Top Post Ad

आरक्षण आणि आंदोलन बंद करा...

 भारतात आजच्या परिस्थिती मध्ये सर्व जातीच्या लोकांना आरक्षण पाहिजे. त्यासाठी त्या त्या जातीच्या संघटना आंबेडकरी समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय जागृतीचे उदाहरण देतात.त्या समाजाची आर्थिक परिस्थिती केवळ आरक्षणामुळे आहे.असे ते सांगतात,पण त्यांनी देव धर्म अज्ञान अंधश्रद्धा समुद्रात विसर्जित केले हे लक्षात घेतले जात नाही.आणि आंबेडकरी समाजाचे किती टक्के लोक आरक्षणाचे लाभ धारक आहेत यांच्या तपशिलात ते मात्र जात नाही. आरक्षणाच्या लढाईत त्यांचे किती मोठे योगदान आहे हे ते पाहत नाही.देशात आरक्षण म्हटलं की, केवळ ज्यांच्या नजरे समाेर फक्त आंबेडकरी विचारांचा समाज अनुयायीच दिसतात, म्हणजे बौध्द समाज !.

देशात जेवढे भ्रष्टाचार झाले त्यात गुणवत्ताधारी विचारवंतानो सांगा एकतरी आरक्षणवाला आहे काय?. मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांना गुणवत्ताधारी विचारवंतानो याचा जरा अभ्यास करा कि राव. सरकारी रुग्णालयात रुग्ण दगावले की उपचार करणारे डॉक्टर हे आरक्षणातून आले आहेत असे सांगुन तोडफोड केली जाते. तेच देशात कुठेही रोडवरील पुल, रेल्वे ब्रिज, धरण किंवा इमारतीचे अपघात झाले की त्या बांधकामाचे इंजिनिअर हे आरक्षण वाले होते आणी आरक्षण हे कसं घातक आहे. हे दाखवण्यासाठी निरनिराळी तथाकथित उदाहरणे दिली जातात.पण त्या इंजिनिअरची किंवा डाॅक्टरची नावे जाहीर केले जात नाहीत.एखादा अपवाद असेलही पण सरसकट आरक्षणाला बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार नेहमीच होत असतो. मराठा गुणवत्ताधारी विचारवंतानो आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही.महाराष्ट्र राज्य निर्माण झाले तेव्हा पासून सत्ताधारी हा मराठा समाजाचा आमदार आहे.तोच मुख्यमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ असतांना आरक्षण केवळ मागासवर्गीय समाजाची शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक प्रगती डोळ्यात खुपते म्हणून होत आहे. 
उत्तरप्रदेशात पाप मुक्त करणारी अनेक जगप्रसिद्ध केंद्र आहेत.बनारस म्हणजे पापे धुन काढण्याचा धोबीघाट.बनारस म्हणजेच वाराणसी जो प्रधानसेवक की पंतप्रधान?.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा मतदारसंघ आहे.आणि विशेष योगीच्या मर्जीचे खास शहर आहे.तिथे काम सुरु असतांना एका रोडवरील ब्रिजचा बींम पिलरवर बसवत असताना भयंकर अपघात झाला.त्यात वीस पेक्षा जास्त मजूर कामगार मरण पावले.व पन्नास पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले. त्यांची दखल सरकारने नेहमी प्रमाणे घेतली व त्यांना पाच पाच लाखाची मदतही जाहीर केली.पण या अक्षम्य मानवी चुकांची शिक्षा त्या बिचार्‍या मजुरांच्या प्राणावर बेतली?.पण त्यांच्या मुख्यसूत्रधार प्रोजेक्ट इंजिनियर व कॉन्टॅक्टर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. आज पर्यंत असे अपघात खुप झाले पण कॉन्टॅक्टर, इंजिनियर वर कोणताही गुन्हा दाखल होऊन लक्षवेधी कारवाई झाली नाही. कारण ते आरक्षणाचे लाभ धारक नव्हते.त्यांची दखल प्रिंट चॅनल मीडिया फारशी घेत नाही आठ तासा नंतर सर्वच सोयी नुसार विसरून जातात.

