कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी महापालिकेचे प्रशिक्षण


कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी
शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

ठाणे-         महापालिका क्षेत्रात सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीही काही तज्ञांनी कोव्हीड-१९च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शंका वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज असून शहरातील  खासगी  हॉस्पिटल व क्लिनिक यांनी देखील याबाबत सतर्क राहून परिस्थिती योग्यरीत्या हाताळावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आज दूरदृशप्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन बल्लाळ सभागृह येथे करण्यात आले.

      या प्रशिक्षण सत्रात शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या २०० प्रतिनिधींनी दूरदृशप्रणालीद्वारे  उस्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, बालरोग विभागाचे प्रा.डॉ. सुनील जुनागडे, डॉ. श्वेता बाविस्कर, उप आयुक्त अश्विनी वाघमळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, डॉ. अनिता कापडणे आणि डॉ. अदिती कदम यांनी मार्गदर्शन केले या प्रशिक्षण सत्रात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यावर उपचार कसे करावेत, म्यूकरमायकोसिस आजाराची लक्षणे त्यावरील उपाययोजना, ऑक्सिजनचा उपलब्ध साठा त्याचे नियोजन, नागरिकांच्या आवश्यकतेनुसार शहरातील ऑक्सिजन, आयसीयू बेड्स यांचे नियोजन, मृत्यू प्रमाणपत्र तसेच गरोदर महिलांचे लसीकरण आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या