ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्या

   ठाणे- शहरात किंवा शहराबाहेर कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उदभवलयास स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेला सुखरुप बाहेर काढणारे जवान म्हणजे टीडीआरएफ अर्थात ठाणे आपत्ती प्रतिसाद दल. पावसाळयातील पूर असो की, महाडमधील इमारत दुर्घटना असो,वरिष्ठांनी आदेश दिले की, हे जवान मदतीसाठी उपस्थित राहतात तर शेवटच्या माणसाला सुखरुप बाहेर काढेपर्यत  अविरत कार्य करत असतात.हाजुरी येथील रेंटल हाऊसिंग येथे ठाणे आपत्ती  प्रतिसाद दलाचा नियंत्रण कक्ष २४x७ सुरू असतो. सदय स्थितीत या कक्षाकडे ३३ जवान कार्यरत असून १ जीप, १पिकअप, ४०७ ट्रक व ३२ सीटर बस उपलब्ध आहे. या दलातील जवानांना शहर आपत्ती व्यवस्थापन संस्था, मुंबई, एन.डी.आर.एफ नागरी संरक्षण दल नवी मुंबई यांच्याकडून  प्रशिक्षण देण्यात आले आहे. या जवानांची दररोज पी.टी.ए,  स्कॉट ड्रिल व रनिंग घेण्यात येते व त्यांच्या फिटनेसकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाते.

आज या जवानांची भेट घेवून महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेवून  त्यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. तसेच या जवानांना ठाणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत विचारविनीमय करावा असेही निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. तीन हात नाका येथील हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलात कार्यरत असलेल्या ३३ जवानांसाठी महापौर नरेश म्हस्‍के यांनी अल्पोपहाराचे आयोजन केले होते.,.तसेच त्यांना एक महिन्याचे शिधावाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक संदीप माळवी, उपआयुकत मारुती खोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.

   

 या जवानांनी बदलापूर वांगणी येथे महालक्षमी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्‍या प्रवाशांना  सुखरुप बाहेर काढले, कोपरी भास्कर कॉलनी पंपीग स्टेशन येथे  तसेच दिवादातीवली, रघुकुल सोसायटी येथे पुराचया पाण्यात अडकलेलया नागरिकांची सुखरुप सुटका केली. महाड कोट अली काजळपुरा याठिकाणी इमारत दुर्घटनेत देखील या जवानांनी मदत केली.  भिवंडी येथे इमारत दुर्घटनेत देखील या जवानानीं  मोलाचे सहकार्य केले आहे.

 एनडीआरएफ प्रमाणेच टीडी आर एफ देखील मोलाचे सहकार्य करत आहे. या जवानांना ठाणे महापालिकेच्या प्रशासन सेवेत सामावून घेणेबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नमूद केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA