ठामपाच्या शिक्षण विभागात शाळा सफाई करणार्‍या कंत्राटी कामगारांची उपासमार

 


 ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागात गेली १८ वर्षे शाळा साफ सफाई काम कंत्राटी पध्दतीवर करत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करत सफाई कामगारांना १ एप्रिल २०२१ रोजी पासुन शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आले आहे. या कामगारांमध्ये ८०% महीला कामगार असुन एकट्या कमावुन घर चालवित आहे. काही विधवा निराधार आहेत. अनेकांची घरे भाड्याचे असुन घरभाडे थकल्याने आणि रेशन, मुलांचे शिक्षण आदीसाठी उधारी झाल्याने आता मानसिक तणावाखाली जगत आहे. उत्पन्न बंद नसल्याने अतिशय हलाकीचे दिवस काढावे लागत आहेत. १ एप्रिल ते जून २०२१ पासुन सदर कामगारांना पगार नाही, १० जून २०२१ पासुन शिक्षक, शिपाई वर्ग कामावर रुजु झाले. शाळेत अस्वच्छता र्निमाण झाली असताना सफाई कामगारांना मात्र हजर करुन घेण्यास मज्जाव केले जात आहे. आम्हाला शाळेत कामावर येण्यास मज्जाव न करता नियमितपणे येण्यास परवांगी द्यावी अशी विनंती या कामगारांनी पत्राद्वारे ठामपाकडे केली आहे. 

मागील वर्षी अचानक लागलेला लाँकडाउन १५ मार्च २०२० ते ३० आँगस्ट २०२० पर्यंत कोरोनाच्या फैलावा मुळे ५ ते ६ महिने शाळा बंद होत्या. लाँकडाउन काळातील कोणाचेही पगार कपात करु नये असे शासनाने र्निदेश दिलेले असताना ही व  आँगस्ट २०२० मध्ये ठाणे कामगार उपआयुक्त यांच्या दालनात ठा.म.पा. अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत अर्धे पगार (५०%) वेतन देण्यात यावे याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. तरीही एक ही रुपया वेतन अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही.तसेच ठाणे मनपा प्रशासनाकडे आमच्या किमान वेतनाचे फरकाची थकीत रकमेचे देखील वाटप केले गेले नाही.  सध्या कामगारांची कठीण परिस्थिती असताना, मार्च २०१५ ते आँक्टोबर २०१६ किमान वेतनातील फरकाचे शिल्रक राहीलेले हत्प्याची रक्कम कामगारांना अदा करण्यात यावे.जेणे करुन कामगारांची उपासमार टळु शकेल.असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

तसेच १) शाळा साफ सफाई साठी कामगारांना कामावर हजर करुन घ्यावे.  २) कोरोना काळातील १५ मार्च २०२० ते ३० आँगस्ट २०२० आणी १ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत ची वेतन कामगार उपआयुक्त कार्यालयात महापालिका प्रशासनाने मान्य केल्या नुसार ५०% टक्के दराने वेतन अदा करावे. ३) किमान वेतन अधिनियम आधारित सुधारीत वेतनाच्या फरकाची थकित रक्कमाचे उर्वरित हप्त्याची रक्कम अदा करावी. सदरचे कामगार मुळचे ठाणेकर रहिवाशी असुन कोरोनाच्या नावाने आमची व कुटुंबियांची उपासमार थांबवण्यासाठी आपण तात्काळ न्याय भूमिका घ्यावी, अशी विनंती या कामगारांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, महापौर नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे सभापती, ठाणे जिल्हाधिकारी, कामगार उप आयुक्त, ठाणे यांना केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या