शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करावे
- बीज भांडवल योजना - भौतीक - 56, आर्थिक(लक्ष) - 32.00.
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना -भौतीक - 140, आर्थिक(लक्ष) - 159.60.
- गट कर्ज व्याज परतावा योजना - भौतीक - 32, आर्थिक(लक्ष) - 180. 60.
- थेट कर्ज योजना (महामंडळ) -भौतीक - 110, आर्थिक (लक्ष) – 110.00.
महामंडळाच्या कर्ज योजना व त्यामधील अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
अ) बीज भांडवल योजना :- राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून कर्ज योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग 5 टक्के राहिल. या योजनेमध्ये प्रकल्प मर्यादा 5 लक्ष इतकी आहे. व्याजाचा दर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 5 वर्ष इतका आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष पर्यंत आहे.
ब) थेट कर्ज योजना :- बिगर व्याजी कर्ज , 4 वर्षात परतफेड, कर्ज रु. 1 लक्ष. अर्जदाराचे वय 18 ते 55 पर्यंत, आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लक्ष पर्यंत, सिबील स्कोर 500 च्यावर, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पुरावा, रेशन कार्ड, आधार लिंक बँकेचे पासबुक, व्यवसाय जागेचे प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचा पुरावा/भाडे करारनामा, व्यवसाय परवाना (उद्योग अधार /शॉप ॲक्ट/उद्यम), तांत्रिक कौशल्य प्रमाणपत्र, जामीनदार : दोन शासकीय अथवा सात बारा.
क) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना :- बिगर व्याजी कर्ज, 5 वर्षात परतफेड, बँकेमार्फत कर्ज (राष्ट्रीयकत व इतर शैड्यूल बँक), कर्ज मर्यादा रु. 10 लक्ष. अर्जदाराचे वय 18 ते 50 पर्यंत, आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 8 लक्ष पर्यंत, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पुरावा, रेशन कार्ड, आधार लिंक बँकेचे पासबुक, व्यवसाय परवाना (उद्योग अधार/शॉप ॲक्ट/उद्यम), ज्या बँकेत कर्ज अर्ज दाखल करावयाचा आहे त्या बँकेचे पासबुक झेरॉक्स.
ड) गट कर्ज व्याज परतावा योजना :- बिगर व्याजी कर्ज, 5 वर्षांत परतफेड, बँकेमार्फत कर्ज (राष्ट्रीयकृत व इतर शेडयूल बँक), कर्ज मर्यादा रु. 50 लक्ष. बचत गट, भागीदारी संस्था, अर्जदाराचे वय 18 ते 45 पर्यंत. आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 8 लक्ष पर्यंत, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पुरावा, रेशन कार्ड, आधार लिंक बँकेचे पासबुक, व्यवसाय परवाना (उद्योग अधार/शॉप ॲक्ट), ज्या बँकेत कर्ज अर्ज दाखल करावयाचा आहे त्या बँकेचे पासबुक झेरॉक्स, नोंदणी प्रमाणपत्र.
ऑनलाईन अर्ज : www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेत स्थळावर करावयाचा असून अर्ज करण्यासाठी याप्रमाणे कार्यवाही करावी, असे जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. ठाणे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या