 सामुदाहिक हत्याकांड, बलात्कार आणि भ्रष्टाचार यांची दखल जात धर्म पाहून घेतली जाते. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे गोरखपुरात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे शंभर लहान बालकं ऑक्सिजन अभावी मरण पावली.हा सामूूूहिक भ्रष्टाचार होता.पण त्याला कोणीही गुणवत्ताधारी विचारवंत दोष देत नाही.कोणी दैवाला दोष देतो कोणी आरक्षणाला दोष देतो. 
भारतातील सर्वच राज्यात भ्रष्टाचाराचे लक्षवेधी घोटाळे झाले आहेत त्यात एक भी आरक्षण लाभ धारक नाही.सर्व मेरिट वाले म्हणजे तथाकथित सुवर्ण ओपनवाले आहेत.कोलकाता येथे सुद्धा असाच अपघात घडला होता. तेव्हा पंतप्रधान मोदीजी यांनी हा अपघात म्हणजे 'देवाचा कोप' म्हटले होते. गोरखपूर अपघाताला कोणी प्रसिद्ध जोतिष्यकार पंडित हिमांशु शर्मा म्हणतात की हा 'तिन ग्रहाच्या अशुभ युतीचा परिणाम आहे'. म्हणजे जेव्हा आरक्षण वाले इंजिनिअर असताना अपघात झाला तर तो आरक्षणाचा दुष्परिणाम आणी मेरीटधारी ओपनवाला इंजिनिअर असताना अपघात घडला की म्हणायचे देवाचा कोप किंवा अशुभ ग्रहाची युती.गेल्या हजारो वर्षांपासून मागासवर्गीय समाजाला यांनी असेच मूर्ख बनवुन ठेवले. विज्ञान तंत्रज्ञान चंद्र,मंगळ ग्रहावर जाऊन राहण्याची व्यवस्था करण्यात यशस्वी होत असतांना.हे स्वतःच्या सुरक्षेसाठी काय काय युक्तिवाद करीत असतात. किती निचपणे हे जातीवादाचं समर्थन करतात?. 

गुणवत्ताधारी विचारवंत आज कुठे गेले ते आरक्षणामुळे राजहंस मागे पडले व कावळे समोर गेले म्हणनारे तत्वज्ञानी?. भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले.पण आदर्श निर्माण करून गेले. ब्रिटीश लोकांचे त्यांनी शेकडो वर्षे पुर्वी बांधलेल्या इमारती पहा कशा ताठ मानेने उभ्या आहेत. कारण त्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व होते. भटा ब्राम्हणांनी सुवर्ण बनविलेल्या लोकांकडे ते राष्ट्रीयत्व आहे का.? तर स्वार्थ पलीकडे देशाचा यांनी कधीच विचार केला नाही.प्रत्येक गोष्ट ही जातीच्या चष्म्यातून पाहीली जाते.आणी म्हणूनच मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या लक्षवेधी असूनही ते गुलाम म्हणून जगतात.आणि तीन टक्केवाले त्यांच्यावर काल भी आणि आज भी राज्य करतात?. जर खरच आपल्यात गुणवत्ता असती तर आपण एक हजार वर्षे परकीयाचे गुलाम बनलो असतो काय?.  गुणवत्ताधारी विचारवंतानो त्याला आरक्षणवाले तर जबाबदार नाहीत ना?.

गुणवत्ताधारी विचारवंतानो,पुल ब्रिज,धरण,गगनचुंबी इमारती बांधण्याचं कवडीच ही तंत्रज्ञान माहीत नसल्याने पावसाळ्यात मोहिमा बंद ठेवणाऱ्या व समुद्र ओलांडला म्हणून जलदेवतेचा कोप होतो असले सिद्धांत सांगणाऱ्या लोकांचे आपण मानसिक गुलाम आहोत.त्यांनी आरक्षण मागु नये आणि त्यासाठी जनआंदोलन करू नये. आरक्षण हे फक्त मागासवर्गीया (एस सी) साठी आहे म्हणजेच फक्त बौद्धासाठी आहे हा खोटा प्रचार केला आणि एक मराठा लाख मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला. असे लिहले तर चुकीचे असणार नाही, कारण आम्हाला नाही तर त्यांना ही नाही ठोस भूमिका पुढे आली.

