Top Post Ad

जेएनपीटी बनले ई-वाहनांचा वापर करणारे देशातील पहिले प्रमुख बंदर

मुंबई :  ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये 9 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. या वाहनांचा वापर मुख्यत: बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये कामगारांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला जाणार आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. यांनी आज या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते.  

विद्युत वाहनांचा वापर हे जेएनपीटीच्या ‘ग्रीन पोर्ट’ उपक्रमाशी सुसंगत असून जेएनपीटीने आपल्या  कर्मचाऱ्यांसाठी एक पर्यावरण अनुकूल वाहतूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बंदराच्या शाश्वत व हरित उपक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. ई-वाहने ही शून्य-उत्सर्जन वाहने असल्याने यांच्या वापारामुळे जेएनपीटी हरित व ऊर्जा-कार्यक्षम वाहतुक पर्याय निर्माण करण्यास सक्षम बनेल. जेएनपीटीने या नवीन ई-वाहनांसाठी एक डेडिकेटेड चार्जिंग स्टेशन देखील कार्यान्वित केले आहे.


ई-वाहनांच्या उद्घाटन कार्यक्रमात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, " बंदराच्या कामकाजाचा बंदर परिसरातील पर्यावरण व आसपासच्या समुदायांवर कमीत-कमी प्रभाव होईल यासाठी जेएनपीटीने सातत्याने शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. जेएनपीटीचे उद्दिष्ट केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न होने नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त करणे हे सुद्धा आपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जगभरातील उद्योग पर्यावरणदृष्ट्या जागरूक विश्वाप्रति आपली जबाबदारी ओळखुन आपल्या कामकाजामध्ये हवामान बदलाचे नवनवीन उपाय समाविष्ट करत आहेत. ई-वाहनांचा देखभालीसाठीचा खर्च कमी असून यांच्या वापरामुळे नैसर्गिक इंधनावरील खर्च व अवलंबित्व कमी होईल. ई-वाहनांचा वापर सुरू केल्याने आता जेएनपीटीचे स्थान जगातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी शाश्वत जागतिक बंदरांच्या बरोबरीचे झाले आहे. भविष्यात सुद्धा आम्ही स्वच्छ, हरित आणि शाश्वत बंदर निर्मितिसाठी प्रयत्नशील राहू. केवळ आर्थिकदृष्ट्या सपन्न होने हे आमचे उद्दिष्ट नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरता प्राप्त करने हे देखील आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशाप्रकारे भविष्यात देखील पर्यावरण संरक्षण हा जेएनपीटीच्या नियोजन व कामकाजाचा एक अविभाज्य घटक असेल.असा विश्वासही सेठी यांनी यावेळी व्यक्त केला.

जेएनपीटीने सीवेज ट्रीटमेंट प्लांट, टग्स/पोर्ट क्राफ्ट्सना किनाऱ्यावर वीज पुरवठा, सतत परिवेशी वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र, व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, ई-आरटीजीसी, ऑइल स्पिल रिस्पॉन्स (ओएसआर) सारख्या विविध पर्यावरणीय सुधारणा सुविधा व ग्रीन पोर्ट उपक्रम सुरू केले आहेत. जेएनपीटीने स्वत:च्या तसेच खाजगी टर्मिनल्सच्या सार्वजनिक इमारतींच्या छतावर सुमारे 2.3 मेगावॅटचे सौर पॅनेल देखील स्थापित केले असून बंदर परिसरात एलईडी दिवे देखील लावण्यात आले आहेत यामुळे उर्जेचा वापर व कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. जेएनपीटी पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय लक्ष्य (ईएसजी) प्राप्त करण्यासाठी ‘ऊर्जा व संसाधन संस्थे’  (टीईआरआय) च्या माध्यमातून शाश्वतेचा अभ्यास देखील करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com