येणाऱ्या काळात ऑक्सीजनची गरज वाढल्यास लॉकडाऊन अपेक्षित - मुख्यमंत्री

 राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनच्यावर पोहोचेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल- मुख्यमंत्री

   मुंबई - राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  मात्र ज्या दिवशी राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनच्या वर पोहोचेल त्या दिवशी ‘ऑटोमोड’वर लॉकडाऊन लागेल, मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेचे स्वरूप दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात ऑक्सीजनची गरज वाढल्यास लॉकडाऊन अपेक्षित असल्याचा सुतोवा मुख्यमंत्र्यांनी केला .  

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी २० रुग्ण आढळले आहेत. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २ आणि चंद्रपूर,अकोला येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील ६५ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३३ स्त्रिया आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तत्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.  असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही व्यक्त केले आहे.

शाळा आणि कॉलेज उघडण्याबाबत त्या त्या भागातील प्रशासन निर्णय घेणार होते. मात्र राज्य कोरोना कृती दल, बालरोगतज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी शाळा उघडण्याबाबत प्रतिकूल मत नोंदवले आहे.राज्यातील ५ ते १२ वीपर्यंतच्या शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या २४ तासांत या निर्णयाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय राज्य कोरोना कृती दलाशी चर्चा करून मुख्यमंत्री स्वत: घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या