बौद्धांचा व आंबेडकरी चळवळीतील लोकांचा तिरस्कार करून मागासवर्गीय समाजाच्या डोक्यात विष पेरनाऱ्या अर्धवट स्वयं घोषित संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आरक्षणाची पूर्णपणे माहीती घ्यावी.एस सी ला तेरा टक्के आरक्षण आहे त्यामध्ये एकूण ५९ जाती आहेत,त्यात एक बौद्ध आहे.एस टी ला सात टक्के आरक्षण आहे.त्यात एकूण ४७ जाती आहे.त्याफक्त आरक्षण घेण्यासाठी कागदावर एस टी आहेत बाकीच्या वेळी गर्वसे कहो हम आहेत.ओबीसी समाज ५२ टक्के आहे.आरक्षण किती १९ की २७ टक्के त्यात किती जाती आहेत?.३४६ जाती?. राजकीय आरक्षण घेण्यासाठी सर्वच पक्षात आहेत.बाकी पारंपरिक वारकरी,धारकरी,कारसेवक, निरंकारी, कुठेही जा लक्षवेधी संख्या यांचीच दिसेल.एस बी सी २ टक्के जाती सात. इतर दोन ते साडेतीन टक्के वाल्या जाती फक्त कागदावर आरक्षण मांगणी साठी असतात.बाकीच्या वेळी "गर्वसे कहो हम हिंदू है" सांगणाऱ्या आहेत.त्यांच्या समाजात सामाजिक,शैक्षणिक,राजकीय जागृती शून्य टक्के आहे.

भारतीय लोकशाहीने सर्व समाजाला संविधानिक अधिकार दिले आहे.ते घेण्याची पात्रता त्या समाजात असली पाहिजे त्या समाजातील एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला सर्वश्रेष्ठ पद दिले म्हणजे सर्व समाजाचा सर्वांगीण विकास होईल हे गणित मांडणे चुकीचे ठरेल आहे. ते सर्वच समाजाला लागू आहे. आज पर्यंत देशाचे राष्ट्रपती पद मागासवर्गीय,अल्पसंख्याक आणि महिलांना समाजातील प्रतिनिधित्व म्हणूनच दिल्या गेले पण त्यामुळे कोणता ठोस बदल झाला.हे कोणी कोणाला सांगु लिहू शकत नाही. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर या उच्चशिक्षित मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधीने जिथे बोट ठेवले त्यांचा ऐतिहासिक इतिहास बदलून टाकला.पुढे त्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यामुळे तर त्यांनी स्वतःसह देशाला जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरविले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांना मानणारा समाज सर्वच बाबतीत जागरूक आहे.काही लोक आदर्श घेऊन लाचार झाले.त्यांनी फक्त आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वतःला मागासवर्गीय दलित म्हणून घेतले. जी देव,देवी आम्हाला कोणत्याही संकटातून वाचऊ शकत नाही यांची पूर्ण कल्पना असूनही त्यांच्या दर्शनासाठी आपली जात विसरून गेले.तरी त्यांना पायऱ्या वर बसुन दर्शन घ्यावे लागले.ते त्यांनी बेशरम पणे घेतले. तेच जर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान वाचले असते तर?. ती कोणती असी समस्या आहे जी राष्ट्रपती सोडवू शकणार नाही?.

जगातील सर्वश्रेष्ठ पद राष्ट्रपती जे त्यांना आरक्षणाचे लाभ धारक म्हणून मिळाले. ते विसरू शकत नसतील तर त्यांना आरक्षणाची गरज नव्हती.त्यांनी त्यासाठी कोणत्याही आंदोलन केले नव्हते तरी त्यांचा लाभ देण्यात येतो ते केवळ दाखविण्यासाठी.गुणवत्ताधारी विचारवंतानो मराठा समाजाला आरक्षण पाहिजे,पण जन्म झालेल्या मुलामुलीचे नाव,लग्न ते स्वता ठरवू शकतील काय?. माणूस म्हणून त्यांना कोणता अधिकार आहे. गुणवत्ताधारी विचारवंतानो भारतीय संविधानाने सर्वांना समान न्याय आणि अधिकार दिला. त्याचा लाभ सर्वांनी नियमानुसार घेतला पाहिजे. विषमतावादी समाजव्यवस्था कायम ठेवून समान न्याय कसा मिळेल. त्यामुळेच आरक्षण मांगणे आणि आंदोलन करणे बंद केले पाहिजे. त्या बदल्यात जी माणस जे काम करीत असतील त्या कामाची व त्या कामगारांची नोंद झाली पाहिजे. म्हणजेच जाती अंताची लढाई संपेल व भारतातील सर्व नागरिकांचा सर्वागिन विकास होईल.

सागर रामभाऊ तायडे,............भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com