Top Post Ad

चार दिवसांच्या पावसाने केली शहापूरवासियांची दैनावस्था, ४२ गावे या वर्षीही संपर्काबाहेर

गेल्या अनेक वर्षे पावसाळ्यात संपर्काबाहेर असलेली वासिंद परिसरातील ४२ गावे या वर्षीही संपर्काबाहेर

 शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व - पश्चिम भागामधून जात असलेल्या मध्यरेल्वेच्या कल्याण - कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गीकेमुळे पश्चिमेच्या सूमारे ४२ गावांना याही वर्षी संपर्कविहिन व्हावे लागले आहे. या गावांना वासिंद शहराशी जोडण्यासाठी ठेवण्यात आलेले रेल्वेफाटक गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आल्याने लोहमार्गातील नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलाखालून येथील गावांमधील रहिवाशांना ये - जा करावी लागते. मुळातच ब्रिटिशांनी रेल्वेमार्गाची उभारणी करतांना बांधण्यात आलेला पुल नाल्यातील पाण्याचा निचरा होण्याकामी बांधण्यात आला होता ; परंतू छोट्या रेल्वे पुलाखालून प्रवास करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नसल्याने शहापूर आणि कल्याण तालुक्यातील ४२ गावांमधील रहिवासी याच पाणी भरलेल्या पुलाखालून गेले कित्येक वर्षे प्रवास करीत आहेत. 

पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या काळात पुलाखाली तुडूंब पाणी भरुन वाहत असल्याने तब्बल ४२ गावांचा संपर्कच तुटत आहे. मागील चार दिवस या भागात पावसाची संततधार राहिल्याने यावर्षी देखील वासिंदच्या ४२ गावांवर संपर्कविहिन होण्याची वेळ आली आहे. या गावांवर दरपावसाळ्यात संपर्कविहिन होण्याची वेळ येते. ही समस्या सुटावी म्हणून खासदर कपिल पाटील यांच्या पुढाकाराने वासिंदच्या पूर्व - पश्चिम भागांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्रालयाने एकूण २५२ मिटर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपये मंजूर करुन बांधकाम सुरु केले. परंतू हे काम यंदाच्या पावसाळ्यातही रखडल्याने अखेर वासिंदच्या ४२ गावांची संपर्कविहिनता काही संपूष्टात येऊ शकलेली नाही. सध्याच्या पाणीवाहक लहान पुलाखालून इतरवेळी दुचाकी आणि चारचाकी

लहान वाहने प्रवास करीत असतात.  संपर्कविहिनतेच्या समस्येचा सामना करणाऱ्या ४२ गावांपैकी शहापूर तालुक्यातील भातसई, शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांचा यात समावेश आहे. केंद्र शासनाने रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल मंजूर केले ; परंतू ते याहीवर्षीच्या पावसाळ्या आधी पूर्ण होऊ न शकल्याने वासिंदच्या ४२ गावांना अद्यापी रहदारीच्या त्याच नागरी समस्येत अडकून पडावे लागले आहे. परिणामी वासिंदकरांना  अतिवृष्टीमुळे दरवर्षीच्या संपर्कविहिनतेची पुनरावृत्ती याहीवर्षी पहायला मिळाली. 

केंद्र शासनाने वासिंदच्या पूर्व - पश्चिम भागाला जोडणाऱ्या २५२ मिटर इतक्या अंतराच्या उड्डाणपुलासाठी प्रत्यक्षात  ३१.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी २२ कोटी रुपयांचा निधी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निश्चित करण्यात आला आहे. पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आहे. हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्याने वासिंदच्या ४२ गावांची समस्या सध्याच्या पावसाळ्यात देखील कायम राहीली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हा पुल पूर्णत्वास येण्याचे निर्धारीत करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com