Trending

6/recent/ticker-posts

... आणि गटाराच्या मेनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा जीव वाचला

  भिवंडी  जिह्यात  सर्वत्र  मुसळधार पावसाने काल दुपारी जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.त्यातच कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पावसाच्या  पाण्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते.यामध्ये भिवंडी तालुक्यातील पूर्णा - राहनाळ हद्दीतील रस्त्यावर एका मोठ्या गटाराच्या मेनहोलमध्ये अचानक एक महिला पडल्याने त्या महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तिला  सुखरूप बाहेर काढून तिचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. 

 भिवंडी तालुक्यातील काल्हेर - ठाणे मार्गावर असलेल्या पूर्णा येथील पेट्रोल पंपाबाहेर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यातच रस्त्यालगतच असलेल्या मोठ्या गटाराच्या मेनहोल  न दिसल्याने ही महिला पाण्यातून वाट काढत होती. त्याचवेळी या महिलेचा अंदाज चुकल्याने महिला त्या मोठ्या मेनहोलमध्ये  पडून गळ्या एवढ्या पाण्यात डुबत असल्याचे नागरिकांना दिसताच ही महिला वाहून जाण्याच्या अगोदरच तेथून प्रवास करणार्‍या नागरिकांनी त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले आहे. दुसरीकडे एका कारमधील व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सावध करण्यासाठी त्याने व्हायरल केले.मात्र या महिलेच्या पायाला दुखापत झाली असून ही महिला सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. 


Post a Comment

0 Comments