बाळकूम गाव, पाचपाखाडी. मुंब्रा चाँदनगरमधील अनेक बांधकामांवर ठामपाची कारवाई

  ठाणे : ठाणे महापालिकेची शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज विविध ठिकाणांची २० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईतंर्गत वागळे प्रभाग समितीमधील सुभद्रा निवास चाळ, किसन नगर येथील विटा सिमेंटचे पत्रे असलेले अंदाजे १० X १५ चौ. फुटाच्या बैठ्या खोलीचे बांधकाम तोडण्यात आले. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील  बाळकूम गावातील तळ मजला व्याप्त १ व २ मजल्यावर निष्कासनाची  कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभाग समितीमधील चाँदनगर येथील विटा सिमेंटची पाणपोई  तसेच  २ लोखंडी टपऱ्या तोडण्यात आल्या. दिवा प्रभाग समितीमधील जुना मुंबई पुणे हायवे शीळ फाटा येथील सरफराज चौहान यांचे ३ गाळे, रफिक खाटीक यांचे ५ गाळे निष्कासित करण्यात आले.

उथळसर प्रभाग समितीमधील पाचपाखाडी येथील सरोवर दर्शन को. ऑप. हौ. सोसायटी एसआरए  बिल्डिंग नं.१ ते १० मधील सदनिका / वाणिज्य गाळे धारकांनी मंजुरी व्यतिरिक्त केलेले वाढीव बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी गाव येथील अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या जानकी टॉवरवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील मनोरमा नगर बाजारपेठ मधील रस्त्याच्या बाजूला बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून ५ हातगाड्या, १० लोखंडी बाकडे जप्त करण्यात आले. 

           सदर निष्कासनाची कारवाई आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, कल्पिता पिंपळे, महेश आहेर, सागर साळोखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या