ठामपाची अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

  ठाणे -  ठाणे महापालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम विरूद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेतंर्गत आज वर्तकनगर प्रभाग समिती आणि दिवा प्रभाग समितीमधील ७ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून दोघांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.   या कारवाईतंर्गत वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील येऊर येथील स्वानंदबाबा आश्रम येथील फार्म हाऊस मधील मोकळ्या जागेवर सुरू असलेले अंदाजे १००० चौ. फूट मोजमापाच्या नवीन बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या भिंती व ज्योत्याचे बांधकाम जेसीबी व मनुष्यबळ यांचे सहाय्याने पूर्णतः निष्कासित करण्यात आले आहे. तर टिकुजिनीवाडी रिसॉर्ट समोरील विद्युत वहिनी सब स्टेशन लगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये १०×२० चौ. फूट मोजमापाच्या अनिवासी गाळ्याचे अनधिकृत बांधकाम, बॉम्बे डक हॉटेल यांचे अंदाजे २०×२० चौ. फूट मोजमापाचे अंतर्गत वाढीव अनधिकृत बांधकाम आणि राम मंदिराच्या बाजूला रोनाचा पाडा येथील सुरू असलेले १५×३० चौ. फूट अधिक १५×२० चौ. फूट या मोजमापाचे नवीन बैठे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आले.

       दिवा समिती अंतर्गत वक्रतुंड नगर येथील वैभव मोहिते यांचे व साईनाथ नगर येथील राकेश शिंदे यांचे अनधिकृत आरसीसी बांधकाम व कॉलम गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले.सदर अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.      दरम्यान दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये राकेश राजाराम शिंदे आणि रवी गोविंद राडे यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA