बस स्थानकासाठी आमरण उपोषणाचा इशारा

    शहापूर बसपोर्टसाठी शासनाने पाच कोटी रुपये मंजूर करून कोकणातील सर्वात पहिले अद्यावत बसपोर्टलचे काम सुरू केले मात्र तीन वर्षे उलटून देखील हे काम खोळंबळे आहे. सदर खोळंबकेले काम तात्काळ सुरू करावे असे असे लेखी निवेदन रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना दिले आहे. हे काम तात्काळ सुरू न केल्यास  रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने सोमवारी १२ जुलै पासून तहसील कार्यालय शहापूर येथे आमरण उपोषण सुरू करणार असा इशारा देखील ज्योती गायकवाड यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

शहापूर बस स्थानक १९७६ साली बांधण्यात आले होते. हे बांधकाम जीर्ण झाल्याने या जुन्या बसस्थानकाच्या जागेवर शासनाने कोकणातील पहिले अद्यावत बसपोर्टल तयार करण्यासाठी मागील तीन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. काम सुरू देखील झाले मात्र तीन वर्षांपासून हे काम खोळंबळे आहे. त्यामुळे प्रवाशांना जीर्ण बांधकाम झालेल्या बस स्थानकात बसावे लागत आहे. जीर्ण झालेल्या बस स्थानकाची इमारत मोडकळीस आली असून छपराला तडे गेले असून स्टील देखील बाहेर आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच ही इमारत स्ट्रक्चरल ऑडीटनुसार धोकादायक ठरविण्यात आली आहे. 

या बसपोर्टलचे काम सुरू केले त्यावेळी या इमारतीच्या शेजारी असलेले सार्वजनिक सौचालय देखील तोडण्यात आले आहे. त्यामुळे महीला, पुरुष प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच या बस स्थानकाचे काम का खोळंबळे आहे? असा सवाल देखील ज्योती गायकवाड यांनी निवेदनात केला आहे. या बस स्थानकाचे काम १८ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावयाचे होते मात्र तीन वर्षे उलटून देखील हे काम खोळंबले आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खोळंबलेले बांधकाम लवकरच सुरू करावे अन्यथा १२ जुलै पासून आमरण उपोषण करणार असा इशारा रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी ठाणे तसेच शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या