आता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा असेल!.

मागासवर्गीय समाजाला आरक्षण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु वैचारिक मांडणीमुळे मिळाले होते.त्यासाठी त्यानी जे कष्ट,त्याग आणि जिद्द दाखवली त्यांची मूल्यमापन कोणत्याही किंमतीने होऊ शकत नाही. त्यांनी संघटित होऊन शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून ठेवण्याचे आवाहन केले होते.तेच उद्धिष्ट आजचा आरक्षण लाभार्थी विसरून आरक्षणाला विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटना युनियनचे सभासद आहेत. त्यांनीचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याची जोरदार मांगणी केली.राज्य सरकारने त्यांचे ते निवेदन सर्वोच्च न्यायालयात सादर केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला नाही.तरी राज्य सरकारने खुल्या वर्गातील कर्मचारी अधिकारी यांना पदोन्नती देण्याचा झपाटा सुरू केला.त्यामुळेच आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा असेल!.

आरक्षण लाभार्थी संघटना,युनियन, कृती समित्या मोर्चा, निदर्शने, धरणे करून राज्य सरकारला इशारे,आव्हान धमक्या देत आहेत.दुसरीकडे अडीच ते तीन लाख आरक्षण लाभार्थी कर्मचारी अधिकारी त्यांच्या संघटनेतून राजीनामा देऊन बाहेर निघण्याची हिंमत दाखवीत नाही. किंवा त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली जे सरकारला पत्र दिले त्याला तरी त्यांची सहमती नाही असे लेखी पत्र देण्याची हिंमत दाखविणे आवश्यक असताना तो ही निर्णय ते आरक्षण लाभार्थी घेत नाही. हीच मोठी खेदाची गोष्ट आहे. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन लाचार पणे जीवन जगणारे हे उच्चशिक्षित समाजाच्या व चळवळीच्या काही कामाचे नाहीत,इतिहासत यांची नोंद मागासवर्गीय उच्चशिक्षित गुलाम म्हणून झाल्या शिवाय राहणार नाही.त्यांच्याकरिता ही कारआरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा असेल!.

आज बहुसंख्य आरक्षण लाभार्थी कर्मचारी अधिकारी आरक्षण भारतीय नागरिकांना,कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून स्वातंत्र्य आहे काय?. स्वतंत्र कोण आहे ?. भारतात अन्याय अत्याचारा विरोधात लढणाऱ्या संस्था, संघटना खुप आहेत,त्याच बरोबर विविध वंचीत घटकांना न्याय हक्क आणि प्रतिष्ठा मिळवुन देणाऱ्या,व त्यासाठी झटणाऱ्या संस्था,संघटना सुध्दा खुप प्रमाणात आहेत. 
पण त्या स्वतंत्र आहेत काय?. न्याय हक्क आणि अधिकार यासाठी लढणारे झटणारे समाजसेवक किंवा कार्यकर्ते कसे ओळखाल यांची व्याख्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली आहे.ते म्हणतात. "जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो.जो रुढिच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो.जो पराधीन झाला नाही, जो दुसर्‍याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसर्‍याच्या हातचे बाहूले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.त्यासाठीच मी स्वतंत्र मजदूर युनियन व स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला होता,जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसर्‍याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवीत नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रितीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश: जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."-विश्वरत्न 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (संदर्भ- 'मुक्ती कोन पथे?' हे ३१ मे १९३६ मधील बाबासाहेबांचे गाजलेले भाषण),

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजदुर युनियनची आणि स्वतंत्र मजूर पक्षची स्थापना १५ ऑगस्ट १९३६ ला केली होती.पुढे ती सर्व मजूर,कामगार कर्मचाऱ्यांच्या घराघरात का गेली नाही यांचे उत्तर त्यांनी वरील भाषणात दिले आहे. जे मजूर बहुसंख्येने असुन ही स्वतःच्या न्याय अधिकारासाठी भांडू शकत नसतील तर ते स्वतंत्र कसे असतील?. स्वातंत्र्याचा अर्थच त्यांना कळला नसेल तर ते स्वतःच्या विचारांची संघटना,युनियन आणि पक्ष कसे काय बांधू शकतील?. तेव्हाचे मजूर कामगार अज्ञानी,अशिक्षित होते.पण १९६०/७० ची पिढी सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारी व शिक्षणात नोकरीत आरक्षण घेणारे लाभार्थी होती.त्यांनी बाबासाहेबांच्या ट्रेंड युनियन आणि पक्षाला कोणत्यातच दुष्टीकोनात वाढू दिले नाही.स्वार्थ आणि अहंकार यात ती पूर्णपणे गटबाजीत वाटल्या गेली.त्यामुळे संस्था, संघटना बांधणी साठी जो कृतिकार्यक्रम लागतो तो त्यांनी कधीच राबविला नाही,विचारधारेचा राजकीय पक्ष आणि राजकीय विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन यांनी कधी बांधलीच नाही.त्यामुळे सर्व क्षेत्रातील संघटित असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांना न्याय आणि अधिकार मिळाला नाही, उलट अन्याय,अत्याचार सहन करावा लागला.

त्या विरोधात एक दिवसा साठी सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन प्रचंड मोर्चा, निदर्शने, धरणे आंदोलनात गर्दी दाखविली.पण कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी मागासवर्गीय समाजाच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी एकत्र राहिले नाही.म्हणूनच स्वतःला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेणारे अनेक नेते निर्माण झाले.उच्चशिक्षित वरिष्ठ अधिकारी यांनी ही तेच काम केले.ई झेड खोब्रागडे, उत्तम खोब्रागडे, रत्नाकर गायकवाड,आर के गायकवाड, कांबळे,सोनटक्के सारखे अनेक उच्च पदावरील अधिकारी आणि सोनारे,वानखेडे, इंगळे,गाडे,तायडे,पहुरकर,हिवराळे,खरात,शेगोकर सारखे मंत्रालयातील अवल सचिव पदा पर्यंत पोचलेले अधिकारी, रेल्वे,एअर इंडिया, गोदी, बँका, महाविद्यालय,हॉस्पिटल, महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषदा या ठिकाणी मागासवर्गीय कामगार, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने असुन त्यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढल्या नाहीत.ज्या काही काढल्या ही तर त्या स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) शी का जोडल्या नाही?.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार चळवळी वरील भाषण त्यांनी मांडलेली भूमिका यांनी वाचली नसेल?. असे म्हणता येईल काय?.या लोकांनी वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी क्षेत्रात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी वेळोवेळी सोईनुसार तडजोड केल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत समस्या प्रोमोशन,इन्क्रीमेंट, वरटाईम,आऊट स्टेशन अलाऊन्स सारख्या स्वार्थ साधणाऱ्या समस्या सुटल्या असतील. 

पण त्याकरीता त्यांना त्यांच्या वरिष्टाच्या पायाच पडावे लागले.मग असे अधिकारी कर्मचारी मागासवर्गीय असुन ही मागासवर्गीय समाजाच्या लोकांना न्याय आणि अधिकार मिळवुन देण्यास कमी पडले, खैरलांजी ते शिर्डी व्हाया राष्ट्रमाता जिजाऊची मातृभूमी शिंदखेड राजा जवळचे रुहीखेड मायबा येथील मागासवर्गीय महिलेची नग्न धिंड ,३० वर्ष वनविभागाची पडीत जमीन शेती करून वहीत करणारा भूमिहीन शेतमजूर शालीग्राम सुलताने गावात साधन पाटील शेतकऱ्यापेक्षा घरदार,गुरेढोरे आणि धान्याच्या राशीमुळे गावात मागासवर्गीय समाजात शेतकऱ्यांचा शेतमजुराचा आदर्श माणुस म्हणून ओळखल्या जातो.म्हणून त्यांच्या शेतात स्मशानभूमी शेड बांधण्याचे कटकारस्थान करणारा पाटील सरपंच त्याला स्वार्थासाठी आणि राजकीय दडपणाखाली साथ देणारा मागासवर्गीय बौद्ध बी डी ओ, तशीलदार,ग्रामसेवक मागासवर्गीय समाजाला न्याय आणि अधिकार देण्यास कमी का पडतो?.ज्या लाखो असंघटीत मजुर,कामगारांच्या जन आंदोलनातील सहभागातून शिक्षणात नोकरीत आरक्षणात मिळविणारे लाभार्थी हे भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यास कमी पडतात. त्यांना समाजाने कधीच माफ करू नये.

आज पर्यंत हे सरकारी कामगार कर्मचारी बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारधारेशी प्रामाणिक राहिले नाही. म्हणुन त्यांनी आय एल यु राष्ट्रीय ट्रेंड युनियन होऊ दिली नाही,यांनी इंटक, आयटक,सिटू,बीएमएस,एचएमपी,बीएमएस,सारख्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनला मोठ्या प्रमाणात सभासदाची वार्षिक वर्गणी आणि निधी पुरविला आहे.त्यामुळे त्यांच्या राजकीय पक्षांनी केंद्रात,राज्यात सत्ता काबीज केली आहे.आता पदोन्नती मधील आरक्षणाचा शासन आदेश रद्द करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा जो तो अभ्यास करायला लागला. मग तुमच्या ट्रेंड युनियन त्यांचा राष्ट्रीय ट्रेंड युनियन महासंघाचे कोणत्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करीत होते?हा इतिहास आम्ही विसरून सरकारला दोषी ठरवीत आहोत.आता राज्य,केंद्र सरकार तुम्हाला न्याय हक्क आणि अधिकार देईल?.सर्व सुखसुविधा मिळत असतील तर संघटनेची गरज काय?.असे म्हणणारे तेव्हा संघटनेसाठी संघर्ष टाळत होते,स्वार्थ आणि अहंकार त्यांना मोठा वाटत होता.संघर्ष केल्या शिवाय संघटना वाढत नाही,आणि संघटना वाढविण्यासाठी वैचारिक प्रबोधन किती आवश्यक असते हे आरक्षणातील पदोन्नती या गंभीर समस्यामुळे सर्वच मागासवर्गीय समाजातील आरक्षणातील लाभार्थीनां कळले असेल,

आज पर्यंत त्यांनी कोणाला किती न्याय आणि अधिकार मिळवून दिला त्यांचे त्यांनी आत्मचिंतन करून आत्मटिका करून समाजा समोर जावे, बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न गेल्यामुळे आम्ही भटकलो आणि दिशा हीन झालो.त्याला सर्वात जास्त जबाबदार हे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे कामगार, कर्मचारी आणि अधिकारी आहेत.तेच आज पर्यंत आरक्षणाचे मोठे लाभार्थी आहेत.हे त्यांनी मान्य करावे. इतर वैचारिक शत्रुच्या संघटनेतुन युनियन मधून बाहेर पडावे आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी.स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) या आंबेडकरी क्रांतिकारी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी संलग्नता स्विकारावी राज्य व केंद्र सरकार वर कायमस्वरूपी दबाब ठेवण्याचे काम ही राष्ट्रीय ट्रेंड युनियनच करू शकते.आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षा कडून आज तरी कोणतीही अपेक्षा ठेऊ शकत नाही.त्यासाठी सर्व मागासवर्गीय कामगार ,कर्मचारी आणि अधिकारी यांनी भविष्यातील संकटांना समर्थ पणे तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे.
म्हणजे भविष्यात लोकांना समाजाला न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करता येईल.अन्यता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा असेल

सागर रामभाऊ तायडे,  ९९२०४०३८५९,  भांडुप मुंबई,-
(लेखक: स्वतंत्र मजदुर युनियन(ILU) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत).टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1