळकर, राजाराम खरात, दादाभाऊ अभंग, रघुनाथ महाले, सुबोध भारत, लक्ष्मण देवकरे नितीन सवडतकर, भारत कालिंदे यांनी परिषदेस मार्गदर्शन केले. पुरूषोत्तम धोंडगे, संजीवनी गायकवाड, सुरेश सोनकांबळे, दिनकर पाटील कंदारे, रमेश डोंगरदिवे, सी.आर.निखारे, विजय नांदेकर, डॉ. एन.डी. पाटील, प्राचार्य राजेश सोळंके, देविदास कवडे, एस जे तायडे राजू देवकाते, देवानंद कांबळे, स्नेहा कुटे, काळबा हनुवते, डॉ नितीन गायकवाड, राजरत्न पवार, बाशीर शेख, छाया कांबळे, प्रा..अनिल गायकवाड, दीनानाथ जोंधळे, सुनील वाघमारे, सुरेश आरगूवाल, रामचंद्र वणजे, डॉ राहुल कांबळे, डॉ. माधव काळेकर, प्रदीप नन्नवरे, प्रेम गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
आरक्षण परिषदेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संविधानाच्या माध्यमातून 16 (4) प्रमाणे मिळालेले आरक्षण आमच्या हक्काचे असून पदोन्नती आरक्षण पूर्ववत करण्यासाठी संघटनेच्यावतीने लढा सुरू असून ते पदोन्नती आरक्षण मिळवणारच असे वानखेडे यांनी सांगितले.
सर्व मान्यवर वक्ते, प्रमुख पाहुणे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांचा सेवापूर्ती निमित्ताने राज्यमंत्री संजय बनसोडे व अध्यक्ष भारत वानखेडे यांच्याहस्ते डॉ उत्तमराव सोनकांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदा उत्तमराव सोनकांबळे यांचा तथागत बुद्धांची मूर्ती, स्मृतिचिन्ह, शाल, उभयतांना पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारात डॉ सोनकांबळे यांचे वडील तुकाराम सोनकांबळे, आई इंदरबाई सोनकांबळे, पुत्र सुरेंद्र सोनकांबळे, अक्षय सोनकांबळे, मुलगी ममता सोनकांबळे व सोनकांबळे परिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र वणजे, राजरत्न पवार, डॉ नितीन गायकवाड व सी आर निखारे यांनी केले व आभार डॉ. नरेंद्र पाटील, विजय नांदेकर राजेश सोळंके यांनी मानले.
0 टिप्पण्या