पीक विमा योजनेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ व्हॅन

ठाणे :प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम योजनेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ व्हॅन प्रभावी ठरेल असे विधान ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. या चित्ररथ व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी  आवारात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, व कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. हे चित्ररथ व्हॅन ठाणे,कल्याण,मुरबाड,भिंवडी,अंबरनाथ,शहापूर,मुरबाड, या तालुक्यात फिरणार असून प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम 2021 योजनेच्या जनजागृतीसाठी मदत होणार आहे. विमा हप्ता भरावयाचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2021 असा आहे.

  योजनेची उदिष्टये :- नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे,पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे,  कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :- सदर योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल, प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरीक्त कुळाने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहे.सर्व अधिसूचित पिकासाठी ७०% असा निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेउन निश्चित केले जाईल.

जोखमीच्या बाबी :- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान,पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ. बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (पिकाचे काढणीपासून १४ दिवस) असे आहेत.

 ठाणे जिल्ह्यासाठी विमा कंपनी  संपर्क- ईपको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, टोल फ्री क्रमांक १८००-१०३-५४९० ई मेल: supportagri@iffcotokio.co.in

विमा संरक्षणाच्या बाबी : प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे,हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्ती,काढणी पश्चात नुकसान असे आहेत.

विमा प्रकरणे व विमाहप्ता जमा करणे :-

कर्जदार शेतकरी :- कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.शेतकन्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा अंतिम मुदतीच्या सात दिवस देणे अपेक्षित आहे, कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणेसाठी व सहभागी न होणेसाठी स्वतंत्र अर्ज करावेत.

बिगर कर्जदार शेतकरी :- बिगर कर्जदार शेतकरी आपल्या विमा प्रस्तावाची आदेश पत्र भरुन व्यापारी बँकांच्या स्थानिक शाखेत, प्रादेशिक ग्रामीण बँकेत, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह सादर करतील.

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमीतंर्गत करावयाची कार्यवाही व कालमर्यादा

शेतक-यांनी सर्व्हे नंबर नुसार पिक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आंत याबाबतची सुचना विमा कंपनी संबंधित बँक, कृषि/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात यावी.

जन सुविधा केंद्र - आपले सरकार केंद्र
(सीएससी एसपीव्ही) : -

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी जनसुविधा केंद्रामार्फत करता येईल.तसेच अधिक माहितीसाठी जन सुविधा केंद्रावरील गावपातळी सेवक (VLE), कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. भात व नाचणी या पिकांची जोखीम कमी करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा  काढावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA