सफाई कामगारांच्या व वॉलमॅनच्या रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन

    भिवंडी- शहरानजीकच्या खोणी - खाडीपार या शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील तब्बल ३६ सफाई कामगारांचा लॉक डाऊन काळातील वेतन ग्रामपंचायत प्रशासनाने न दिल्याने त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण महानगर पालिका कामगार सेनेचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी दुपारी जुन्या महापालिका कार्यालयासमोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे पदाधिकारी तालुकाध्यक्ष शिवनाथ भगत ,रोहिदास पाटील,संजय पाटील ,शैलेश करले, भरत पाटील ,अफसर खान आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

       खोणी - खाडीपार या लोकसंख्या अधिक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ३६ सफाई कामगार व ५ व्हॉल्व्हमन काम करीत आहेत.पहिल्या कोरोना लाटेत कामगारांनी जीवावर उदार होत नागरिकांच्या जीवाची काळजी घेत स्वच्छता राखली परंतू या कामगारांचे वेतन ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे करण देत रखडवून ठेवले आहे. या विरोधात मनसे महानगरपालिका कामगार सेनेतर्फे अनेक विनंती अर्ज करून देखील कामगारांचे वेतन न दिलेले नाही. त्यामुळे भीक मांगो आंदोलन करीत असल्याचे संतोष साळवी यांनी स्पष्ट करीत येथील कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सुधारीत वेतन श्रेणी द्यावी ,व्हॉलमन म्हणून काम करणाऱ्यांचे वेतन तात्काळ द्यावे अशा मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून संतोष साळवी यांनी मांडल्या.

यानंतर संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गटविकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन व भीक मागून जमा झालेली रक्कम सुपूर्द केली.खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कारखाने आहेत.येथे पहिल्या लॉकडाऊन काळात मालमत्ता कराची वसूली न झाल्याने कामगारांचे वेतन रखडले होते.त्यानंतर पुन्हा परिस्थिती रुळावर येत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनमुळे पुन्हा वसूलीमध्ये खंड पडल्याने ग्रामपंचायच्या तिजोरीत निधी नसल्याने वेतन देण्यास विलंब झाला आहे.येत्या ऑगष्टपर्यंत सर्व वेतन कामगारांना देऊन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात येईल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी सुधाकर पारडे यांनी शिष्टमंडळास दिले आहे.तर ग्रामपंचायत सेवा अधिनियम यामधील कायद्यान्वये कामगारांची सेवा ज्येष्ठता तपासून सुधारीत वेतन श्रेणी देण्याबाबत गटविकास अधिकारी डॉ.प्रदिप घोरपडे यांनी मान्य केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA