ठाणे - गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. या दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त बनले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक मा. खा. आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेत, चूल पेटवून; बैलगाडी- सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला. तर, महिलांनी या ठिकाणी चूल पेटवून भाकऱ्या भाजल्या. काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून रिकामा सिलिंडर उचलून तर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बैलगाडी हाकून केंद्र सरकारचा निषेध केला.
गेल्या महिनाभरात 790 रुपये असणारा सिलिंडर 834. 50 रुपये एवढा महाग झाला आहे. याचा महिलांनी निषेध चूल पेटवून केला आहे. ठाण्यात सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. त्यामुळे युवक आणि युवतींनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला आहे तर, बैलगाडी चालवून आता कार पेक्षा बैलगाड्याच चालवाव्या लागतील, असा संदेश देत केंद्र सरकारचा निषेध केला असल्याचे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. मोदी सरकार हे सामान्यांना लुटण्यासाठी आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना; बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जनतेच्या मनातील रोष ओळखून आता तरी मोदी सरकारने इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करीत जर इंधनाचे दर कमी केले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला.
पेट्रोलची किंमत ७ पैसे वाढली तर अटलबिहारी वाजपेयी बैलगाडी घेऊन संसदेत गेले होते! तेव्हा पेट्रोलची किंमत वाढणं म्हणजे जनतेची लूट होती. आजकाल त्याला देशसेवा म्हणतात आणि प्रश्न विचारणा-याला देशद्रोही!!
0 टिप्पण्या