ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम अभियान

 ठाणे - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य . पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांचे द्वारा  23 जुलै  रोजी सुरु होणाऱ्या  नियोजन भवन, ठाणे  येथे  जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली  टोकियो ऑलिम्पिक  मधील विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व  करणाऱ्या  दहा खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी “स्वाक्षरी मोहीम अभियान ठाणे महानगर पालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.  सदर कार्यक्रमासाठी   जिल्हा परिषदेचे सभापती संजय भोईर,  जिल्हा परिषदेचे सभागृह नेते अशोक वैती, उपमहापौर  पल्लवी पावन कदम,  प्रियंका पाटील, उपसभापती, क्रीडा व सांस्कृतिक समिती आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांनी सांगितले सर्व 10 खेळाडूंना ठाणे जिल्ह्यातर्फे वैयक्तिकरीत्या लेखी पत्र पाठवून शुभेच्छा देण्याबाबत सुचविले. तसेच ठाणे म.न.पा. यांच्या सहकार्याने दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे ठाणे जिल्ह्यातील 18 वर्षावरील  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी (शालेय / संघटना) खेळाडूंसाठी कोविड-19 लसीकरण मोहिम देखील राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील जवळपास 50 खेळाडूंनी याचा लाभ घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी  स्नेहल साळुंखे,  भक्ती आंब्रे,  सुचिता ढमाले,    मधुरा सिंहासने, महेंद्र बाभूळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा अधिकारी  सायली जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक  जुबेर शेख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महापौर नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील 10 खेळाडूंना संपूर्ण ठाणे वासियांतर्फे पदक प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA