Top Post Ad

DYFI युवक संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

 DYFI युवक संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा
 शहापूर- सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, विशेषतः ग्रामीण भागातील पूर्ण पणे कोलमडली आहे.खाजगी दवाखाने आणि काळा बाजार करणारे जनतेला अक्षरशः लुटत आहेत. कोरोना काळात शैक्षणिक धोरण कोलमडून पडली आहे. परंतु यानंतर आश्रम शाळा व जि. प. शाळा सुरू होतील तेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आश्रम शाळांचे व जि. प. शाळेचे सक्षमीकरण करण्यात यावे अन्यथा DYFI युवक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. याबाबत DYFI युवा संघटना शहापूर तालुका कमिटीच्या वतीने शहापूर मतदारसंघातील आमदार, दौलत दरोडा यांना DYFI च्या वतीने  मतदारसंघातील स्थानिक प्रश्न सोडविण्याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली चर्चा करण्यासाठी उपस्थित कॉ.प्रकाश चौधरी, सुनील करपट, नितीन काकरा, भरत वळंबा, भास्कर म्हसे, कृष्णा भावर, विनोद घोटाळ, आनंद रोज आदी कार्य करते उपस्थित होते

  शहापूर मतदारसंघातील समस्या, प्रश्न, विकासात्मक कामे यामध्ये काही एक बदल झालेला दिसून येत नाही. तालुक्यात रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार या समस्या जैसे थे दिसून येत आहेत. येथील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळेच ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे.आजही अनेक गाव,पाड्यावर जाण्यासाठी रस्ते नाहीत, वीज नाही, रोजगार नसल्याने तालुक्यातील हजारो कुटुंबे दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरित होतात.  राज्य सरकारने लोकडाऊन काळात भरडले गेलेल्या आदिवासी भागासाठी खावटी अनुदान मंजूर केले असले तरी ते अटी-शर्तीच्या चक्रात फसले असून अद्याप कोणालाही मिळाले नाही, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी अजूनही अत्यंत असमाधान कारक आहे. उलट फॉरेस्टखाते ठीक ठिकाणी प्लॉटधारकाना त्रास देत सुटले आहे. अशा अनेक मागण्यांबाबतही यावेळी निवेदन देण्यात आले.

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com