लोकल मुभा मात्र लस सक्तीची... १५ ऑगस्टपासून जीवनवाहीनी सुरू- मुख्यमंत्री

 
 राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे.  याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल ट्रेन सुरु करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

'१५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होईल. मात्र लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा असेल. यासाठी आपण एक अॅप तयार करत असून या अॅपच्या आधारे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी पास घेता येईल. तसंच हा पास ऑफलाईन पद्धतीनेही उपलब्ध करण्यात येईल,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 'सोमवारी आपण टास्क फोर्सकडून आढावा घेणार आहोत. त्यानंतर आणखी कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. याला साधारण ८ ते १० दिवस लागतील. त्यासाठी आपल्या संयम ठेवावा लागेल. अनेकजण हे उघडा...ते उघडा अशा मागण्या करत उचापत्या करत होते, पण जनता त्यांना बळी पडली नाही,' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 गणपती आणि इतर सण यायचे आहेत. मागील वर्षी सणांनंतर आपण दोन लाटा अनुभवल्या. त्यामुळे या काळापासून आपण शिकलो आहे की करोनाबाबतचे नियम पाळावेच लागतील. आपला लसीकरणाचा वेग अजून वाढत जाणार आहे. जोपर्यंत ठराविक टक्क्यांपर्यंत लसीकरण होणार नाही, तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आयसोलेश बेड, व्हेंटिलेटर्स या सुविधा आपण वाढवल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी आपण ठराविक जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा वाढवल्या आहेत. तसंच इतर निर्बंधही शिथिल केले आहेत. 

राज्यातील करोनाची स्थिती संमिश्र आहे. विशेष म्हणजे पूर येऊन गेलेल्या ६ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक असल्याचं दिसत आहेत. करोनामुक्तीसाठी आपण याआधीही करोनामुक्त गाव यासारख्या काही योजना राबवल्या होत्या. त्याला अनेक सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बंद ठेवायला काही आपल्याला मजा येत नाही...मी तर म्हणतो २४ तास उघडं ठेऊ, फक्त मग आपल्याला प्रत्येकासाठी वेळा वाटून द्याव्या लागतील.  'पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अजूनही करोना संसर्ग कायम असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल,' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.


राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा दर आणि मृत्यू दर कमी आहे, अशा जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आतापर्यंत राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या